प्रादेशिक बातम्या

January 11, 2026 7:09 PM

views 69

ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार गंगाधर पटणे यांचं निधन

जनता दलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते गंगाधर पटणे यांचं आज नांदेड इथे वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. पटणे १९९८ ते २००४ या कालावधीत विधानपरिषदेचे माजी सदस्य होते. १९७४ ते १९८१ या काळात ते बिलोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते.  साने गुरुजी आणि  महात्मा बसवेश्वर यांच्यावर निष्ठा ...

January 11, 2026 6:21 PM

views 14

निवडणुकीसाठीच्या कर्तव्यावर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांकडून टपाली मतदानाच्या सुविधेला चांगला प्रतिसाद

निवडणुकीसाठीच्या कर्तव्यावर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांकडून टपाली मतदानाच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे महानगरपालिकेत आतापर्यंत १ हजार ९४५ मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याचं आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं.टपाली मतदानासाठी उद्या शेवटचा दिवस आहे.

January 11, 2026 5:55 PM

views 7

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगासन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा तृतीय क्रमांक

बंगळुरू इथं झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगासन स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं तृतीय क्रमांक पटकावला आहे.  मुंबई विद्यापीठाच्या महिला संघानं अखिल भारतीय स्तरावर प्रथमच पदक पटकावलं. या कामगिरीच्या जोरावर संघाची खेळों इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.

January 11, 2026 5:46 PM

views 5

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा लाडक्या बहिणींचा वापर करून घेत आहे- विजय वडेट्टीवर

लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा लाडक्या बहिणींचा वापर करून घेत आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी आज अकोल्यात केली. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यावरूनही त्यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. एमआयएमचे नेते...

January 11, 2026 3:35 PM

views 5

तिन्ही सैन्यदलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं मरीन ड्राईव्ह इथं आयोजन

येत्या १४ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ट्राय सर्व्हिस व्हेटरन्स डे निमित्त तिन्ही सैन्यदलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं आयोजन आज मुंबईत मरीन ड्राईव्ह इथे करण्यात आलं होतं. या संचलनात तिन्ही सैन्य दलांचे निवृत्त अधिकारी, नौदलाचे कॅडेट्स, एनसीसी कॅडेट्स यांनीही सहभाग घेतला होता. भारतीय...

January 10, 2026 8:48 PM

views 16

UPSC च्या सर्व परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याची पडताळणी होणार

UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या   निवड परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी प्रत्यक्ष चेहरा पडताळणीला सामोरं जावं लागणार आहे. २०२५ दरम्यान झालेल्या एन डी ए च्या,  नेव्हल अकॅडेमि च्या आणि सी डी एस च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचीही आयोगानं चेहरा पडताळणी केली होती. या...

January 10, 2026 8:12 PM

views 13

बारावीच्या विद्यार्थ्यांना सोमवारपासून हॉल तिकिट डाऊनलोड करता येणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून    बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून ऑनलाईन पद्धतीने हॉल तिकिटे उपलब्ध करून दिली जातील. या हॉल तिकिटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा शिक्का आणि स्वाक्षरी असणे बंधनकारक असल्याची माहिती माहिती राज्य मंडळाचे सचिव...

January 10, 2026 7:20 PM

views 39

यूट्युबर संग्राम पाटील यांना आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं

लंडनस्थित डॉक्टर आणि लोकप्रिय यूट्युबर संग्राम पाटील यांनी आज सकाळी पोलिसांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतलं. त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत नोटीस बजावून प्राथमिक चौकशी करून त्यांना सोडण्यात आलं.  भाजप पदाधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यासंदर्भात पोलिसांनी ही ...

January 10, 2026 3:05 PM

views 95

तुषार आपटेचा ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा राजीनामा

भारतीय जनता पक्षानं बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला सह-आरोपी तुषार आपटे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेतल्या 'स्वीकृत' नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. काल त्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर विरोधकांनी त्याच्यावर टीका केली होती.    भाजपाचा हा निर्णय दुर्...

January 10, 2026 3:11 PM

views 39

पुणे महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध केला. आपल्या जाहीरनाम्यात पुण्यातल्या प्रमुख नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित केल्याचं उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितल...