राष्ट्रीय

September 7, 2024 7:43 PM

views 23

जम्‍मू काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

विधानसभा निवडणुकीनंतर जम्‍मू काश्‍मीरला पुन्हा राज्याचा दर्जा दिला जाईल, असं आश्‍वासन भाजपचे वरिष्‍ठ नेता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज दिलं. ते  जम्‍मूमध्ये जाहीर प्रचार सभेत बोलत होते.  आगामी विधानसभा निवडणूक ऐतिहासिक असल्याचं ते म्हणाले. कलम ३७० हटवल्यानंतर जम्‍मू काश्‍मीरमध्ये पहिल्या...

September 7, 2024 8:07 PM

views 26

सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह

आज भाद्रपद शुक्ल चतुर्थी. ११ दिवसांच्या गणेशोत्सवाला आज सर्वत्र मोठ्या उत्साहात प्ररंभ झाला. राज्यात ढोलताशांच्या गजरात गणरायाचं घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये आगमन झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक मुंबई - पुण्यात आले आहेत. या उत्सव काळात राज्यात सुमार...

September 7, 2024 6:41 PM

views 46

गणेशचतुर्थीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांच्या देशवासीयांना शुभेच्छा

गणेशचतुर्थीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण देशातल्या अनेक भागात एकत्रित येऊन साजरा केला जातो आणि हे  सामाजिक ऊर्जेचे एक चांगले उदाहरण आहे. असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हट...

September 7, 2024 7:27 PM

views 20

पूजा खेडकर भारतीय प्रशासकीय सेवेतून पदमुक्त

वादग्रस्त परिविक्षार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना केंद्र सरकारने तत्काळ भारतीय प्रशासकीय सेवेतून मुक्त केलं आहे. याबाबतचा आदेश काल जारी करण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत फसवणूक करणं, गैरमार्गाने इतर मागासवर्गीय प्रवर्ग आणि दिव्यांग उमेदवारांसाठी असलेल्या सवलती लाटणं असे आरोप पूजा...

September 7, 2024 3:23 PM

views 12

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमातंर्गत आतापर्यंत १ कोटी ३७ लाख उपक्रम

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमातंर्गत आतापर्यंत १ कोटी ३७ लाख उपक्रम राबवण्यात आले आहेत. १ सप्टेंबर पासून सुरु झालेल्या राष्ट्रीय पोषण महाची सुरुवात गुजरातमधून झाली होती. या कार्यक्रमातंर्गत रक्ताची कमतरता, वाढ नियंत्रण, मोफत आहार, पोषण भी पढाई भी हे उपक्रम नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं राबवण्यात आले. ...

September 7, 2024 3:17 PM

views 18

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकांचं आगमनही मुंबई - पुण्यात झालं आहे. दहा दिवस चालणाऱ्य...

September 7, 2024 2:03 PM

views 12

आयआयटी मुंबईला गेल्या आर्थिक वर्षात संशोधन आणि विकासासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी

आयआयटी मुंबईला गेल्या आर्थिक वर्षात संशोधन आणि विकासासाठी ७०० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. गेल्या तीन वर्षातील हा सर्वाधिक निधी असून त्यात खाजगी संस्थांकडून मिळालेल्या निधीचे प्रमाण ३५ टक्के आहे. उर्वरित निधी हा सरकारी संस्थांकडून मिळालेला आहे. देशाला तंत्रज्ञान आणि आत्मनिर्भर करण्यासाठी आयआयटी मु...

September 7, 2024 1:58 PM

views 14

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख १५ सप्टेंबरपर्यंत

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांसाठी अर्ज दाखल करण्याची तारीख येत्या १५ सप्टेंबरपर्यंत आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालय दरवर्षी जानेवारीत या पुरस्कारांचं आयोजन करते. २६ डिसेंबर रोजी वीर बाल दिवस पुरस्कार जाहीर केले जाणार आहेत. पाच वर्षावरील मुलांपासून ते अठरा वर्षांखालची मुलं या पुरस्कारासाठी ...

September 7, 2024 2:07 PM

views 25

उत्तर प्रदेशात बस अपघातात १२ जणांचा मृत्यू,

उत्तर प्रदेशात, हातरस जिल्ह्यात काल एक वाहन आणि राज्य परिवहनाची बस यांच्यात झालेल्या धडकेत चार मुलांसह किमान 12 जण ठार झाले. या अपघातात अन्य 16 जण जखमी झाले आहेत. आकाशवाणी न्यूजशी बोलताना हातरसच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितलं की, राष्ट्रीय महामार्ग-93 वर चांदपा पोलीस स्थानक हद्दीतील मीताई गावाजव...

September 7, 2024 1:18 PM

views 41

मणिपूरमध्ये आज झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये आज सकाळपासून झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जरिबाम जिल्ह्यात एका व्यक्तीला, तो घराबाहेर झोपला असता गोळी घालण्यात आली. नंगचेपी भागात दोन गटात झालेल्या हिंसाचारात तीन दहशतवाद्यांसह चार जणांचा मृत्यू झाला. तांगजेंग खुजाओ भागात दोन जण जखमी ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.