प्रादेशिक बातम्या

April 15, 2025 8:50 AM April 15, 2025 8:50 AM

views 11

शरण आलेल्या नक्षल्यांसाठी गडचिरोलीमध्ये ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची सुरुवात

गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे प्रभावीत होऊन शरण आलेल्या नक्षल्यांसाठी पोलिसांनी 'प्रोजेक्ट संजीवनी' हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शरण आलेल्या नक्षल्यांना हक्काचं निवासस्थान मिळावं यासाठी चार रो-हाऊसेस तयार करण्यात येणार आहेत; त्याचं भूमिपूजन पोलिस अधीक्ष...

April 15, 2025 8:37 AM April 15, 2025 8:37 AM

views 10

सिंधुदुर्गमधल्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापिठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची माहिती

सिंधुदुर्गमधल्या सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट, आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई विद्यापिठात स्वतंत्र अध्यासन केंद्र सुरू करणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी काल जाहीर केली. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्...

April 14, 2025 3:20 PM April 14, 2025 3:20 PM

views 9

राज्यात अवकाळी पावसाचा इशारा

राज्यात अनेक ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.    कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सिंधुदुर्ग तसंच पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा,सांगली, सोलापूर जिल्ह्यांना आज आणि उद्या...

April 14, 2025 3:04 PM April 14, 2025 3:04 PM

views 13

अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी

प्रचंड गाजलेल्या काळवीट शिकार प्रकरणी हिंदी चित्रपट अभिनेता सलमान खान याला जीवे मारण्याची आणखी एक धमकी देण्यात आली आहे. सलमान खानची गाडी बॉम्बनं उडवून देऊ किंवा त्याला घरात घुसून मारू असं धमकीच्या संदेशात म्हटलं आहे. हा संदेश मुंबईतल्या वरळी इथल्या वाहतूक विभागाच्या मोबाईलवर पाठवण्यात आला असून पोलिस...

April 14, 2025 3:00 PM April 14, 2025 3:00 PM

views 19

मुंबई विमानतळावर ७ कोटी ८५ लाख किमतीचे अमली पदार्थ जप्त

मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सात कोटी ८५ लाख रुपये किमतीचे ७८५ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी एका परदेशी  नागरिकाला अटक करण्यात आली आहे.  हा परदेशी नागरिकाच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यामुळे सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून त्य...

April 13, 2025 8:06 PM April 13, 2025 8:06 PM

views 17

टँकरचालकांच्या संपामुळे मुंबईत आपत्कालीन कायदा लागू

केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतल्या टँकर चालकांचा संप सुरुच असल्यानं, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं २००५ चा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करायचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत पालिकेच्या वतीनं शहरातल्या सर्व विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित केल्...

April 13, 2025 6:48 PM April 13, 2025 6:48 PM

views 17

गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांसाठी विपश्यना शिबराचं आयोजन

आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांसाठी पोलिस दलानं आज विपश्यना शिबराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या १०२ जणांनी सहभागी होऊन ध्यानसाधनेद्वारे जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे धडे गिरवले. नक्षल्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावेत यासाठी गडचिरोलीतल्या पोलीस मुख्यालयाच...

April 13, 2025 6:44 PM April 13, 2025 6:44 PM

views 2

परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५ कोटींची मंजुरी

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५ कोटींच्या निधीला सरकारने मंजुरी दिली आहे. वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दळणवळणाची सुविधा यामुळे अधिक सुलभ होणार आहे.

April 13, 2025 8:06 PM April 13, 2025 8:06 PM

views 16

नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण

नाशिक जिल्ह्यात लासलगावसह सर्व बाजार समित्यांत कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारने कांद्यावरचं २० टक्के निर्यातशुल्क हटवल्यानंतरही भाव चांगला मिळत नसल्यानं केंद्र सरकारने कांद्याला अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कांदा...

April 13, 2025 6:32 PM April 13, 2025 6:32 PM

views 4

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे नांदेड दौऱ्यावर

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. कौठा इथं धनगर समाज बांधव आणि महायुतीच्या सर्व पक्षांच्या वतीनं त्यांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थ...