राष्ट्रीय

November 19, 2024 8:40 PM

views 10

राष्ट्रीय परिषद ‘नेप्टीकॉन 2024 ‘चं  येत्या २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी आयोजन

नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात  एम्स इथं   शिक्षक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी  तिसऱ्या राष्ट्रीय परिषद  'नेप्टीकॉन 2024 'चं  आयोजन येत्या २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी करण्यात आलं आहे. या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेची संकल्पना 'सर्वोत्तम आरोग्यसेवेसाठी आधुनिक फार्माकोलॉजीतील नवनवी...

November 19, 2024 8:36 PM

views 15

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून ४३ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरु

नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून ४३ व्या आयआयटीएफ अर्थात भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरु झाला. विकसित भारत २०४७ अशी यावर्षीच्या मेळ्याची थीम आहे. यंदा चीन, इजिप्त, इराण, दक्षिण कोरिया, थायलंड आणि संयुक्त अरब अमिराती या देशातल्या तीन हजारपेक्षा जास्त व्यावसायिकांनी आपल्या उत्पादनाचं प्रदर्शन य...

November 19, 2024 8:35 PM

views 224

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची देशाच्या अद्ययावत आण्विक धोरणाला मान्यता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज देशाच्या अद्ययावत आण्विक धोरणाला मान्यता दिली. यानुसार रशिया आपल्या शस्त्रागाराचा वापर कसा करायचा हे ठरवले. यामुळे अण्वस्त्रांचा वापर व्यापक करता येणार आहे.  यानुसार आण्विक शक्तीच्या पाठिंब्यावर केलेला कोणताही हल्ला हा संयुक्त हल्ला मानला जाणार आहे. अम...

November 19, 2024 8:30 PM

views 14

शाश्वत आणि किफायतशीर शेतीसाठी सरकार वचनबद्ध-शिवराजसिंग चौहान

शाश्वत आणि किफायतशीर शेती, लवचिक पर्यावरण आणि  सर्वांसाठी अन्नसुरक्षा  उपक्रम  राबवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी  केलं.  नवी दिल्ली इथं आज  जागतिक मृदा परिषदेमध्ये बोलत असताना चौहान यांनी  मृदेच्या खालावलेल्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त...

November 19, 2024 8:19 PM

views 13

भारतीय वायुसेनेचं समर्पण आणि व्यावसायिकतेचं केंद्रीय संरक्षणमंत्र्यांकडून कौतुक

देशाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी भारतीय वायुसेनेचं समर्पण आणि व्यावसायिकतेचं कौतुक केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी आज केलं. नवी दिल्ली इथं आज भारतीय हवाई दलाच्या  तीन दिवसीय  द्विवार्षिक कमांडर्स परिषदे मध्ये ते  बोलत होते.  भविष्यातल्या आव्हानांशी जुळवून घेण्याच्या हवाई दलाच्या क्ष...

November 19, 2024 8:09 PM

views 27

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

झारखंड मध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. या टप्प्यात उद्या झारखंडच्या १२ जिल्ह्यातल्या ३८ मतदारसंघांसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान होणार असून ३१ नक्षलग्रस्त भागांत मात्र सुरक्षेच्या कारणास्तव सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल. या ...

November 19, 2024 2:56 PM

views 26

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आदेश

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना हवामान बदल आणि त्याचे आरोग्यावर होणारे परिणाम यासाठी जिल्हा आणि शहर पातळीवर कृती योजना विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि सल्लागार...

November 19, 2024 1:32 PM

views 19

उद्या झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान उद्या होणार असून त्यासाठी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आली आहे. उद्या सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतदान सुरळीत पार पडावं यासाठी राज्यभरात एकूण १४ हजार २१८ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. केंद्रीय निमलष्करी दल...

November 19, 2024 8:14 PM

views 26

जी-२० बैठकीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जागतिक नेत्यांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रिओ द जानेरो इथं जी-20 परिषदेच्या निमित्तानं, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ ईनाचिओ लुलादा सिल्व्हा यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, जैव इंधन, संरक्षण, आणि कृषी इत्यादी विविध क्षेत्रांमधल्या सहकार्यात सुधारणा करण्याबाबत कटीबद्धता व्यक्त केली. भारत आणि ब...

November 19, 2024 12:39 PM

views 20

यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने येत्या २४ तारखेला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशनादरम्यन लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांकडून पाठिंबा मागणार आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.