राष्ट्रीय

August 30, 2024 10:49 AM August 30, 2024 10:49 AM

views 13

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे देशभरात दहा ठिकाणी छापे

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं आखाती देशांतून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर जसमीत हकीमजादा प्रकरणी काल देशभरात दिल्ली, अमृतसर, जालंधर, मुंबई, सोलापूर आणि इंदूर अशा दहा ठिकाणी छापे टाकले. अमेरिकेच्या फॉरेन नार्कोटिक्स किंगपिन डेजिगेशन अॅक्टअंतर्गत 'महत्त्वपूर्ण परदेशी अंमली पदार...

August 30, 2024 10:04 AM August 30, 2024 10:04 AM

views 15

केंद्र सरकारनं इथेनॉल उत्पादनावरील बंदी उठवली; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

केंद्र सरकारनं 2024-25 च्या गाळप हंगामासाठी उसाचा रस, साखरेचा पाक आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करण्यावरची बंदी उठवली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना आता इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगत मुख्यमंत्...

August 29, 2024 8:02 PM August 29, 2024 8:02 PM

views 14

देशभरात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक – बसपा अध्यक्ष मायावती

देशभरात महिलांवर सतत होणाऱ्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक आहेत, या प्रकरणात सर्व राजकीय पक्षांनी राजकारण न करता योग्य ती कठोर पावलं उचलावीत, असं बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष  मायावती यांनी म्हटलं आहे. देशात विविध ठिकाणी निष्पाप अल्पवयीन मुलींवर आणि महिलांविरोधात बलात्कार, हत्या आणि अत्याचाराच्या झाल...

August 29, 2024 7:56 PM August 29, 2024 7:56 PM

views 11

मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीतल्या भारतीय शेतकी संशोधन संस्थेत रोपं लावली

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीतल्या भारतीय शेतकी संशोधन संस्थेत ‘एक पेड मॉ के नाम’ या अभियानाअंतर्गत रोपं लावली. या वेळी त्यांनी सुमारे एक एकर जागेवर मातृवन स्थापन करण्याची योजना असल्याचंही सांगितलं.

August 29, 2024 7:48 PM August 29, 2024 7:48 PM

views 14

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल श्रीलंका दौऱ्यासाठी कोलंबो इथं पोहचले

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यासाठी  कोलंबो इथं पोहोचले आहेत. भारत श्रीलंका आम मालदीव्ज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुरु झालेल्या कोलंबो सुरक्षा परिषदेच्या तयारीचा ते आढावा घेतील.    दहशतवादाचा सामना करण्यासाठी, पोलीस, कायदा अंमलबजावणी आणि सायबर सुरक्षा या ...

August 29, 2024 7:06 PM August 29, 2024 7:06 PM

views 8

वाढवण बंदर देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल – मंत्री सर्बानंद सोनोवाल

वाढवण बंदर महाराष्ट्रासोबत देशाची वेगळी ओळख निर्माण करायला मदत करेल असा विश्वास केंद्रीय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज व्यक्त केला. वाढवण बंदराचं उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते पालघर इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोल...

August 29, 2024 3:49 PM August 29, 2024 3:49 PM

views 9

भारत स्टार्टअप उद्योगांची मांदियाळी – मंत्री जितीन प्रसाद

भारत स्टार्टअप उद्योगांची मांदियाळी असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्य मंत्री जितिन प्रसाद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत डिजिटल भारत इकॉनॉमी कॉन्क्लेव्हला ते संबोधित करत होते. ते म्हणाले की गेल्या १० वर्षात दर ४० मिनिटांनी एक या वेगानं स्टार्टअप उद्योग देशात सुरु झाले आहेत. ए...

August 29, 2024 8:18 PM August 29, 2024 8:18 PM

views 11

रोखे करार नियमन कायद्यात अर्थ मंत्रालयाकडून सुधारणा

केंद्रीय अर्थ मंत्रालयानं एससीआरआर, अर्थात रोखे करार नियमन कायदा १९५६ मध्ये सुधारणा केली आहे. आयएफएससी अर्थात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रांच्या अखत्यारितल्या आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांमध्ये जागतिक मानकांनुसार सूचीबद्ध होण्याची इच्छा असलेल्या भारतीय कंपन्यांकरता प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ही सुध...

August 29, 2024 3:54 PM August 29, 2024 3:54 PM

views 21

दिल्लीत सकाळी भूकंपाचे धक्के

दिल्ली राजधानी क्षेत्रात आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर मापकावर त्याची तीव्रता ५ पूर्णांक ७ दशांश इतकी नोंदली गेली. भूकंपात जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही.

August 29, 2024 1:51 PM August 29, 2024 1:51 PM

views 12

देशात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

दिल्लीच्या काही भागात काल रात्री मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडला असून गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ जिल्ह्यांमध्ये उद्यापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगाल उपसागराच्या उ...