October 10, 2025 2:58 PM October 10, 2025 2:58 PM
146
२०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर
२०२५चा शांततेचा नोबेल पुरस्कार व्हेनेझुएलाच्या मारिया कोरीना मच्याडो यांना जाहीर झाला आहे. व्हेनेझुएलामध्ये नागरिकांच्या लोकशाही हक्कांचं रक्षण आणि हुकुमशाहीपासून लोकशाहीकडे देशाची वाटचाल शांततेत व्हावी, यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नॉर्वेच्या नोबेल समितीनं केली.