प्रादेशिक बातम्या

December 25, 2025 7:35 PM

views 59

Municipal Election: राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग

राज्यातल्या २९ महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. राज्यात सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षांमधे स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत. उमेदवारांच्या मुलाखतींसाठी दोन्ही आघाड्यांची शिब...

December 25, 2025 7:35 PM

views 87

महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न

महानगरपालिका निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक आज मुंबईत टिळक भवन इथं झाली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ...

December 25, 2025 2:48 PM

views 21

नवी मुंबई विमानतळाचं परिचालन सुरु

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली. आज सकाळी आठ वाजता बेंगळुरूहून आलेलं पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात आली. तर सकाळी पावणे नऊ वाजता या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेने पहिलं विमान आकाशात झेपावलं. सध्या या विमा...

December 24, 2025 3:10 PM

views 32

काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत…

मुंबई महापालिकेची निवडणुक वंचित बहुजन आघाडीसोबत लढवण्याचा निर्णय झाल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज जाहीर केलं. दोन्ही पक्षात जागा वाटपाच्या संदर्भात स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. पण कुठेही निम्म्या - निम्म्या जागा वाटपाची मागणी झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

December 24, 2025 3:13 PM

views 53

Maharashtra : जिल्हा परिषदेतल्या कंत्राटी आरोग्य सेविकांना नियमित करण्याचा निर्णय

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना नियमित करण्याचा निर्णय  राज्य मंत्रीमंडळानं आज घेतला. कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांना याचा लाभ मिळेल. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याशिवाय नगरपरिषदा आ...

December 24, 2025 12:46 PM

views 61

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुरूपसिंग नाईक यांचं आज नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नवापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.   सुकवेल गट ग्रामपंचायतीच्या सरंपचपदापासून ...

December 23, 2025 8:55 PM

views 71

राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान

जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवन इथं झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुकाचे संचालक आर. श्रीयानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय देशभरातल्या एकूण ८ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री...

December 23, 2025 8:54 PM

views 21

महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या तयारीत

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली.   येत्या शुक्रवारपर्यंत या आघाडीची घोषणा हो...

December 23, 2025 10:21 AM

views 75

महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरायला सुरूवात

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी रोजी प्रसिद्...

December 22, 2025 8:45 PM

views 19

लवासा प्रकल्पाला दिलेल्या परवानग्यांची सीबीआय चौकशीची मागणी जनहित याचिका फेटाळली

पुण्याजवळच्या लवासा प्रकल्पाला कथित बेकायदेशीर परवानग्या दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी २०२३ सालची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. पोलिसांनी याबाबतीत एफआयआर दाखल करावा असा आदेश न्यायालयानं देण्यासाठी ...