राष्ट्रीय

August 6, 2024 7:03 PM August 6, 2024 7:03 PM

views 1

बांगलादेशातल्या भारतीय नागरिकांशी सातत्यानं संपर्कात असल्याची केंद्र सरकारतर्फे संसदेत ग्वाही

बांगलादेशात निर्माण झालेलं अस्थिर आणि अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तिथं असलेल्या भारतीय नागरिकांशी केंद्र सरकार राजनैतिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यानं संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी लोकसभा आणि राज्यसभेत दिली. बांगलादेशात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत जयशंकर या...

August 6, 2024 3:11 PM August 6, 2024 3:11 PM

views 13

उत्तराखंड : ट्रेक मार्गावर अडकलेल्या १४००हून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

उत्तराखंडमध्ये केदार खोऱ्यात हवामानात सुधारणा झाल्यानं १४०० हून अधिक लोकांना भारतीय वायुसेनेनं हेलिकॉप्टरच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवलं. हे सगळेजण पावसामुळं खचलेल्या ट्रेक मार्गावर अडकून पडले होते. याशिवाय वायुदलांनं राज्य सरकारच्या हेलिकॉप्टरद्वारे १३६ यात्रेकरूंची सुखरूप सुटका केली. तर ५०९ यात्...

August 6, 2024 3:06 PM August 6, 2024 3:06 PM

views 12

येत्या २ ते ३ दिवसांत देशात पावसाचा अंदाज

येत्या २ ते ३ दिवसांत देशाच्या पूर्व आणि वायव्य भागात जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्कीम, झारखंड, बिहार, ओडिशा या भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तामिळनाडू, पश्चिम राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधेही आज तर...

August 6, 2024 3:03 PM August 6, 2024 3:03 PM

views 16

‘देशात आतापर्यंत १ कोटी ९२ लाख सीम कार्डांची सेवा खंडित करण्यात आली’

सायबर गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या उद्देशानं देशभरात आतापर्यंत १ कोटी ९२ लाख सीम कार्डांची सेवा खंडित करण्यात आल्याची माहिती आज राज्यसभेत अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. सायबर घोटाळा प्रकरणात सरकार शून्य सहिष्णूता धोरण अमलात आणत असल्याचं त्यांनी सांगितलं.

August 6, 2024 2:58 PM August 6, 2024 2:58 PM

views 10

देशात गेल्या १० वर्षात नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात ओसरला – गृह राज्यमंत्री नित्यानंद राय

देशात गेल्या १० वर्षात नक्षलवादाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात ओसरल्याचं गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. २००४ ते १४ या कालावधीच्या तुलनेत २०१४ ते २४ या काळात नक्षलवादी घटनांचं प्रमाण ५३ टक्क्यांनी कमी झालं आहे, असं ते म्हणाले. देशात नक्षलवादाचा प्रभाव अ...

August 6, 2024 3:42 PM August 6, 2024 3:42 PM

views 18

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी’ हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या फिजीच्या दौऱ्यावर असून त्यांना आज ‘द कंपॅनियन ऑर्डर ऑफ फिजी’ हा फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. फिजीचे राष्ट्राध्यक्ष विलयम काटोनिवेरे यांनी त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलं. फिजीच्या लष्कराकडून मुर्मू यांना ‘गार्ड ऑफ द ऑनर’ सुद्धा देण्यात आला. ...

August 6, 2024 3:39 PM August 6, 2024 3:39 PM

views 8

बांगलादेशातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारची सर्वपक्षीय बैठक

बांगलादेश मधल्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने आज नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज या मुद्द्यावर सर्व नेत्यांना माहिती दिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री तसंच भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा...

August 6, 2024 3:36 PM August 6, 2024 3:36 PM

views 9

बांगलादेशात लष्कर आणि राजकीय नेत्यांनी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं संयुक्त राष्ट्रांचं आवाहन

बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर तिथल्या लष्करी आणि राजकीय अधिकाऱ्यांनी देशात शांततापूर्ण लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येऊन काम करावं, असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं आहे. बांगलादेशच्या नागरिकांचे लोकशाही आणि मानवी हक्क अबाधित राहावेत,...

August 6, 2024 1:40 PM August 6, 2024 1:40 PM

views 10

बांग्लादेशातल्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, युनायटेड किंगडमची मागणी

बांग्लादेशमधल्या सध्याच्या परिस्थितीची संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली चौकशी व्हायला हवी, अशी मागणी युनायटेड किंगडमच्या सरकारनं केली आहे. बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या निवासस्थानामध्ये घुसून काल आंदोलकांनी तोडफोड केली. त्यानंतर शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि ल...

August 6, 2024 11:34 AM August 6, 2024 11:34 AM

views 5

अमरनाथ यात्रेसाठी आणखी एक तुकडी रवाना

अमरनाथ यात्रेसाठी १,८७३ यात्रेकरूंची आणखी एक तुकडी जम्मूतल्या भगवती नगर यात्री निवास इथल्या तळ शिबिरातून काश्मीर खोऱ्याच्या दिशेनं रवाना झाली. ६९ वाहनांच्या या ताफ्यात पंधराशे ७९ पुरुष, २०२ महिला, ६५ साधू आणि २७ साध्वीचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.