राष्ट्रीय

November 17, 2025 9:27 AM

views 38

लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्र्यांचं मत

लोकशाहीमध्ये पत्रकारितेची भूमिका महत्त्वाची आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय वृत्तपत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलं. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन,  प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई य...

November 16, 2025 8:03 PM

views 19

मंत्री एस जयशंकर आणि कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्यात चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्यात पश्चिम आशियातल्या घडामोडींविषयी तसंच इतर जागतिक मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक यासह धोरणात्मक विषयावर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाधमाध...

November 16, 2025 7:55 PM

views 33

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या तिघांवर १५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. आत्तापर्यंत तीन मृतदेह सापडले आहेत, तसंच एक रायफल, बीजीएल लॉन्चर्स, इतर शस्त्रास्त्रं आणि स्फोटकं जप्त केली आहेत. तुमालपाड भागातल्या...

November 16, 2025 7:43 PM

views 32

पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोचवते – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

देशातल्या सकारात्मक घडामोडींनी युवा पिढीमध्ये आशावाद निर्माण केला असून, यात माध्यमांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं  ‘मनोरमा न्यूजमेकर पुरस्कार २०२४’ निमित्त आयोजित समारंभात बोलत होते. पत्रकारिता दुर्बल घटकांचा आवाज जगापर्यंत पोहोच...

November 16, 2025 6:44 PM

views 23

विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नाही – राज्यपाल आचार्य देवव्रत

रसायनांच्या अतिवापरामुळे शेतजमीन ओसाड झाली असून विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी नैसर्गिक शेतीला पर्याय नाही, असं राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत राजभवनात संकल्प फाउंडेशनतर्फे ‘नैसर्गिक कृषी - अनुपम भारतीय वारसा’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात बोलत होते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गि...

November 16, 2025 4:38 PM

views 27

४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात दाखवण्यात आला देशातल्या डिजिटल परिसंस्थेच्या परिवर्तनाचा प्रवास

नवी दिल्लीत आयोजित ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात डिजिटल इंडिया मंडपामधे देशातल्या डिजिटल परिसंस्थेच्या परिवर्तनाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यात डिजिलॉकर, उमंग, माय स्कीम, नीक्सी, नील्ट सर्ट इन, भारत सेमिकंडक्टर मिशन आणि आधार यांचा समावेश आहे. डिजिटल इंडिया उपक्रमाद्वारे डिजिटल सक्षमी...

November 16, 2025 3:53 PM

views 68

आज राष्ट्रीय पत्रकारिता दिन

राष्ट्रीय पत्रकारिता दिन आज साजरा होत आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना या दिवशी १९६६मधे झाली होती. वर्तमानपत्रं आणि प्रसारमाध्यमांवर नैतिकदृष्ट्या देखरेख ठेवण्याचं काम ही संस्था करते. पत्रकारितेची स्वतंत्रता आणि जबाबदारी यांचं ते प्रतीक मानलं जातं. पत्रकारितेतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे राष्ट्...

November 16, 2025 4:51 PM

views 22

‘डोकलाम’ आणि ‘चो-ला’ ही ठिकाणं पर्यटकांसाठी खुली करण्याचा सिक्कीम सरकारचा निर्णय

सीमावर्ती भागातल्या पर्यटनाला चालना देण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, सिक्कीम सरकारने ‘डोकलाम’ आणि ‘चो-ला’ ही धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणं पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. सिक्कीमच्या पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सी.एस. राव यांनी वार्ताहर परिषदेत ही माह...

November 16, 2025 3:00 PM

views 27

मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील -हवामान विभाग

मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पूर्व राजस्थान, झारखंड आणि उत्तरप्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी आज थंडीची लाट राहील, तर तामिळनाडू आणि करैकलमध्ये आज जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राजधानी दिल्ली परिसरात ...

November 16, 2025 2:51 PM

views 29

भारतीय राजदूत पुनित रॉय कुंडल यांनी भारतीय प्रदर्शनासाठी अध्यक्ष मार्सेलो रेबेलो दे सूझा यांचे स्वागत केले

पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथं सुरूअसलेल्या डिप्लोमॅटिक बझार २०२५मधल्या भारताच्या प्रदर्शनाला पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रेबेलो दे सूझा यांनी काल भेट दिली. भारताचे पोर्तुगालमधले राजदूत पुनीत रॉय कुंडल यांनी त्यांचं स्वागत केलं. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भारत-पोर्तुगाल यांच्यातल्या राजनैत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.