राष्ट्रीय

August 11, 2024 8:44 PM August 11, 2024 8:44 PM

views 5

श्रीमचैलमाता यात्रेला सुमारे १ लाखाहून अधिक भाविकांची हजेरी

जम्मू काश्मीरमधल्या किश्तवाड जिल्ह्यातल्या  वार्षिक श्रीमचैलमाता  यात्रेला सुमारे १ लाखाहून अधिक भाविकांनी हजेरी लावली आहे.  किश्तवाड प्रशासनानं यात्रेला भेट देणाऱ्या भाविकांसाठी 4-G कनेक्टिव्हिटी, हेलिकॉप्टर सेवा आणि ऑनलाइन नोंदणी आदी  सुविधा उपलब्ध  करून दिल्या होत्या. जम्मू काश्मिरचे नायब राज्यपा...

August 11, 2024 8:29 PM August 11, 2024 8:29 PM

views 6

मुसळधार पावसामुळं पंजाबच्या अनेक जिल्ह्यांतलं जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळं पंजाबच्या अनेक जिल्ह्यांतलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आजचा पाऊस हा या मान्सूनमधला पहिला पाऊस असून  हवामान विभागानं राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकलेल्या गाडीतले ११ जण वाहून...

August 11, 2024 8:14 PM August 11, 2024 8:14 PM

views 7

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार – डॉ. एस. जयशंकर

मालदीव हा हिंद महासागर क्षेत्रातला भारताचा महत्त्वाचा भागीदार असून, दोन्ही देशांमधल्या परस्पर सहकार्यानं पारंपारिक स्वरुपाच्या पलीकडे मजल मारली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. जयशंकर यांच्या हस्ते आज मालदीव इथल्या अड्डू रेक्लमेशन अँड अड्डू शोअर प्रोटेक्शन या सागरी ...

August 11, 2024 8:11 PM August 11, 2024 8:11 PM

views 9

तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच मायदेशी आगमन

फिजी, न्यूझीलंड आणि तिमोर लेस्ते या तीन देशांचा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज संध्याकाळी नवी दिल्लीत परतल्या. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासोबतच महत्त्वाच्या मुद्यांबाबत सामंजस्य करार आणि द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तिथल्या भारतीय समुदायाशी जोडणं, हाही या...

August 11, 2024 1:52 PM August 11, 2024 1:52 PM

views 5

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत २ जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील आनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. चकमकी दरम्यान,  गंभीर जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्‍यांचा मृत्यू झाला. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या चकमकीत दोन नागरिकही जखमी झाले. कालपासून सुरू झाल...

August 11, 2024 1:33 PM August 11, 2024 1:33 PM

views 4

सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी संवाद आणि सहकार्याची गरज – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

सुदृढ आणि सशक्त लोकशाहीसाठी संवाद आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्ली येथे नवनिर्वाचित संसद सदस्यांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय अभिमुखता कार्यक्रमाच्या समारोप  सत्राला संबोधित करताना ते बोलत होते.  भारत जगातील सर्वात मोठ...

August 11, 2024 6:42 PM August 11, 2024 6:42 PM

views 10

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ

देशातल्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या कृषी विज्ञान केंद्रात अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या, आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ झाला....

August 11, 2024 1:17 PM August 11, 2024 1:17 PM

views 9

आज नीट पदव्यूत्तर प्रवेश परीक्षा…

नीट पदव्यूत्तर प्रवेश परीक्षा आज होत  आहे. नॅशनल मेडिकल सायन्स एक्झामिनेशन बोर्ड  दोन सत्रांमध्ये  ही परीक्षा घेणार आहे. सुमारे दोन लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश परीक्षेला बसले आहेत. जूनमध्ये परीक्षेच्या नियोजित तारखेच्या एक दिवस आधी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.  स्पर्धा परीक्षांवर झालेल्या ...

August 11, 2024 1:10 PM August 11, 2024 1:10 PM

views 8

माजी परराष्ट्रमंत्री के. नटवरसिंह यांचं निधन

माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंग यांचं काल रात्री दिल्लीजवळच्या गुरुग्राममध्ये दीर्घ आजारानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. काही काळ त्यांची तब्येत बरी नव्हती. त्यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार होणार असल्याचं त्यांच्या कौटुंबियांनी सांगितलं. नटवर सिंह यांचा जन्म १९३१ मध्ये राजस्थानच्य...

August 11, 2024 1:36 PM August 11, 2024 1:36 PM

views 10

अमेरिकेतल्या हिंडेनबर्गकडून करण्यात आलेल्या आरोपांचे सेबीकडून खंडन

सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी अमेरिकेतल्या हिंडेनबर्ग या गुंतवणूक आणि संशोधन संस्थेनं केलेले आरोप फेटाळले आहेत. बुच दांपत्याचा अदानी समुहाशी संबंधित ऑफ-शोअर संस्थांमध्ये सहभाग असल्याचा आरोप हिंडनबर्गनं केला होता. यासंदर्भात धवल  बुच यांनी एक निवेदन जारी केलं असून, आप...