प्रादेशिक बातम्या

July 11, 2025 3:43 PM July 11, 2025 3:43 PM

views 2

कापूस लागवडीतील समस्या सोडवण्यासाठी सरकार उपाययोजना करणार

कापूस लागवडीतील समस्या, रोपांना होणारे रोग, विणकर आणि कृषी उद्योगाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सरकार उपाययोजना करणार आहे, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. कोइम्बतूर येथील आयसीएआर संशोधन केंद्राला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

July 11, 2025 3:37 PM July 11, 2025 3:37 PM

views 19

भंडारा जिल्ह्यातील चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक

भंडारा जिल्ह्यातल्या विविध भागात दुकानाचं शटर तोडून दुचाकी, मोबाईलची चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं  अटक केली आहे. आरोपींकडून १० मोबाईल, ३ इअरबड्स,  ४ स्मार्ट वॉच, आणि दोन दुचाकी असा  ३ लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे. 

July 11, 2025 3:30 PM July 11, 2025 3:30 PM

views 5

नवी मुंबईत हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणा-या ९ जणांच्या टोळीला अटक

नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करणा-या  नऊ जणांच्या टोळीला अटक केली आहे.   पंजाबमधून आलेल्या या आरोपींकडून १२० ग्रॅम वजनाचं ४७ लाख रुपये किंमतीचं हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. सीबीडी बेलापूर इथल्या  सी-शोर लॉजमध्ये  सापळा रचून ही कारवाई करण्यात ...

July 11, 2025 3:28 PM July 11, 2025 3:28 PM

views 7

इगतपुरीजवळील अपघातात ४ जण ठार

इगतपुरीजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर मुंढेगाव इथं काल कारवर कंटेनर आदळून झालेल्या अपघातात ४ जण ठार झाले. हे सर्वजण अंधेरीत राहणारे होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गरुडेश्वर इथल्या बाबा रामदास समाधी मंदिर आश्रमात दर्शन घेउन मुंबईला परतताना हा अपघात झाला.

July 11, 2025 3:25 PM July 11, 2025 3:25 PM

views 13

गिरणी कामगारांना घरं बांधून देण्यात येणार- उपमुख्यमंत्री

मुंबई शहर आणि परिसरात जिथे जागा उपलब्ध असेल, अशा ठिकाणी गिरणी कामगारांना घरं बांधून देण्यात येतील असा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत झाल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल  विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्...

July 10, 2025 8:56 PM July 10, 2025 8:56 PM

views 98

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानसभेत सादर

देशाच्या आणि राज्याच्या सुरक्षिततेसाठी आणि राज्यघटनेच्या विरोधात जाणाऱ्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक आणलं असून याचा उद्देश कोणालाही त्रास देण्याचा नाही, याचा दुरुपयोग करायची मुभा कोणालाही मिळणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. महाराष्ट...

July 10, 2025 9:02 PM July 10, 2025 9:02 PM

views 6

विधेयकातल्या कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना या शब्दाला विरोधकांचा आक्षेप

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान आमदार रोहित पवार यांनी या विधेयकातल्या 'कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना' या शब्दांवर आक्षेप घेत, कडवी उजवी विचारसरणी नसते का, असा सवाल विचारला. याऐवजी 'माओवादी संघटना' असा शब्द वापरावा, असं त्यांनी सुचवलं. या विधेयकाच्या जुन्या आणि नव्या मसुद...

July 10, 2025 9:07 PM July 10, 2025 9:07 PM

views 11

गणेशोत्सव हा सण राज्य महोत्सव म्हणून घोषित करणार

    महाराष्ट्राला गणेशोत्सवाची शंभर वर्षांची समृद्ध परंपरा असून हा सण राज्य महोत्सव म्हणून हे सरकार घोषित करेल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज विधानसभेत दिली. हवा तितका निधी या उत्सवासाठी उपलब्ध करून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.

July 10, 2025 8:03 PM July 10, 2025 8:03 PM

views 12

बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधना ऐवजी हरित इंधनाचा वापर सुरु करण्यासाठी मुदतवाढ

मुंबई शहर आणि उपनगरांमधल्या बेकऱ्यांमध्ये पारंपरिक इंधना ऐवजी हरित इंधनाचा वापर सुरु करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं आज मुदतवाढ दिली. तसंच याबाबतची सुनावणी 28 जुलैपर्यंत तहकूब केली.    मुंबई आणि आसपासच्या परिसरात  वायू प्रदूषणाची पातळी गंभीर होत आहे, याबाबत चिंता व्यक्त करत न्यायालयात जनहित य...

July 10, 2025 6:19 PM July 10, 2025 6:19 PM

views 19

राज्यातल्या १ कोटी ७५ लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्याची विधानसभेत घोषणा

राज्यातल्या १ कोटी ७५ लाख शेतमजुरांसाठी विमा योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा जयस्वाल यांनी आज विधानसभेत केली. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गेल्या तीन वर्षांत सर्वात जास्त रक्कम खर्च करण्यात आली आहे, शेतकऱ्यांच्या विविध योजनांवर तीन वर्षात सत्तर हजार कोटींची रक्कम खर्च करण्यात आली आहे...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.