राष्ट्रीय

October 28, 2025 2:52 PM

views 86

मोंथा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात अतिदक्षतेचा इशारा

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं 'मोंथा' चक्रीवादळ  आज अधिक तीव्र झालं असून ताशी ९० ते १०० किलोमीटर वेगानं ते आज मध्यरात्रीच्या सुमारास आंध्रप्रदेशच्या काकीनाडा जिल्ह्यात मछलीपट्टण ते कलिंगपट्टणच्या दरम्यान थडकण्याची शक्यता आहे.  श्रीकाकुलम, विजयनगरम, विशाखापट्टणम, अनकापल्ली, पूर्व गोदावरी, कोनासीम...

October 29, 2025 9:30 AM

views 36

आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मान्यता

आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींनाही काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना करण्यात आली असून, अठरा महिन्यांच्या आत आयोग शिफारशी करेल. याचा लाभ 50 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. विविध मंत्रालयं, राज्...

October 27, 2025 8:48 PM

views 54

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

 गेल्या दशकभरात सरकारने मेरिटाईम अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत जगात मेरिटाईम क्षेत्रातला सशक्त देश म्हणून उभा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. शहा यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक या परिषदेचं उद्घाटन झालं, तेव्हा ते बोलत होते. गेट वे ऑ...

October 27, 2025 8:49 PM

views 49

भारताची संरक्षण निर्यात २३ हजार ५०० कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची संरक्षण मंत्र्यांची माहिती

भारताची संरक्षण निर्यात आता २३ हजार ५०० कोटी रुपयांच्या विक्रमी स्तरावर पोहोचल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या एसआयडीएम वार्षिक परिषदेला ते आज संबोधित करत होते. गेल्या दशकात देशांतर्गत संरक्षण उत्पादन १ लाख ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढलं  आहे. ना...

October 27, 2025 7:50 PM

views 52

मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे करणार-ECI

मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधे करणार असल्याचं निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. मतदारयाद्या अधिक पारदर्शक आणि निर्दोष करणं हे याचं उद्दिष्ट आहे, असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. दुसऱ्या टप्प्यात सखोल पुनरीक्षण टप...

October 27, 2025 7:49 PM

views 31

जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवायला हवं-एस जयशंकर

जागतिक स्थैर्य आणि शांततेला सर्वात जास्त धोका दहशतवादापासून आहे, त्यामुळे जगानं दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुता धोरण अवलंबवायला हवं असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.  मलेशियातील क्वालालंपूर इथं २०  व्या पूर्व आशिया शिखर परिषदेला ते आज संबोधित करत होते. दहशतवादाशी अजिबात तडजोड के...

October 27, 2025 7:27 PM

views 51

आयसीएआर मधली सर्व रिक्त पद लवकरात लवकर भरावीत- कृषीमंत्री

भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआर मधली सर्व रिक्त पद लवकरात लवकर भरावीत असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत राष्ट्रीय कृषी विद्यार्थी संमेलनात बोलत होते. आपण सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून  त्यांना राज्याच्या कृषी मंत्र्यांशी बोलून ही पदं ता...

October 27, 2025 7:25 PM

views 23

इस्रोनं एलव्हीएम ३ हे प्रक्षेपक वाहन सतीश धवन अंतराळ केंद्रातल्या लाँच पॅडवर पोहचवलं

भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो नं एलव्हीएम -३ हे प्रक्षेपक वाहन श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातल्या लाँच पॅडवर पोहचवलं आहे. या प्रक्षेपक वाहनाची जुळवणी पूर्ण झाली असून ते २ नोव्हेंबरला  अवकाशात प्रक्षेपित केल्या जाणाऱ्या CMS 03 या दूरसंचार उपग्रहाशी जोडलेले आहे. हा उपग्रह भारताच्या म...

October 27, 2025 7:23 PM

views 14

इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेअंतर्गत ७ अर्जांच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं आज इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेअंतर्गत ७ अर्जांच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी दिली, अशी   माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. या  अर्जांमध्ये एकूण ५ हजा...

October 27, 2025 8:48 PM

views 60

सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नावाची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी पुढील सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती सुर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश गवई येत्या २३ नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर न्यायमूर्ती सुर्यकांत हे सरन्यायाधीशपदाची सूत्रं स्वीकारतील. या शिफारशीनंतर केंद्र सरकार ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.