राष्ट्रीय

November 23, 2025 9:50 AM

views 32

जी-२० शिखर परिषदेत प्रधानमंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं सुरू असलेल्या जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेत काल झालेल्या एका सत्रात बोलताना प्रधानमंत्री मोदी यांनी जागतिक पारंपरिक ज्ञान भांडाराची स्थापना, जी-२० आफ्रिका-कौशल्यवाढ उपक्रमाची सुरुवात, जी-२० जागतिक आरोग्य प्रतिसाद पथकाची निर्मिती, अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी...

November 22, 2025 8:11 PM

views 29

वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा पश्चिम रेल्वेचा निर्णय

प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वांद्रे टर्मिनस आणि पालीताना स्थानकादरम्यान विशेष सुपरफास्ट गाडी चालवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेनं घेतला आहे. विशेष भाडे आकारून चालवण्यात येणारी, बांद्रा टर्मिनस-पालीताना सुपरफास्ट स्पेशल, ही गाडी उद्या संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी वांद्रे स्थानकातून रवाना होईल आणि दु...

November 22, 2025 8:08 PM

views 28

देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा सुमारे ३५७ दशलक्ष टन झालं असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ते आठ टक्क्यांहून अधिक आहे- डॉ. एम. एल. जट

देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा सुमारे ३५७ दशलक्ष टन झालं असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ते आठ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव तसंच भारतीय कृषी अनुसंधान परिषदचे महासंचालक डॉ. एम. एल. जट यांनी आज दिली. नवी दिल्ली इथं सहाव्या आंतरराष्ट्रीय कृषी शास्त्र संमेलनाच्या आधी...

November 22, 2025 8:00 PM

views 13

हैदराबाद इथं ३७ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

तेलंगणात हैदराबाद इथं ३७ नक्षलवादी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात सामील झाले. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये आझाद उर्फ कोय्यादा सांबय्या, रमेश उर्फ अप्पासी नारायण, तसंच एर्रा उर्फ मुचाकी सोमादा या राज्य समितीच्या तीन वरिष्ठ  सदस्यांसह २५ महिलांचाही समावेश आहे. या सर्वांनी हैदराबाद इथं पोलिस...

November 22, 2025 7:58 PM

views 54

विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा आमूलाग्र पुनर्विचार करायला हवा- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

विकासाबाबतच्या जागतिक निकषांचा आमूलाग्र पुनर्विचार करायला हवा, असं आग्रही प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग इथं जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेत आज केलं. जी-२०नं प्रदीर्घ काळापासून जागतिक अर्थव्यवस्था आणि विकासाला चालना दिली आहे, मात्र सध्याच्या आराखड्यात मोठी ल...

November 22, 2025 7:56 PM

views 22

देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे – राष्ट्रपती

देश सर्वप्रथम या तत्त्वानुसार राष्ट्रनिर्माण हे सर्व संस्थांचं ध्येय असलं पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. आंध्र प्रदेशातल्या पुट्टपार्थी इथं श्री सत्य साईबाबा यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यात्मिक संस्थांनी राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान द्या...

November 22, 2025 7:56 PM

views 34

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत केला एक अब्ज टनांपेक्षा जास्त माल वाहतुकीचा विक्रम

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे. या वर्षात १९ नोव्हेंबरपर्यंत १ अब्ज २ कोटी टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. सर्वाधिक ५० कोटी ५० लाख टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक ३ कोटी टन झाली आहे. रेल्वेद्...

November 22, 2025 5:51 PM

views 18

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या भारतीय हज समितीला सूचना

हज यात्रेशी निगडित सर्व प्रक्रिया डिजिटल करून मानवी हस्तक्षेप दूर करण्याच्या सूचना केंद्रीय अल्पसंख्यक सचिव चंद्र शेखर कुमार यांनी भारतीय हज समितीला दिल्या आहेत. मुंबईत झालेल्या हज परिषदेत ते बोलत होते. हज यात्रेसाठी अर्ज करण्यापासून यात्रेहून परत आल्यानंतर करायच्या प्रक्रिया सुद्धा डिजिटल करण्याची ...

November 22, 2025 3:49 PM

views 37

हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढावा – सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेची मागणी

सार्वजनिक ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी बैठक घेऊन तोडगा काढावा अशी मागणी सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेनं केली आहे. परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी तसं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलं आहे. बैठक न झाल्यास येत्या अकरा ड...

November 22, 2025 3:11 PM

views 35

भारतीय रेल्वेचा १ अब्ज टनांपेक्षा जास्त माल वाहतुकीचा विक्रम

भारतीय रेल्वेनं २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत एक अब्ज टन मालवाहतुकीचा आकडा ओलांडला आहे.  या वर्षात १९ नोव्हेंबरपर्यंत १ अब्ज २ कोटी  टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेनं दिली आहे. सर्वाधिक ५० कोटी ५० लाख  टन वाहतूक कोळशाची झाली असून खाद्यान्नाची वाहतूक ३ कोटी  टन झाली आहे.   रे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.