राष्ट्रीय

June 28, 2024 8:31 PM June 28, 2024 8:31 PM

views 4

ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या १०व्या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव उपस्थित

जागतिक पर्यावरणासमोरच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शाश्वत जीवनशैली महत्वाची असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या १० व्या बैठकीला ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीच्या सुरुवातीला केनियामध्ये ...

June 28, 2024 8:26 PM June 28, 2024 8:26 PM

views 7

भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी विक्रम मिस्री यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती

भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी विक्रम मिस्री यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव मोहन कवात्रा हे १४ जुलै रोजी निवृत्त होत आहेत.    मिस्री हे सध्या राष्ट्रीय संरक्षण सचिवालयात अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. मिस्री यांनी...

June 28, 2024 8:14 PM June 28, 2024 8:14 PM

views 5

भारत आणि टोगो या राष्ट्रांमध्ये उच्चस्तरीय बैठक

भारत आणि टोगो या दोन्ही राष्ट्रांमध्ये असलेल्या संबंधांचा आढावा घेण्यासाठी लोम इथे काल आणि आज उच्चस्तरीय बैठक झाली  आणि ते भविष्यात आणखी दृढ कसे होतील यावर चर्चा करण्यात आली. सामायिक स्वारस्याच्या क्षेत्रीय आणि जागतिक विषयांवर दोन्ही राष्ट्रांनी आपली मतं मांडली. १९६० साली टोगो देशाला स्वातंत्र्य मिळ...

June 28, 2024 8:11 PM June 28, 2024 8:11 PM

views 17

न्यू टेलिकॉम ऍक्ट २०२३ हा कायदा २६ जूनपासून लागू

दूरसंचार नेटवर्कचं संरक्षण आणि नागरिकांसाठी गोपनीयतेचं रक्षण अधिक दृढ करणारा दि न्यू टेलिकॉम ऍक्ट २०२३ हा कायदा २६ जून पासून अंशतः अंमलात आला आहे. यानं १८८५ सालच्या दि इंडियन टेलिग्राफ ऍक्ट आणि १९३३ च्या  दि इंडियन वायरलेस  टेलिग्राफ ऍक्ट  या कायद्यांची जागा घेतली आहे. या नव्या कायद्यामुळे दूरसंचारा...

June 28, 2024 8:06 PM June 28, 2024 8:06 PM

views 14

ब्रेथ एनलायझर संबंधात नवीन नियमांविषयी ग्राहक हित विभागाकडून माहिती

ब्रेथ एनलायझर संबंधात नवीन नियमांविषयी आज ग्राहक हित विभागाकडून माहिती देण्यात आली. वैध मापनशास्त्र अधिनियम २०११ अंतर्गत हे नवीन नियम लागू केले जातील. जे ब्रेथ एनलायझर पुरावा म्हणून वापरण्यात येतील, त्यांनी चाचणीच्या प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन करावं आणि अचूक निदान करावं यासाठी हे नियम आहेत. अशा यंत...

June 28, 2024 8:00 PM June 28, 2024 8:00 PM

views 14

एफएटीएफच्या मूल्यमापन अहवालात भारताला नियमित पाठपुरावा श्रेणीत स्थान

मनीलाँड्रिंग आणि दहशतवादाला पैसा पुरवणं यामुळे तयार होणारे धोके टाळण्यासाठी भारतानं केलेल्या अथक प्रयत्नांची दखल घेत एफएटीएफ अर्थात फायनान्सिअल ॲक्शन टास्क फोर्सनं आपल्या परस्पर मूल्यमापन अहवालात भारताला नियमित पाठपुरावा श्रेणीत स्थान दिलं आहे. या कृती गटाच्या सिंगापूर इथं झालेल्या दोन दिवसीय बैठकीत...

June 28, 2024 2:50 PM June 28, 2024 2:50 PM

views 11

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी तेजी

शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी सुरुवातीला तेजीचं वातावरण दिसून आलं. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टीने उच्चांकी पातळी गाठली.   मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ३०८ अंकांची वाढ नोंदवत ७९ हजार ५५१ अंकांची नवी उंची गाठली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८७ अंकांची वाढ नोंदवत २४...

June 28, 2024 2:46 PM June 28, 2024 2:46 PM

views 6

सार्क देशांमधल्या चलन अदलाबदल सुविधेसाठी नवीन सुधारित चौकट लागू – भारतीय रिझर्व्ह बँक

सार्क देशांमधल्या चलन अदलाबदल सुविधेसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं नवीन सुधारित चौकट लागू केली आहे. या सुधारणेनुसार, २०२४ ते २०२७ या काळात ज्या सार्क देशांच्या मध्यवर्ती बँका चलन अदलाबदल सुविधेचा लाभ घेऊ इच्छितात, त्यांच्याबरोबर द्विपक्षीय करार केले जातील. या सुविधेसाठी सुमारे २५ हजार कोटी रुपयांचा मदत...

June 28, 2024 1:42 PM June 28, 2024 1:42 PM

views 7

वैद्यकीय प्रवेश परीक्षा – नीट मधल्या गैरप्रकारांविषयी लोकसभेत विरोधी पक्षसदस्यांचा गदारोळ

वैद्यकीय प्रवेश परीक्षा - नीट मधल्या गैरप्रकारांविषयी चर्चेची मागणी करत विरोधी पक्षसदस्यांनी गदारोळ केल्यामुळे, आज लोकसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्तावावर आज चर्चा होणार होती. मात्र लोकसभे...

June 28, 2024 1:34 PM June 28, 2024 1:34 PM

views 10

अमरनाथ यात्रेला जम्मूहून प्रारंभ

सुप्रसिद्ध अमरनाथ यात्रेला आजपासून आरंभ झाला. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी यात्रेकरूंच्या पहिल्या तुकडीला जम्मूहून रवाना केलं. पहलगामहून उद्या यात्रा सुरु होईल. प्रशासनानं यात्रेकरूंसाठी ऑनलाईन नोंदणीसोबतच ऑफलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र आणि वैध ...