राष्ट्रीय

September 12, 2024 6:04 PM September 12, 2024 6:04 PM

views 14

पद्म पुरस्कार २०२५ साठी नामांकने १५ सप्टेंबरपर्यंत खुली

२०२५ च्या पद्म पुरस्कारांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येतील. यंदा एक मेपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून awards.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनं हे अर्ज करायचे आहेत. आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान किंवा सेवा दिलेल्या व्यक्तींविषयीचा सर्व तपशील अर्जासोबत कमाल ८०० शब्दांत जोडावा, असं आवाहन ...

September 12, 2024 8:24 PM September 12, 2024 8:24 PM

views 12

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं निधन

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांचं आज नवी दिल्लीत दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. श्वासलिकेत संसर्ग झाल्यामुळे मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते. मागच्या पाच दिवसांपासून त्यांना जीवरक्षण प्रणालीवर ठेवण्यात आलं होतं. आज दुपारी तीन वा...

September 12, 2024 3:35 PM September 12, 2024 3:35 PM

views 24

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ७० हजार कोटींहून अधिक खर्चाचे रस्ते बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं २०२४-२५ ते २०२८-२९ या आर्थिक वर्षांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी करण्याचा ग्रामविकास खात्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या योजनेचा एकंदर खर्च ७० हजार १२४ कोटी रुपये इतका असणार आहे. केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमा...

September 12, 2024 1:42 PM September 12, 2024 1:42 PM

views 8

ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन

भारतीय उद्योजकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापार सुलभपणं करता यावा, या उद्देशानं तयार केलेल्या ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्मचं उद्घाटन काल केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी नवी दिल्लीत केलं. आंतरराष्ट्रीय व्यापार नियम, व्यापार करार, व्यावसायिक भागीदारी, सीमाशुल्क आणि परदेशी खरेदीदारांश...

September 12, 2024 5:10 PM September 12, 2024 5:10 PM

views 15

भारताला हाय अल्टीट्यूड पाणबुडी विरोधी यंत्रणा देण्याचा अमेरिकेचा निर्णय

 हाय अल्टिट्युड अँटी सबमरिन वॉरफेअर हे पाणबुडीरोधक युद्ध  तंत्रज्ञान अमेरिका भारताला विकणार आहे. ५ कोटी २८ लाख रूपये  किमतीचं हे तंत्रज्ञान असून त्यामुळे भारताला एमएच ६० आर या हेलिकॉप्टरमधून पाणबुड्यांवर मारा करता येईल. या प्रस्तावित व्यवहारामुळे भारत आणि अमेरिकेतल्या द्वीपक्षीय संबंधांना नवे आयाम म...

September 12, 2024 1:30 PM September 12, 2024 1:30 PM

views 11

हरियाणातल्या विधानसभा निडवणुकीसाठी आम आदमी पार्टीकडून आज दोन याद्या जाहीर

 हरियाणातल्या आगामी विधानसभा निडवणुकीसाठी आम आदमी पार्टीने आज दोन याद्या जाहीर केल्या असून यात २२ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात प्रेम गर्ग हे पंचकुला मतदारसंघातून, कमल बिसला फतेहबादमधून, केतन शर्मा अंबालामधून आणि धीरज कुंदु दादरी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. नूह इथून रबिया किडवई, तर जगध...

September 12, 2024 1:25 PM September 12, 2024 1:25 PM

views 11

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन

  संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेनं भारताची वाटचाल वेगानं होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. भारतीय हवाई दलातर्फे राजस्थानात जोधपूर इथं आयोजित तरंग शक्ती विमान सरावाची पाहणी केल्यानंतर आज ते बोलत होते. या सरावाच्या निमित्तानं हवाई दलानं आयोजित केलेल्या भारतीय संरक...

September 12, 2024 1:15 PM September 12, 2024 1:15 PM

views 10

केरळ तिरुअनंतपुरम इथं पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची आज बैठक

केरळ राज्यसरकारने पाच राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक आज राजधानी तिरुवअनंतपुरम इथं आयोजित केली आहे. केरळ खेरीज तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगण आणि पंजाब या राज्यांचे अर्थमंत्री त्यात सहभागी होणार आहेत. केंद्र – राज्य संबंधांचा आर्थिक पैलू आणि १६ व्या वित्त आयोगात राज्यांना न्याय्य वाटा मिळवण्याच्या दृष्ट...

September 12, 2024 1:48 PM September 12, 2024 1:48 PM

views 16

जम्मू – काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त

जम्मू - काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दारूगोळा आणि स्फोटकांचा मोठा साठा जप्त केला आहे. यासंदर्भात मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी केरन विभागात संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यात  ए के-47 आणि  आर.पी.जी च्या फैरी तसंच  ई ए डी आणि हातबॉम्ब यांचा मोठा स...

September 12, 2024 1:07 PM September 12, 2024 1:07 PM

views 25

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात ४ दिवसांत जोरदार पाऊसाचा अंदाज

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात काही ठिकाणी आगामी चार दिवसांत जोरदार पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे. तसंच बिहार, ओडिशा, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा इथे उद्या जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य भारत, कोकण, गोवा आणि गुजरातमध्ये बहुत...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.