राष्ट्रीय

August 29, 2024 1:47 PM August 29, 2024 1:47 PM

views 13

विशाखापट्ट्णम इथं पाकिस्तानच्या हेरगिरीप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेचे देशभरात छापे

आंध्रप्रदेशात विशाखापट्ट्णम इथं पाकिस्तानच्या हेरगिरीप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले. गुजरात, कर्नाटक, केरळ, तेलंगण, उत्तरप्रदेश, बिहार, आणि हरयाणामधे मिळून १६ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.   या कारवाईत २२ मोबाईल फोन्स, आणि  अनेक गोपनीय कागदपत्रं मिळाली असल्याचं...

August 29, 2024 1:44 PM August 29, 2024 1:44 PM

views 12

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या सीडीएस आणि एनडीए परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे येत्या १ सप्टेंबरला सीडीएस म्हणजेच संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा आयोजित करण्यात आली असून ही परीक्षा सकाळी ९ ते ११, दुपारी १२ ते २ आणि ३ ते ५ या वेळेत घेण्यात येईल. तर एनडीए परीक्षा सकाळी १० ते साडेबारा आणि दुपारी २ ते साडेचार या वेळेत घेण्यात येईल.

August 29, 2024 1:37 PM August 29, 2024 1:37 PM

views 18

युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी

केंद्रीय लोकसेवा आयोग - युपीएससीला उमेदवारांची ओळख पडताळण्यासाठी आधार आधारित प्रमाणीकरण करण्याची परवानगी केंद्रसरकारने दिली आहे. परीक्षेसाठी नोंदणी करताना तसंच परिक्षेच्या विविध टप्प्यावर आयोगाला हे प्रमाणीकरण करता येईल. बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांनी खोटी माहिती दाखवून अनेक वेळा युपीएससी...

August 29, 2024 1:23 PM August 29, 2024 1:23 PM

views 10

जुन्या प्रदूषणकारी गाड्या भंगारात काढून नव्या कमी प्रदुषणकारी गाड्या घेण्यासंदर्भात बैठक

जुन्या प्रदूषणकारी व्यवसायिक तसंच प्रवासी गाड्या भंगारात काढून त्याजागी नव्या कमी प्रदुषणकारी गाड्या घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने काल दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. भारत मंडपम् इथं काल झालेल्या बैठकीत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांनी भारतीय स्वयंचलित वाहन निर्माता स...

August 29, 2024 1:04 PM August 29, 2024 1:04 PM

views 10

भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर – राज्यसभेचे उपाध्यक्ष

भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर असल्याचं प्रतिपादन, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी केलं आहे. ते काल वर्ध्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात आयोजित ‘भावी जगात भारत’ या विषयावर व्याख्यान देत होते. २०४७ पर्यंत भारत विकसित करण्याचा संकल्‍प पूर्ण करण्यासाठी साडेतेरा टक्के आर्थि...

August 29, 2024 5:19 PM August 29, 2024 5:19 PM

views 23

देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा

हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदानावर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सर्वांनी आपापल्या रोजच्या का...

August 29, 2024 12:59 PM August 29, 2024 12:59 PM

views 13

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली. उमेदवारी अर्ज आजपासून येत्या ५ सप्टेंबरपर्यंत  भरता येतील. अर्जांची छाननी येत्या ६ सप्टेंबरला होणार असून उमेदवारी मागे घेण्याची मुदत ९ सप्टेंबरपर्यंत आहे. येत्या २५ सप्टेंबरला मतदान होणार आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रद...

August 29, 2024 1:54 PM August 29, 2024 1:54 PM

views 16

भारत आणि रशिया संयुक्त आयोगाची दुसरी बैठक रशियात मॉस्को इथं पार

आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्यासंबंधीची भारत आणि रशिया संयुक्त आयोगाची दुसरी बैठक काल रशियात मॉस्को इथं पार पडली. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. रशिया भेटीच्या पहिल्या दिवशी, 2025-26 या वर्षासाठी आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातल्या सहकार्यावर संयुक्त आयोगाच...

August 28, 2024 6:38 PM August 28, 2024 6:38 PM

views 6

कोलकात्यात डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची घटना पूर्ण देशासाठी भीषण धक्कादायक – राष्ट्रपती

कोलकात्यात डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची घटना पूर्ण देशासाठी भीषण धक्कादायक असून आता जनता हे सहन करणार नाही असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारचे गुन्हे सर्रास घडतात हे अधिक भयावह असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. पूर्वप्राथमिक...

August 28, 2024 6:57 PM August 28, 2024 6:57 PM

views 11

देशातल्या २३४ शहरांमधे ७३० एफ एम प्रसारण वाहिन्यांच्या ई- लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या २३४ शहरांमधे ७३० एफ एम प्रसारण वाहिन्यांच्या ई लिलावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मातृभाषेत स्थानिक विषयांशी संबंधित प्रसारणाला प्रोत्साहन देण्यासाठी हानिर्णय घेतल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या निर्णयामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरा...