राष्ट्रीय

October 1, 2025 1:44 PM October 1, 2025 1:44 PM

views 53

शैक्षणिक साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात शैक्षणिक साहित्याबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया.   विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी सरकारने शैक्षणिक साहित्यावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वही, ग्राफबुक...

October 1, 2025 1:39 PM October 1, 2025 1:39 PM

views 61

रेपो दर ५.५ टक्के ठेवण्याचा RBIचा निर्णय

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल  न करता साडेपाच टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक आज मुंबईत झाली, त्यानंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती वार्ताहरांना दिली. पतधोरण समितीच्या सदस्यांनी एकमताने रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला असं मल्होत...

October 1, 2025 9:36 AM October 1, 2025 9:36 AM

views 22

तमिळनाडूमध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्पात बांधकाम सुरू असलेली एक कमान कोसळून ९ मजुरांचा मृत्यू

तमिळनाडूमध्ये एन्नोर भेल औष्णिक ऊर्जा प्रकल्पात बांधकाम सुरू असलेली एक कमान कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमधील बहुतेक जण आसाममधील आहेत. जखमींना स्टॅनले सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुप...

October 1, 2025 9:16 AM October 1, 2025 9:16 AM

views 39

प्रधानमंत्री मोदी RSSच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात संघाचा वारसा, सांस्कृतिक योगदान आणि देशाच्या एकात्मतेत संघाची भूमिका या गोष्टी अधोरेखित केल्या जाणार आहेत. पंतप्रधान या प्रसंगी संघाचं देशाप्रती योगदान अधोरेखित करणाऱ्या वि...

October 1, 2025 9:13 AM October 1, 2025 9:13 AM

views 34

RBI द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार

रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसांची बैठक सोमवारी मुंबईत सुरू झाली. आता आज बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा दहा वाजता पतधोरण जाहीर करतील. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता...

October 1, 2025 9:26 AM October 1, 2025 9:26 AM

views 47

UPSच्या निवडीसाठी २ महिन्यांची मुदतवाढ

एकात्मिक निवृत्तिवेतन योजना म्हणजे यूपीएसमध्ये निवडीसाठीच्या मुदतीत सरकारनं दोन महिने वाढ केली आहे. ही मुदत काल संपणार होती. मात्र, आता पात्र कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे कायदेशीर जोडीदार यांना तीस नोव्हेंबरपर्यंत आपली निवड निश्चित करता येणार आहे.   या योजनेत अनेक सकारात...

September 30, 2025 9:12 PM September 30, 2025 9:12 PM

views 53

स्पीड पोस्टचे नवे दर लागू, ओटीपी आधारित सेवाही सुरू होणार

भारतीय टपाल विभागाने आपल्या स्पीड पोस्ट या सेवेसाठी नव्या दरांची घोषणा केली आहे. हे दर उद्यापासून लागू होतील. या नव्या दरांनुसार, ५० ग्रॅम वजनाच्या पोस्ट अथवा पार्सलवर स्थानिक पातळीवर १९ रुपये, २०० किलोमीटर ते २ हजार किलोमीटर अंतरासाठी ४७ रुपये आकारले जातील. ५१ ते अडीचशे ग्रॅम वजनाच्या पार्सलसाठी शह...

September 30, 2025 7:35 PM September 30, 2025 7:35 PM

views 27

ऊस लागवडीशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करणार

देशातल्या ऊस लागवडीशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदे अंतर्गत एक विशेष पथक स्थापन केलं जाईल, असं केंद्रीय कृषी आणि ग्राम  विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषित केलं आहे. ते आज नवी दिल्लीत शाश्वत ऊस अर्थव्यवस्थेवरच्या राष्ट्रीय सल्लामसलत बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या...

September 30, 2025 7:30 PM September 30, 2025 7:30 PM

views 34

दूरसंचार विभागाच्या ‘संचार साथी’ उपक्रमाने मोबाईल चोरीला आळा

दूरसंचार विभागाच्या ‘संचार साथी’ उपक्रमाने, हरवलेले आणि चोरीला गेलेले  6 लाखांपेक्षा जास्त मोबाईल हँडसेट परत मिळवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या यशामुळे नागरिकांचा डिजिटल प्रशासनावरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे. ‘डिजिटल बाय डिझाइन’ या संकल्पनेवर आधारित संचार साथी उपक्रमाने मोबाईल चोरीला आळा घालण...

September 30, 2025 7:12 PM September 30, 2025 7:12 PM

views 13

शांततापूर्ण वातावरण असल्यामुळे लडाख लेहमध्ये सार्वजनिक निर्बंध शिथिल

लडाखमध्ये लेह इथे आज शांततापूर्ण वातावरण असल्यामुळे सार्वजनिक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यामुळे लेहमध्ये स्थानिक नागरिकांनी किराणा, जीवनावश्यक वस्तू आणि भाजीपाला खरेदी केला. तसंच, बांधकामप्रवण क्षेत्रावर कामगारांनी त्यांचं काम पुन्हा सुरू केलं. लेहमध्ये इतर निर्बंध शिथिल करण्य...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.