राष्ट्रीय

October 20, 2025 7:40 PM October 20, 2025 7:40 PM

views 8

अयोध्येतल्या दीपोत्सवाचा नवा विश्वविक्रम

अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर लक्षावधी दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा झाला आणि यावेळी दोन गिनीज विश्वविक्रमही रचण्यात आले. शरयूतीरावर २६ लाख १७ हजार पणत्या लावण्यात आल्या, तर एकाच वेळी २ हजार १२८ भक्तांनी एकाच वेळी आरती म्हटली. या विश्वविक्रमाचं औपचारिक प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.

October 20, 2025 3:03 PM October 20, 2025 3:03 PM

views 34

१ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांचा विशेष रेल्वेगाड्यांमधून प्रवास

देशभरात गेल्या १९ दिवसांत १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी विविध विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. सणासुदीच्या निमित्ताने रेल्वे मंत्रालयाने विविध विभागांमधून विशेष गाड्या सोडल्या होत्या. यात सर्वात जास्त म्हणजे १ हजार ९९८ मध्य रेल्वेकडून, त्याखालोखाल १ हजार ९...

October 20, 2025 2:32 PM October 20, 2025 2:32 PM

views 183

Bihar Election : दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. या टप्प्यात वीस जिल्ह्यातल्या १२२ मतदारसंघांमधे मतदान होणार असून यासाठी १ हजार ६६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पहिल्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतही आज संपणार आहे. या टप्प्यात १२१ जागांसाठी १ हजार...

October 20, 2025 2:57 PM October 20, 2025 2:57 PM

views 20

दिवाळीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा हा सण अंध:कारावर प्रकाशाच्या, अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अर्धमावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे. देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदे...

October 20, 2025 3:08 PM October 20, 2025 3:08 PM

views 36

सर्वत्र दीपावलीचा उत्साह

दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. राज्यात आज नरकचतुर्दशीनिमित्त घरोघरी चंद्रोदयापूर्वी अभ्यंगस्नान करुन, फटाके फोडून आणि दिवाळीचा फराळ करुन सर्वांनी सणाचा आनंद लुटला. सणानिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत आहेत. घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्...

October 20, 2025 3:08 PM October 20, 2025 3:08 PM

views 44

GST Reforms : जाणून घ्या, घर खरेदी क्षेत्रातला बदल…

२२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जीएसटी बचत उत्सवाचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. आज जाणून घेऊ या जीएसटी सुधारणांमुळे घर खरेदी क्षेत्रात झालेल्या बदलांबद्दल…   जीएसटी प्रणालीतल्या सुधारणांमुळे घर बांधणीसाठीची सामग्री आणि पर्यायाने एकंदर खर्च कमी होऊन या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. सिमें...

October 21, 2025 9:26 AM October 21, 2025 9:26 AM

views 14

राष्ट्रपती मुर्मू आजपासून ४ दिवसांच्या केरळ दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून केरळच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहे. राष्ट्रपती आज तिरुअनंतपुरम इथं पोहोचतील. त्या उद्या सबरीमला मंदिरात दर्शन घेणार आहेत. तिरुअनंतपुरम इथल्या राजभवन इथं गुरुवारी माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन पुतळ्याचं अनावरण त्या करतील. श्री नारायण गुरु समाधीच्या शताब्दी ...

October 19, 2025 8:24 PM October 19, 2025 8:24 PM

views 38

दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तिरावर आज २६ लाखापेक्षा जास्त दीप उजळणार

भगवान श्री राम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी उत्तरप्रदेशात शरयू नदीच्या किनाऱ्यावर आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव साजरा होत असून, यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. राम की पौडी इथल्या  ५६ घाटांवर आज २६ लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जातील. या दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची अध्यात्मिक आण...

October 19, 2025 8:24 PM October 19, 2025 8:24 PM

views 25

चांद्रयान-२ नं साध्य केलं विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश 

चांद्रयान-२ नं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या ‘कोरोनल मास इजेक्शन’ चा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच  टिपला असून, हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्त्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे.  चांद्रयान-२ नं टिपलेल्या न...

October 19, 2025 3:04 PM October 19, 2025 3:04 PM

views 26

इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं काँग्रेसचं आवाहन

बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं आवाहन काँग्रेसनं केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. मात्र इंडिया आघाडीचं जागावाटपाचं सूत्र जाहीर झालं नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक मतदारसंघात काँ...