राष्ट्रीय

October 9, 2024 8:15 PM October 9, 2024 8:15 PM

views 18

बिहार विधानसभा निवडणूक : काँग्रेसच्या शिष्टमंडळाची निवडणुक आयोगाकडे तक्रार

बिहार विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्राच्या बॅटरीच्या मुद्यावरुन काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज निवडणुक आयोगाकडे तक्रार दाखल केली. मतदान यंत्रांच्या बॅटरी चार्जिंगबाबत सात मतदार संघांमधल्या २० तक्रारी आयोगाकडे दिल्या असल्याचं काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी बातमीदारांना सांगितलं. या तक्रारींबाबत चौकशी पू...

October 9, 2024 8:11 PM October 9, 2024 8:11 PM

views 9

हरियाणामध्ये भाजपाकडून सत्तास्थापनेसाठी तयारी सुरू

हरियाणामध्ये निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपानं सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नायब सिंग सैनी यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी  शिफारस केली होती. याबाबत बातमीदारांनी विचारलं असता, तो निर्णय पक्ष आणि संसदीय मंडळ घेईल, असं सैन...

October 9, 2024 8:36 PM October 9, 2024 8:36 PM

views 10

सिंधु संस्कृतीतलं प्राचीन बंदर लोथल इथं राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करायला मंजूरी

सिंधु संस्कृतीतलं प्राचीन बंदर लोथल इथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. भारताच्य...

October 9, 2024 7:29 PM October 9, 2024 7:29 PM

views 12

रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड बेकर, जॉन जंपर आणि डेमिस हसाबिस यांना जाहीर

यंदाचा रसायनशास्त्रातला नोबेल पुरस्कार डेव्हिड बेकर, जॉन जंपर आणि डेमिस हसाबिस या तिघांना प्रथिनांची रचना आणि आरेखन यातल्या संशोधनासाठी जाहीर झाला आहे. अमेरिकेत सिएटलमधल्या वॉशिंग्टन विद्यापीठात कार्यरत बेकर पुरस्काराची निम्मी रक्कम यांना देण्यात येणार आहे.  कृत्रिम बुद्धिमत्ता विकासात प्रथिनांच्या ...

October 9, 2024 2:31 PM October 9, 2024 2:31 PM

views 11

देशाचे नियंत्रक आणि महालेखापाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी काल सर्व राज्यांच्या वित्तसचिवांची नवी दिल्लीत घेतली बैठक

देशाचे नियंत्रक आणि महालेखापाल गिरीशचंद्र मुर्मू यांनी काल सर्व राज्यांच्या वित्तसचिवांची बैठक नवी दिल्लीत घेतली. केंद्र तसंच राज्य सरकारांच्या खर्चाच्या उद्दिष्ट आणि विनियोजनात ताळमेळ घालण्याची आवश्यकता असल्याचं मुर्मू यांनी बैठकीत सांगितलं. दर महिन्याचे लेखा अहवाल सादर करण्याची मुदत पुढच्या महिन्य...

October 9, 2024 2:25 PM October 9, 2024 2:25 PM

views 5

राहूल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेवर 6 नोव्हेंबरला सुनावणी

काँग्रेस नेता राहूल गांधी यांचं नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या याचिकेच्या सुनावणीसाठी दिल्ली उच्च न्यायालयाने 6 नोव्हेंबर ही तारीख दिली आहे. याच संदर्भात अलाहबाद उच्च न्यायालयातही सुनावणी सुरु आहे. या सुनावणीचा अहवाल न्यायालयाने मागवला आहे. राहूल गांधी हे ब्रिटनमध्ये २००३ मध्ये नोंदणी झालेल्या एक...

October 9, 2024 2:16 PM October 9, 2024 2:16 PM

views 8

कर्ज देण्याच्या प्रक्रियेत सेवेच्या गुणवत्तेवर परिणाम होणार नाही,याची दक्षता बँकांनी बाळगावी – अर्थमंत्री

बँकांनी नफा मिळवण्याच्या हेतूने कर्ज देण्यापूर्वी जोखीम कमी करण्यावर भर द्यावा आणि सावधतेने कर्जवाटप करावं असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल मुंबई इथे एका कार्यक्रमादरम्यान म्हणाल्या. बँक व्यवस्थेचा एकूण अर्थव्यवस्थेवर आणि कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यावर थेट परिणाम होत असतो. त्यामुळे कर्ज ...

October 9, 2024 2:12 PM October 9, 2024 2:12 PM

views 14

आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांचा सहभाग गरजेचा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशभरात पारंपरिक औषधांची उपलब्धता वाढवण्यासाठी आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या ८व्या वर्धापन दिनानिमित्त त्या नवी दिल्ली इथं बोलत होत्या. आयुर्वैदिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्य...

October 9, 2024 2:09 PM October 9, 2024 2:09 PM

views 10

विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी, या उद्देशाने रिझर्व बँकेकडून शिष्यवृती योजना जाहीर

अर्थशास्त्र आणि वाणिज्य या विषयांशी संबधित अध्यापक तसंच विद्यार्थ्यांमध्ये रिझर्व बँकेच्या कारभाराबाबत जागरुकता वाढावी या उद्देशाने रिझर्व बँकेने एक शिष्यवृती योजना जाहीर केली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग अथवा अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था यांच्या मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधले पूर्णवेळ अध्यापक यास...

October 9, 2024 1:44 PM October 9, 2024 1:44 PM

views 9

भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर

भारतीय रिझर्व बँकेच्या पतधोरणाचा द्वैमासिक आढावा आज जाहीर झाला. व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय बँकेनं सलग १०व्या आढाव्यात घेतला आहे. त्यामुळे रेपो दर साडेसहा टक्क्यांवर, स्टँडींग डिपॉझिट फॅसिलिटी दर सव्वा सहा टक्क्यांवर आणि मार्जिनल डिपॉझिट फॅसिलिटी दर पावणे सात टक्क्यांवर कायम आहे. रिझर्व ...