प्रादेशिक बातम्या

March 12, 2025 10:27 AM March 12, 2025 10:27 AM

views 8

शासनाच्या विभागांची माहिती एकाच संकेतस्थळावर मिळण्यासाठी ‘स्वॅस’ प्रणाली विकसित

शासनाच्या सर्व विभागांची माहिती जनतेला एकाच संकेतस्थळावर मिळावी , यासाठी ‘सीएम डॅशबोर्ड’ म्हणजे ‘स्वॅस’ (SWaaS) प्रणाली विकसित करण्यात येत आहे. शासनाच्या धोरणात्मक योजना, त्यांची प्रगती, अद्ययावत माहिती, थेट आर्थिक लाभ देणाऱ्या योजना, विभागनिहाय माहिती यामध्ये असावी आणि यासाठी इतर कोणत्याही संकेतस्थ...

March 11, 2025 8:58 PM March 11, 2025 8:58 PM

views 9

येत्या २ दिवसात कोकणात सर्वत्र आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

येत्या २ दिवसात कोकणात सर्वत्र आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मुंबईत सांताक्रूझ इथं ३९ पूर्णांक २ तर रत्नागिरीत ३९ पूर्णांक ४ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.

March 11, 2025 8:57 PM March 11, 2025 8:57 PM

views 16

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन करत कांदा लिलाव बंद

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथे आज शेतकऱ्यांनी धरणं आंदोलन करत कांदा लिलाव बंद पाडले. गुरुकृपा आडत संघटनेच्या व्यापाऱ्यांनी टोमॅटो खरेदीचे तीन कोटी रुपये थकवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. चार महिने होऊनही थकबाकी मिळालेली नाही, शेतमालाचे पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शे...

March 11, 2025 8:54 PM March 11, 2025 8:54 PM

views 8

मुंबईहून अवैधरीत्या लंडनला जाणाऱ्या ८ जणांना अटक

मुंबईहून अवैधरीत्या लंडनला जाणाऱ्या ८ जणांना आज पोलिसांनी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली. हरयाणात हिसार इथल्या खासगी विद्यापीठाचे ७ विद्यार्थी आणि एक प्राध्यापक, युवा विनिमय कार्यक्रमाअंतर्गत लंडनला जात असल्याचं भासवून हे सर्व ८ जण लंडनला निघाले होते. मात्र इमिग्रेशन खिडकीवर त्यांच...

March 11, 2025 8:52 PM March 11, 2025 8:52 PM

views 9

राज्याच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू

राज्याच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात चर्चा सुरू आहे.    निवडणुकीच्या काळात सत्ताधारी पक्षाने केवळ आकर्षक घोषणा करत आश्वासनांचा पाऊस पाडला, मात्र अर्थसंकल्पात याची अंमलबजावणी केली नाही, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव या...

March 11, 2025 8:39 PM March 11, 2025 8:39 PM

views 8

प्रार्थनास्थळावरचे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद, मर्यादित कालावधीसाठीच परवानगी

प्रार्थनास्थळांवरच्या भोंग्यांची आवाजाची मर्यादा आणि यासंदर्भातल्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आता संबंधित पोलिस ठाण्याच्या निरिक्षकांवर सोपवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी भाजपाच्याच सदस्य देवयानी फरांदे यांनी...

March 11, 2025 4:02 PM March 11, 2025 4:02 PM

views 22

वैभववाडी-गगनबावडा घाट रस्त्यावर आता पुन्हा गाड्या धावणार

सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणारा वैभववाडी-गगनबावडा घाट रस्ता आजपासून खुला करण्यात आला आहे. हा घाटरस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी गेल्या १५ जानेवारीपासून बंद केला होता.   काही दिवसांपूर्वी या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु झाली होती आणि आजपासून दुहेरी वाहतूक सुरु करण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्...

March 11, 2025 3:44 PM March 11, 2025 3:44 PM

views 12

महाराष्ट्रात ३ वर्षांत १ लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एक लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात जवळपास ४६ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. २०२२ ते २०२४ या कालावधीत अपघातांच्या संख्येत सातत्यानं वाढ झाल्याचं सरनाईक यांनी दिलेल्...

March 11, 2025 3:36 PM March 11, 2025 3:36 PM

views 2

उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला ३१ मार्च २०२६ पर्यंत आणखी एका वर्षाची मुदतवाढ

केंद्र सरकारनं उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला पुढच्या वर्षी ३१ मार्च २०२६ पर्यंत आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातली अधिसूचना परकीय व्यापार महासंचालनालयानं जारी केली. उडदाच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत यावर्षी ३१ मार्चला संपणार होती. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत वस्तू मालाच्या किमती स...

March 11, 2025 2:40 PM March 11, 2025 2:40 PM

views 4

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईच्या विधानभवन परिसरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.