राष्ट्रीय

October 16, 2024 8:37 PM October 16, 2024 8:37 PM

views 10

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू मॉरिटानिया इथं पोहचल्या

राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू तीन देशांच्या दौऱ्यावर असून आज त्या मॉरिटानिया मध्ये दाखल झाल्या आहेत. मॉरिटानियाचे राष्ट्रपती मोहम्मद औलद गजौनी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. मॉरिटानिया दौऱ्यात राष्ट्रपती तिथल्या भारतीय वंशाच्या नागरिकांची भेट घेणार आहे. तसंच द्विपक्षीय बैठका देखील घेणार आहेत.

October 16, 2024 8:30 PM October 16, 2024 8:30 PM

views 3

संगीत आणि नृत्याला भाषेची गरज नसल्यानं या कलाप्रकारांना सीमेचं बंधन नाही – प्रधानमंत्री

संगीत आणि नृत्याला भाषेची गरज नसल्यानं या कलाप्रकारांना सीमेचं बंधन नाही. त्यामुळेच हे कलाप्रकार सर्वांना समजू शकतात, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत भारतीय नृत्यावर आधारीत पहिल्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात ते बोलत होते. सहा दिवस चालणाऱ्या महोत्सवाचं आयोजन संगीत नाटक अकादम...

October 16, 2024 8:21 PM October 16, 2024 8:21 PM

views 3

सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातल्या न्यायदेवतेच्या पुतळ्यात बदल करण्याच्या सूचना

सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातल्या न्यायदेवतेच्या पुतळ्यात बदल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या नव्या न्यायदेवतेच्या हातात तलवारीच्या ऐवजी राज्यघटना आहे. बळाचा वापर करून नाही, तर न्याय्य पद्धतीनं कायद्याचं राज्य आणणं याचं हे प्रतीक आहे. न्याय पारदर्शक असतो...

October 16, 2024 7:19 PM October 16, 2024 7:19 PM

views 11

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची नवी दिल्लीत बैठक

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज नवी दिल्लीत होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते यात सहभागी होणार आहेत. यावेळी उमेदवार यादीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

October 16, 2024 3:43 PM October 16, 2024 3:43 PM

views 9

एनएसजीच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

एनएसजी अर्थात राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या स्थापना दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या संरक्षणाप्रति एनएसजी जवानांचं समर्पण, धैर्य आणि निर्धार यामुळे देश त्यांना सलाम करत आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. एनएसजी ज्या निष...

October 16, 2024 3:43 PM October 16, 2024 3:43 PM

views 5

सक्रिय सदस्यता अभियानाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आरंभ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सक्रिय सदस्यता अभियानाला आरंभ केला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यावेळी उपस्थित होते. भाजपाला तळागाळापर्यत नेत मजबूत करण्यासाठी आणि देशाहितासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सक्रिय योगदान मिळवणं हा या योजनेमागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. सक्रिय सद...

October 16, 2024 3:38 PM October 16, 2024 3:38 PM

views 9

‘भारत’ खेळणी निर्यात करणारा देश बनल्याचं मंत्री पियूष गोयल यांचं प्रतिपादन

खेळणी तयार करण्यासाठी सर्व प्रकारचे घटक उपलब्ध करून देणारी परिसंस्था भारताने तयार केली असून भारत हा आता खेळणी निर्यात करणारा देश बनल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं पहिल्या इंडियन फाऊंडेशन क्वालिटी मॅनेजमेंट परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ‘विकसित...

October 16, 2024 3:13 PM October 16, 2024 3:13 PM

views 3

जगभरात होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी ४६ टक्के व्यवहार भारतात- ज्योतिरादित्य शिंदे

जगभरात होणाऱ्या डिजिटल व्यवहारांपैकी ४६ टक्के व्यवहार भारतात होतात, असं केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं.नवी दिल्ली इथल्या भारत मंडपम इथं आज झालेल्या आंतरराष्ट्रीय सिक्स जी परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात यूपीआयद्वारे २७५ अब्ज डॉलरचे दीड...

October 16, 2024 3:28 PM October 16, 2024 3:28 PM

views 10

कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही – परराष्ट्रमंत्री एस जयशंकर

दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद ही जगासमोरची मुख्यं आव्हानं असून, कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही, असा स्पष्ट इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानच्या भूमीवरून दिला आहे. ते आज इस्लामाबाद इथं तेवीसाव्या शांघाय सहकार्य संघटना अर्थात एससीओच्या परिषदेला संबोध...

October 16, 2024 12:02 PM October 16, 2024 12:02 PM

views 5

आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ आणि जागतिक दूरसंचार मानकीकरण परिषद अर्थात आयटीयू-डब्ल्यूटीएसए 2024 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसचं उद्घाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. ही परिषद भारत मंडपम इथं होत आहे. यामध्ये सहभागी उद्य...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.