राष्ट्रीय

July 6, 2024 10:19 AM July 6, 2024 10:19 AM

views 13

स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य

स्वयंपाकघराची सुरक्षितता, गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी भारतीय मानक संघटना BIS चं पालन करणं अनिवार्य केलं आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग DPIIT ने जारी केलेल्या आदेशानुसार, अशा भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य आहे...

July 6, 2024 10:10 AM July 6, 2024 10:10 AM

views 11

कम्युनिटी इनोव्हेटर फेलोच्या पदवीप्रदान सोहळ्यात स्टोरीज ऑफ चेंजच्या दुसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन

अटल इनोव्हेशन मिशनच्या वतीने कम्युनिटी इनोव्हेटर फेलो च्या दुसऱ्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा काल नवी दिल्लीत नीती आयोगाने आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्टोरीज ऑफ चेंज च्या दुसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं. जगाला एक चांगलं स्थान बनवण्यासाठी आवश्यक असलेला बदल घडवून आणण्याच्या उत्कटतेने जगण्या...

July 6, 2024 9:56 AM July 6, 2024 9:56 AM

views 6

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य पदकांचं वितरण

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले. काल संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आलेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये 10 कीर्ती चक्र आणि 26 शौर्य चक्रांचा समावेश...

July 6, 2024 9:46 AM July 6, 2024 9:46 AM

views 10

5G, 6G आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित हॅकाथॉन स्पर्धेचं सप्टेंबरमध्ये आयोजन

भारत WTSA24 अर्थात जागतिक दूरसंचार प्रमाणीकरण संघटनेसोबत यंदा सप्टेंबरमध्ये 5G, 6G आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर आधारित हॅकाथॉन स्पर्धेचं आयोजन करणार आहे. या उपक्रमाचा उद्देश नवोन्मेषक, आघाडीचे उद्योजक आणि शिक्षणतज्ञांना एकत्र आणून भविष्यातील दूरसंचार तंत्रज्ञानाचा शोध घेणं आहे. हॅकाथॉन दूरसंचार क्षेत...

July 6, 2024 9:23 AM July 6, 2024 9:23 AM

views 8

पेन्शन तक्रार निवारण मोहिमेत पहिल्याच आठवड्यात 1 हजाराहून अधिक प्रकरणांच निवारण

कौटुंबिक पेन्शनच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मोहिमेच्या पहिल्या आठवड्यात एक हजाराहून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या कौटुंबिक पेन्शनधारकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने 1 जुलैपासून महिनाभराची कौटुंबिक निवृत्ती वेतन तक्र...

July 5, 2024 8:22 PM July 5, 2024 8:22 PM

views 10

उपराष्ट्रपती जगदीप धनखड दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या दोन दिवसांच्या केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या सकाळी तिरुअनंतपुरम इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या १२ व्या पदवीदान समारंभाला ते उपस्थित राहणार आहेत. सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सुवर्णपदकं प्रदान करणार आहेत. या पदवीदान समार...

July 5, 2024 8:18 PM July 5, 2024 8:18 PM

views 9

फॅटी लिव्हर आजाराची चाचणी तातडीनं तयार करण्याची गरज – मंत्री डॉ. जितेंद्र सिंह

फॅटी लिव्हर या यकृताच्या आजाराच्या विविध स्तरांचं सहज निदान करता यावं यासाठी सोपी आणि परवडणाऱ्या दराची निदान चाचणी तातडीनं तयार करण्याची गरज असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत, यकृत आणि पित्तविषयक विज्ञान संस्थेत यकृताचे आजार टाळण्यासाठी...

July 5, 2024 8:39 PM July 5, 2024 8:39 PM

views 5

२०२३-२४ या वर्षात देशात संरक्षण सामुग्रीचं विक्रमी उत्पादन

देशात २०२३-२४ या वर्षांत संरक्षण सामुग्रीचं विक्रमी मूल्याचं उत्पादन झालं. २०२३-२४ या वर्षांत उत्पादन मूल्य सुमारे एक लाख २६ हजार ८८७ कोटी रुपयांपर्यंत होतं. ही वाढ गेल्यावर्षीच्या तुलनेत १६ पूर्णांक ८ शतांश टक्क्यांहून अधिक आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मेक इन इंडिया कार्यक्र...

July 5, 2024 7:49 PM July 5, 2024 7:49 PM

views 22

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव

भारतीय रेल्वे यावर्षी २ हजार ५०० जनरल कोच डब्यांचं उत्पादन करणार आहे त्याशिवाय १० हजार डब्यांचं उत्पादनही नंतर घेतलं जाणार आहे, असं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. भारतीय रेल्वेचं गतीशक्ती विश्वविद्यालय आणि एअरबस ही खाजगी विमान उत्पादक कंपनी यांच्यामधल्या सामंजस्य करारावर स्...

July 5, 2024 7:42 PM July 5, 2024 7:42 PM

views 7

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या नीट-पीजी प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीच्या नीट - पी जी प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक राष्ट्रीय परीक्षा महामंडळानं आज जाहीर केलं. त्यानुसार नीट - पी जी प्रवेश परीक्षा २०२४ ही आता ११ ऑगस्ट या दिवशी दोन सत्रात घेतली जाणार आहे. ही परीक्षा गेल्या महिन्यात, परीक्षेच्या आदल्या दिवशी पुढे ढकलण्यात आली होती.