राष्ट्रीय

October 28, 2025 8:20 PM October 28, 2025 8:20 PM

views 23

छठ उत्सवाचा उगवत्या सूर्याला प्रार्थना करून समारोप

सूर्यपूजेचा उत्सव म्हणून ओळखला जाणाऱ्या छठ उत्सवाचा आज सकाळी उगवत्या सूर्याला प्रार्थना करून, श्रद्धा, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात समारोप झाला. महिलांनी नद्या, तलाव आणि जलाशयांमध्ये उभे राहून सूर्यदेवाची प्रार्थना केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छठ पूजेत सहभागी झालेल्या सर्वांना शुभेच्छा दिल...

October 28, 2025 8:18 PM October 28, 2025 8:18 PM

views 28

मोंथा चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची शक्यता

मोंथा चक्रीवादळ आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्याजवळ धडकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. चक्रीवादळामुळे ९० ते शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहत आहे. तसंच आंध्रप्रदेशाच्या किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळत आहेत. त्यामुळे हवामान विभगानं आंध्र प्रदेशातल्या १९ जिल्ह्यांना अतिजोरद...

October 28, 2025 8:16 PM October 28, 2025 8:16 PM

views 24

नक्षलवादी बंडी प्रकाश आणि पी प्रसाद राव यांचं आत्मसमर्पण

नक्षलवाद्यांचे दोन मोठे नेते बंडी प्रकाश आणि पी प्रसाद राव यांनी आज तेलंगणा पोलिसांसमोर हैदराबाद इथं शरणागती पत्करली.  प्रकाश हा मंचेरियल जिल्ह्यातल्या रहिवासी असून शाळकरी वयातच तो नक्षलवादी चळवळीशी जोडला गेला होता. प्रसाद राव हा गेल्या सतरा वर्षांपासून केंद्रीय समितीचा सदस्य असून नक्षलवादी चळवळीशी ...

October 28, 2025 8:05 PM October 28, 2025 8:05 PM

views 33

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स कंपनी SJ-100 प्रवासी विमानांचं उत्पादन करणार

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स ही सरकारी कंपनी आता एसजे -100 या प्रवासी विमानांचं उत्पादन करणार आहे. त्याकरता रशियातल्या सरकारी - खासगी भागीदारीतल्या युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन या कंपनीबरोबर हालने समझोता करार केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या कराराचं स्वागत केलं असून आत्मनिर्भरतेकडे महत्त्वा...

October 28, 2025 6:58 PM October 28, 2025 6:58 PM

views 23

Cabinet Decisions: रबी हंगामासाठी खतांवर ३७,९५२ कोटी अनुदान

रबी हंगामासाठी खतांवर ३७ हजार ९५२ कोटी अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खतं उपलब्ध होतील, असं वैष्णव म्ह...

October 28, 2025 2:44 PM October 28, 2025 2:44 PM

views 13

भारताची स्मार्ट फोन निर्यात गेल्या महिन्यात विक्रमी -अश्विनी वैष्णव

भारताची स्मार्ट फोन निर्यात गेल्या महिन्यात विक्रमी १ अब्ज ८० कोटी अमेरिकी डॉलर्सवर पोहोचली, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. देशातून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनं तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगत वैष्णव यांनी न...

October 28, 2025 2:29 PM October 28, 2025 2:29 PM

views 23

सेशेल्सचा दौरा पूर्ण करून उपराष्ट्रपती मायदेशी परतले

सेशेल्सचा दौरा पूर्ण करून उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज मायदेशी परतले. सेशेल्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी ते सेशेल्स इथे गेले होते. या भेटी दरम्यान राधाकृष्णन यांनी हर्मिनी तसंच उपाध्यक्ष सबॅस्टियन पिल्लई यांची भेट घेतली. या भेटीत त्यांन...

October 28, 2025 1:38 PM October 28, 2025 1:38 PM

views 72

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून निवडणूक प्रचार शिगेला

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीचे घटक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत. महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार असून यात आपली धोरणं जाहीर करण्यात येतील असं राजद नेते तेजस्वी यादव यांनी सांगितलं. राओलाची धो...

October 28, 2025 3:20 PM October 28, 2025 3:20 PM

views 16

राष्ट्रीय नौवहन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं केंद्रीय बंदर विकास मंत्र्यांच्या हस्ते अनावरण

गुजरातमधे लोथल इथं प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय समुद्री नौकानयन वारसा संकुलाच्या बोधचिन्हाचं अनावरण आणि संशोधन अहवालाचं प्रकाशन केंद्रीय बंदरं, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते आज मुंबईत इंडिया मेरिटाईम वीकच्या दुसऱ्या दिवशी झालं. भारताचा समुद्री नौकानयन क्षेत्रातला हजारो व...

October 28, 2025 10:02 AM October 28, 2025 10:02 AM

views 30

बिहारसह देशभरांत छटपुजेचा उत्साह

सुर्यदेवतेची आराधना करण्याचा, श्रद्धेचा सण म्हणून ओळखला जाणारा छट पूजेचा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जात आहे. बिहारमध्ये, गंगा, गंडक, कोसी, महानंदा आणि बागमती यासारख्या नद्यांच्या काठावर तसंच देशभरातील विविध जलाशयातील छठ घाटांवर सूर्यदेवाची प्रार्थना करण्यासाठी भाविक  मोठ्या ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.