राष्ट्रीय

November 4, 2025 8:03 PM

views 66

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर

आयसीसीनं जाहीर केलेल्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट संघात भारताच्या जेमिमा रॉड्रिग्जने पहिल्या दहा फलंदाजात स्थान मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात केलेल्या शतकी खेळीमुळे तिच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. स्मृती मानधना मात्र अव्वल स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर घस...

November 4, 2025 7:53 PM

views 31

छत्तीसगडमधे प्रवासी रेल्वेगाडी अपघातात ४ मृत्यू, २० जण जखमी

छत्तीसगडमधे बिलासपूर इथे लालखदान परिसरात आज प्रवासी रेल्वेगाडीची मालगाडीशी टक्कर होऊन अपघात झाला. दुर्घटनास्थळी  आतापर्यंत ४ मृतदेह सापडले असून अपघातात २० जण जखमी झाले आहेत. रेल्वे विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू केलं आहे.

November 4, 2025 7:51 PM

views 11

लष्कर क्रीडा परिषद २०२५ला नवी दिल्लीत आजपासून सुरुवात

लष्कर क्रीडा परिषद २०२५ला नवी दिल्लीत आजपासून सुरुवात झाली.  २०३६ च्या ऑलिम्पिकमधे यश मिळवण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा धोरणं, संस्थात्मक चौकट आणि तंत्रज्ञानात्मक नवोन्मेष यांच्यात समन्वय साधण्याबाबत या परिषदेतल्या दोन सत्रांमधे चर्चा झाली. ऑलिम्पिकमधे भारताचा रोडमॅप काय असायला हवा हे ठरवण्यासाठी झालेल्...

November 4, 2025 3:19 PM

views 33

स्टील उत्पादन २०३० पर्यंत ३० कोटी टन तर २०४७ पर्यंत ५० कोटी टन करण्याचं भारताचं उद्दिष्ट

भारताचं स्टील उत्पादन २०३० पर्यंत ३० कोटी टन तसंच २०४७ पर्यंत ५० कोटी टन करण्याचं उद्दिष्ट असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज सीआयआय स्टील शिखर परिषदेच्या उद्घाटनपर सत्रात स्टील मंत्रालयाचे सचिव संदीप पुंडरीक यांनी ही माहिती दिली. गेल्या दशकभरात भारताचं स्टील उत्पादन दुपटीने वाढलं आहे, पाया...

November 4, 2025 1:21 PM

views 25

विद्यार्थ्यांनी शिक्षणाप्रति आस्था ठेवली पाहिजे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

विद्यार्थ्यांनी शिक्षणाप्रति आस्था ठेवली पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी  मुर्मू यांनी केलं आहे. नैनीतालमधे कुमाऊँ विद्यापीठाच्या २०व्या दीक्षांत समारंभाला त्या संबोधित करत होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तराखंड दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नीम करोली बाबांच्या आश्रमात कैंची ध...

November 4, 2025 12:56 PM

views 56

Bihar Elections : पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची मुदत आज संध्याकाळी संपणार आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्याची सर्व पक्षांना आज शेवटची संधी आहे. त्यामुळे रालोआ आणि महाआघाडीच्या सर्व वरिष्ठ नेते आणि स्टार प्...

November 4, 2025 2:29 PM

views 80

मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू

निवडणूक आयोगाने आजपासून एसआयआरचा म्हणजे मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला. नऊ राज्यं आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मिळून  एकंदर ५१ कोटी मतदारांची पडताळणी या मोहिमेत केली जाणार आहे. या मतदारांची पडताळणी करून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याप...

November 3, 2025 8:33 PM

views 44

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार शीगेला

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी असलेली प्रचाराची मुदत उद्या संपत असल्यामुळे आज प्रचार शीगेला पोचली आहे.  रालोआ आणि महागठबंधन या आघाड्यांच्या महत्वाच्या नेत्यांनी आज बिहारच्या वेगवेगळ्या भागात प्रचारसभा आणि रॅली घेतल्या.    प्रधानमंत्री आणि भाजपाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांन...

November 3, 2025 8:32 PM

views 36

रस्ते अपघातात तेलंगणामध्ये १९, तर राजस्थानमधे १४ जणांचा मृत्यू

तेलंगणामध्ये रंगारेड्डी जिल्ह्यात चेवेल्लाजवळच्या मिर्जागुडा-खानापूर रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात एकूण १९ जणांचा मृत्यू झाला. विकाराबाद-हैदराबाद मार्गावर एका ट्रकनं एका दुचाकीच्या मागून पुढं जाण्याचा प्रयत्न करताना आरटीसी बसला धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आ...

November 3, 2025 7:41 PM

views 24

टपाल विभागाच्या विशेष जनसंपर्क अभियानाचा समारोप

दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या टपाल विभागानं गेल्या महिन्याच्या २ ते ३१ तारखेपर्यंत आयोजित केलेल्या विशेष मोहीमेच्या अखेरच्या टप्प्याचा समारोप केला. या मोहिमेअंतर्गत, दूरसंचार मंत्रालयानं २३ हजार चौरस फूट पेक्षा जास्त कार्यालयीन जागा, भंगार आणि टाकाऊ साहित्याच्या विक्रीतून ५७ लाख रुपयांपेक्षा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.