प्रादेशिक बातम्या

December 15, 2025 3:59 PM

views 32

राज्यशासनाच्या बहुतेक विभागांमधे अनुदाने वेळेवर खर्च होत नसल्याचं कॅगचं निरीक्षण

राज्य सरकारमधल्या अनेक विभागांनी गेल्या आर्थिक वर्ष अखेर सुमारे पावणे २ लाख कोटी रुपयांच्या खर्चाचे हिशोब सादर केलेले नाहीत, असं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे. रविवारी विधीमंडळात हा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर सुमारे पावणे ५३ हजार प्रकरणांमध्ये १ लाख ७७ ...

December 15, 2025 1:16 PM

views 18

इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा, असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.

December 15, 2025 1:36 PM

views 46

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ७५व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, राष्ट्रीय एकतेचे प्रतिक, मजबूत भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना पुण्यतिथी निमित्त नमन करत असल्याचं गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमावरील संदेशात आदर...

December 14, 2025 8:06 PM

views 43

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संस्थगित

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजलं. या अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या ७ बैठकांमध्ये एकंदर ७२ तास ३५ मिनिटं काम झाल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. तर विधानपरिषदेच्या ७ बैठकांमध्ये ४८ तास १६ मिनिटं कामकाज झालं, असं विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं....

December 14, 2025 8:03 PM

views 63

आयआयटी बॉम्बे इथं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण

आयआयटी बॉम्बे  अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई इथं  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज  लोकार्पण करण्यात आलं.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  संसदेत महिलांना ३३ टक...

December 14, 2025 7:12 PM

views 28

रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट तीन टक्क्याच्या आत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्य़ा मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या आत ठेवण्यात यश आलं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला त्यांनी उत्तर दिलं. चालू...

December 14, 2025 5:19 PM

views 11

जनतेच्या कल्याणासाठी कुठलाही निर्णय घेतला गेला नसून केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिवेशन घेतल्याची विरोधी पक्षाच्या नेत्यांची टीका

या अधिवेशनात जनतेच्या कल्याणासाठी कुठलाही निर्णय घेतला गेला नसून केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिवेशन घेतल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांनी नागपूरमधे वार्ताहर परिषदेत केली. कुपोषण, भ्रष्टाचार, अमली पदार्थाची विक्री याबद्दलच्या कुठल्याही प्रश्नाला सरकारने उत्तर दिलं नाही, फक्त महानगरपालिक...

December 14, 2025 4:23 PM

views 14

महायुती सरकार विदर्भाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध – एकनाश शिंदे

वीजनिर्मिती, खनिजसंपत्ती, कृषी, वनसंपत्ती, पर्यटन, वाहतूक आणि लॉजिस्टिक ही विदर्भाची सात मुख्य बलस्थानं असून महायुती सरकार विदर्भाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा...

December 14, 2025 3:18 PM

views 18

नाहूर इथं अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं विदेशी पक्षी उद्यान विकसित होणार

नागरिकांसाठी नव्या पर्यटन आकर्षणाच्या दृष्टीनं मुंबई पूर्व उपनगरात नाहूर इथं अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं विदेशी पक्षी उद्यान विकसित करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन आज संध्याकाळी  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार असून, त्याचवेळी मुलुंड इथल्या, ...

December 14, 2025 2:10 PM

views 53

पुणे पुस्तक महोत्सवाचा आरंभ

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं आयोजित पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन काल पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे मिलिंद मराठे, संयोजक राजेश पांडे, प्रसिद्...