राष्ट्रीय

July 4, 2024 3:17 PM July 4, 2024 3:17 PM

views 9

नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधीशी संबंधित नियमांमध्ये बदल

संसद अधिवेशनादरम्यान लोकसभेत खासदारांच्या शपथविधीच्या वेळी घोषणाबाजी झाल्यानंतर सभापती ओम बिरला यांनी त्यासंबंधीच्या नियमात बदल केला आहे. सुधारित नियमानुसार कोणत्याही सदस्याला शपथ घेतेवेळी शपथेच्या मजकुराव्यतिरिक्त इतर काहीही घोषणा किंवा शेरा देता येणार नाही.  

July 4, 2024 8:44 AM July 4, 2024 8:44 AM

views 3

देशात ९६ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या फाईव्ह-जी स्पेक्ट्रमच्या तरंगांचा नवा लिलाव सुरु

देशानं ९६ हजार कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या फाईव्ह-जी स्पेक्ट्रमच्या तरंगांचा नवा लिलाव कालपासून सुरु केला आहे. या लिलावात फाईव्ह जी स्पेक्ट्रमच्या ८ बँड चा समावेश असून या तरंगांच्या उत्सर्जनाचा अधिकार मिळवण्यासाठी फाईव्ह जी मोबाइलची सेवा पुरवणाऱ्या मोठ्या उद्योजक कंपन्या रस घेतील असा अंदाज आहे. य...

July 3, 2024 8:24 PM July 3, 2024 8:24 PM

views 10

झारखंडमधे सरकार स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राज्यपालांकडे दावा

झारखंडमधे सरकार स्थापनेसाठी माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा राज्यपालांकडे दावा झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणार आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या इंडी आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीत सोरेन यांच्या ना...

July 3, 2024 8:25 PM July 3, 2024 8:25 PM

views 8

देशाची राज्यघटना प्रत्येक सरकारसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेचं कामकाज आज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेचं कामकाज कालच संस्थगित करण्यात आलं होतं. त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित झालं आहे.   तत्पूर्वी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभारप्रस्तावावर राज्यसभेत झालेल्या चर्चेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां...

July 3, 2024 7:22 PM July 3, 2024 7:22 PM

views 11

हाथरस जिल्ह्यात झालेल्या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये देण्याची घोषणा

उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यातल्या फुलराई गावात सत्संगादरम्यान चेंगराचेंगरीमुळे झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज भेट घेतली. त्यानंतर मंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर...

July 3, 2024 7:33 PM July 3, 2024 7:33 PM

views 16

शेअर बाजार निर्देशांकानं ओलांडली ८० हजारांची उच्चांकी पातळी

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज व्यवहार सुरु होतानाच जोरदार उसळी घेत विक्रमी ८० हजारांचा टप्पा पार केला. शेअर बाजाराची ही आतापर्यंतची उच्चांकी पातळी आहे. सेंसेक्स ५७२ पूर्णांक ३२ अंकांच्या वाढीसह ८० हजार १३ अंकांवर उघडला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील १६७ अंकांच्या वाढीसह २४ हजार २९१...

July 3, 2024 2:29 PM July 3, 2024 2:29 PM

views 6

भारताच्या पहिल्या सौर यान आदित्य एल-1ची एल-1 बिंदू भोवतीची पहिली प्रभामंडळ प्रदक्षिणा पूर्ण

भारताच्या पहिल्या सौर मोहिमेअंतर्गत प्रक्षेपित केलेल्या आदित्य एल वन यानानं अंतराळात पृथ्वी आणि सूर्य यांच्यातल्या लॅग्रेंज पॉइंट एल वन  इथं आपली पहिली प्रभामंडळ प्रदक्षिणा पूर्ण केली आहे. आदित्य एल वन नं आपल्या दुसऱ्या प्रभामंडळ कक्षेतलं स्थानांतरण यशस्वीरीत्या केल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था,...

July 3, 2024 1:37 PM July 3, 2024 1:37 PM

views 5

हाथरस इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांना राज्यसभेत आदरांजली

राज्यसभेचं  आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर उत्तर प्रदेशात हाथरस इथं झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांना आदरांजली वाहण्यात आली. या घटनेतील जखमींना वैद्यकीय मदत देण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी दिली.    ...

July 3, 2024 1:43 PM July 3, 2024 1:43 PM

views 8

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणं हा भारताचा दृष्टिकोन – मंत्री अश्विनी वैष्णव

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचा वापर करून तंत्रज्ञानाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचवणं, हा भारताचा दृष्टिकोन असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. वैष्णव यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत भारत जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेला प्रारंभ झाला, त्यावेळी ...

July 3, 2024 10:01 AM July 3, 2024 10:01 AM

views 14

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, ३८ नागरिकांचा मृत्यू

आसाममध्ये पूरस्थिती आणखी गंभीर झाली आहे. २८ जिल्ह्यांतील ११ लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला असून पुरामुळे मृतांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. राज्यातील ८४ महसुली मंडळातील २ हजार २०८ गावांचं पुरामुळे मोठं नुकसान झालं असून ४२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचंही नुकसान झालं आहे. ब्रह्मपुत्र, बराक आ...