राष्ट्रीय

September 3, 2024 7:55 PM September 3, 2024 7:55 PM

views 5

रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची – मंत्री नितीन गडकरी

रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत टनलिंग इंडियाच्या दुसऱ्या परिषदेला संबोधित करत होते. भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार काम करत असल्याचं ते यावेळी म्हणाले...

September 3, 2024 8:09 PM September 3, 2024 8:09 PM

views 6

भारताच्या शाश्वत भविष्यासाठी मजबूत आर्थिक क्षेत्राची भूमिका महत्वाची – आरबीआय

भारताच्या समावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी मजबूत आर्थिक क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर डॉ. मिशेल पात्रा यांनी म्हटलं आहे.  ते आज भारतीय उद्योग महासंघानं मुंबईत आयोजित केलेल्या परिषदेला  संबोधित करत होते. अर्थकारण आणि विकासामधला परस्पर संबंध लक्षात घेता, भा...

September 3, 2024 6:49 PM September 3, 2024 6:49 PM

views 12

जागतिक बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७ टक्क्यांपर्यंत वाढवला

जागतिक बँकेनं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक वाढीचा अंदाज ७ टक्क्यापर्यंत वाढवला आहे. याआधी जागतिक बँकेनं ६ पूर्णांक ६ दशांश टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता खासगी गुंतवणुकीसारख्या महत्त्वाच्या घटकांमुळे भारताची आर्थिक वाढ मजबूत राहील, असं बँकेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं...

September 3, 2024 8:30 PM September 3, 2024 8:30 PM

views 10

देशाची संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी १ लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना केंद्र सरकारची मंजुरी

देशाची संरक्षण सज्जता वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत १० भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी दिली गेली. या सोबतच या बैठकीत भविष्यवेधी ...

September 3, 2024 3:18 PM September 3, 2024 3:18 PM

views 31

आंध्रप्रदेशात पूरग्रस्त भागात युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

आंध्रप्रदेशात एनटीआर आणि गुंटूर या जिल्ह्यांमधल्या  पूरग्रस्त भागात मदत कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. NDRF आणि राज्य आपत्ती प्रतिसाद संस्था हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीनं पूरग्रस्त भागातल्या नागरिकांची सुटका करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ ४२ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.    आंध...

September 3, 2024 3:15 PM September 3, 2024 3:15 PM

views 20

तेलंगणाच्या काही भागात पावसाचा जोर कायम

तेलंगणाच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. खम्मम, महबूबाबाद आणि सूर्यापेट या जिल्ह्यांमधल्या पूरग्रस्त भागात एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं बचाव कार्य सुरु आहे. राज्य सरकारनं  ११० मदत छावण्या उभारल्या असून या ठिकाणी ४ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी आसरा घेतला आहे. पुरामुळे आतापर्यंत ५...

September 3, 2024 3:02 PM September 3, 2024 3:02 PM

views 12

२३ व्या विधी आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी

केंद्रसरकारनं काल तेविसाव्या विधी आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी केली. आयोगाचा कार्यकाल ३ वर्षांचा म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत असेल. आयोगाचे पूर्ण वेळ अध्यक्ष तसंच सदस्य सचिवांसह  चार पूर्ण वेळ सदस्य असतील. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे विधी आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य असतील,...

September 3, 2024 10:13 AM September 3, 2024 10:13 AM

views 9

राजस्थानच्या बाडमेरजवळ भारतीय वायुदलाचे मिग-२९ लढाऊ विमान कोसळले

राजस्थानच्या बाडमेरजवळ काल रात्री तांत्रिक बिघाडामुळं भारतीय वायुदलाचं मिग-२९ हे लढाऊ विमान कोसळलं. मात्र वैमानिक या दुर्घटनेतून सुखरुप बचावला असून अन्य कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसल्याचं वायुदलाकडून सांगण्यात आलं. रात्रीच्यावेळी विमान उड्डाणाचा नियमित प्रशिक्षण सराव सुरू असताना विमानात गंभ...

September 3, 2024 2:51 PM September 3, 2024 2:51 PM

views 17

ब्रुनेई आणि सिंगापूर दौरा आसियान क्षेत्रातल्या भारताच्या भागीदारीला आणखी बळ देईल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी ब्रुनेई आणि सिंगापूर या  देशांच्या तीन दिवसीय  दौऱ्यावर रवाना झाले. हे दोन्ही देश भारताच्या ऍक्ट ईस्ट आणि हिंद-प्रशांत महासागर दुष्टीकोनामधले महत्त्वाचे भागीदार असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आपला हा ...

September 3, 2024 9:56 AM September 3, 2024 9:56 AM

views 9

पर्यटन क्षेत्रात अधिक विकासासाठी खाजगी गुंतवणूक वाढवणं आवश्यक – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत

देशात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असून,या क्षेत्रात अधिक विकासासाठी खाजगी गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे, अस मत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केल. मेघालयात शिलॅांग इथ पर्यटनमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. देशात पर्यटन विकासाला चालना ...