राष्ट्रीय

June 18, 2024 11:20 AM

views 43

नीतीन गडकरी यांच्याद्वारे जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नीतीन गडकरी यांनी काल जम्मू आणि काश्मीरमधील रस्ते आणि महामार्ग प्रकल्पाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी श्रीनगर इथं राजभवनमध्ये स्वतंत्र बैठक घेतली. यावेळी या भागात अत्यंत खर्चीक अशी पायाभूत सुविधा उभारणीची आणि रस्ते प्रकल्पांची कामं सुरू केल्याबद्दल जम्मू आणि क...

June 18, 2024 10:11 AM

views 55

वीजदेयकांसंदर्भात केवायसी फसवणूक प्रकरणी कारवाई

वीजजोडणी तसंच वीजबिलासंदर्भात ग्राहकांनी आपली माहिती अर्थात KYC अद्ययावत करावी अशा प्रकारची फसवणूक फोनद्वारे होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर दूरसंचार विभागानं नागरिकांच्या सुरक्षेसाठी कारवाई सुरु केली आहे. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीमध्ये गैरवापर झाल्याच्या तक्रारी असलेले, देशभरातील ३९२ मोबाइल ...

June 18, 2024 9:11 AM

views 33

दार्जिलिंगमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली पाहणी

पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघाताची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल सायंकाळी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली, तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. मृतांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये तर गंभीर जखमींना अडीच लाख रुपये रेल्वेमंत्र्यांनी मदत जाहीर केली. या अपघाताच्या प...

June 17, 2024 8:29 PM

views 47

उत्तर काश्मिर : सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार

उत्तर काश्मिरच्या बांदीपूर जिल्ह्यातल्या अरगामा इथं सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कर, केंद्रीय राखीव पोलिस आणि जम्मू काश्मिर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. दहशतवादी लपलेल्या ठिकाणी सु...

June 17, 2024 8:27 PM

views 44

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलीवन यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. जागतिक हितासाठी भारत-अमेरिका सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.   दरम्यान...

June 17, 2024 8:21 PM

views 32

भारताच्या काही भागात पुढील २ दिवस उष्णतेची लाट

उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीच्या काही भागांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. वायव्य भारताकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट हळूहळू कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू-काश्मीर, उत्तर मध्यप्रदेश आणि आंध्र ...

June 17, 2024 8:34 PM

views 36

वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याचा राहुल गांधी यांचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातल्या रायबरेली आणि केरळमधल्या वायनाड मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातल्या लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा निर्णय घेतला आहे. ते आता रायबरेलीचं प्रतिनिधित्व करतील. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज ही घोषणा केली. ...

June 17, 2024 2:51 PM

views 60

आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी प्रधानमंत्री मोदींनी भद्रासनाचा व्हिडिओ केला शेअर

येत्या २१ जूनला असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर भद्रासन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. भद्रासनामुळे सांधे दुखी कमी होऊन ते मजबूत होतात. रोज भद्रासन केल्यामुळे गुडघेदुखीचा त्रासही कमी होतो, असं  प्रधानमंत्र्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना ...

June 17, 2024 2:36 PM

views 52

मणीपूरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री उच्चस्तरीय बैठक घेणार

मणीपूरमधल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. केंद्र तसंच राज्यातले वरिष्ठ अधिकारी, लष्कर आणि अन्य सुरक्षा दलातले वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होतील.

June 17, 2024 3:20 PM

views 46

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यात चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी आज अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये आंतरराष्ट्री, प्रांतीय आणि परस्पर सहकार्य आदी विषयांवर चर्चा झाल्याचं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.