राष्ट्रीय

July 2, 2024 6:12 PM July 2, 2024 6:12 PM

views 10

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली

आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपाच्या बांसुरी स्वराज यांनी आज हक्कभंगाची नोटीस बजावली. राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितलेल्या काही गोष्टी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असून त्याकरता त्यांच्यावर कारवाई करावी असं स्वराज यांनी या नोटिशीत म्हटलं आहे...

July 2, 2024 2:38 PM July 2, 2024 2:38 PM

views 6

देशाची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर असूनही देशात दरडोई उत्पन्न कमी – अखिलेश यादव

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावावरची चर्चा संसदेच्या दोन्ही सभागृहात पुढं सुरु झाली. देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर असूनही देशात दरडोई उत्पन्न कमी असल्याबद्दल समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांनी सवाल उपस्थित केला. स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटल्याच्या प्रकरणाचा उल्लेख करुन ...

July 2, 2024 2:24 PM July 2, 2024 2:24 PM

views 12

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर शांघाय सहकार्य संघटना परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार

कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली अस्ताना इथं ४ जुलैपासून  होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटना परिषदेत सहभागी होणाऱ्या भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर करणार आहेत.  शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची ही २४ वी बैठक असून या बैठकीत गेल्या दोन दशकातल्या विविध ...

July 2, 2024 2:53 PM July 2, 2024 2:53 PM

views 14

संसद सभागृहात सदस्यांनी लोकशाही तत्त्वांचं पालन करण्याचं प्रधानमंत्री मोदी यांचं आवाहन

संसद सभागृहात लोकशाही तत्त्वांचं आणि नियमांचं पालन काटेकोरपणे करावं असं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत केलं, असं रिजिजू म्हणाले. संसदेतले लोकनियुक्त प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर देशसेवेची जबाबदारी असते, यावर प्रधानमंत्र्यांनी बैठकीत भर दिला. पर्यावरण, पाणी, आणि इतर सामाज...

July 2, 2024 1:13 PM July 2, 2024 1:13 PM

views 7

उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

उत्तर भारतातल्या अनेक राज्यांत आज मुसळधार पाऊस पडण्याचा  अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदिगढ, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार या राज्यांमध्ये पुढचे तीन ते चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरही मुसळधार पाऊस होईल, असा अंद...

July 2, 2024 1:05 PM July 2, 2024 1:05 PM

views 13

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी

कथित मद्य घोटाळा प्रकरणी कारागृहात असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज न्यायमूर्ती नीना बन्सल क्रिष्णा यांच्या पीठासमोर सुनावणी होणार आहे. सीबीआयने आपल्याला अटक करण्यासाठी कोणताही नवा पुरावा सादर केला नाही असं केजरीवाल यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आह...

July 2, 2024 10:20 AM July 2, 2024 10:20 AM

views 9

यूपीएससी : नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४चे निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ चे निकाल काल जाहीर केले. जे उमेदवार पात्र ठरले आहेत त्यांना मुख्य परीक्षेसाठी पुन्हा एकदा तपशीलवार अर्ज करावे लागणार आहेत. आयोगाच्या वेबसाइटवर याबाबतचे तपशील आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.

July 2, 2024 8:34 AM July 2, 2024 8:34 AM

views 7

नव्या फौजदारी कायद्यांमुळे न्यायप्रक्रियेला गती मिळेल – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

देशभरात कालपासून लागू झालेल्या सुधारित फौजदारी कायद्यांमध्ये दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं असून, न्यायप्रक्रियेला गती मिळेल, असा विश्वास, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते. सुधारित कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायपालिका तसंच पोलिस प्रशासन...

July 2, 2024 10:11 AM July 2, 2024 10:11 AM

views 15

राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेत सुधारणांसाठी सूचना आणि प्रतिक्रिया पाठवण्याचं विद्यार्थी-पालकांना आवाहन

राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेत सुधारणांसाठी सरकारनं विद्यार्थी आणि पालकांकडून सूचना आणि प्रतिक्रिया मागवल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं समाजमाध्यमांवरच्या संदेशात याबाबत माहिती दिली आहे. डॉ. के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली आहे. या महिन्याच्या सात तारखेपर्यंत परीक्षेच्...

July 1, 2024 8:10 PM July 1, 2024 8:10 PM

views 7

कौटुंबिक  निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचं प्रभावी निवारण करणाऱ्या मोहिमेचा प्रारंभ

कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत, कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारीचं प्रभावी निवारण करणाऱ्या मोहिमेचा प्रारंभ केला. कौटुंबिक निवृत्तीवेतन योजनेत करण्यात आलेल्या नव्या सुधारणा महिलांसाठी फायदेशीर ठरतील, असं जितेंद्र सिंह यांनी यावेळी सा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.