राष्ट्रीय

November 3, 2024 7:13 PM November 3, 2024 7:13 PM

views 14

वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जाहीर सभा घेतली

केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार प्रियांका गांधी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज जाहीर सभा घेतली. प्रियांका गांधी कोरोम आणि थरिओडे इथंही प्रचारसभा घेणार आहेत. तर राहुल गांधी अरीकोड इथं प्रचारसभा घेणार आहेत.   एलडीएफचे उमेदवार सत्यन मोकेर...

November 3, 2024 6:04 PM November 3, 2024 6:04 PM

views 2

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर दौऱ्यावर

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आपल्या सहा दिवसांच्या ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर दौऱ्यासाठी आज ऑस्ट्रेलियातल्या ब्रिस्बेन इथं पोहोचले. या भेटीदरम्यान ते ब्रिस्बेनमधे ऑस्ट्रेलियामधल्या भारताच्या चौथ्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करतील. कॅनबेरा इथं ते ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांच्यासोबत प...

November 3, 2024 6:28 PM November 3, 2024 6:28 PM

views 8

पंजाबमध्ये या वर्षभरात आतापर्यंत एक हजार किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त

पंजाबमध्ये या वर्षभरात आतापर्यंत एक हजार किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलीस या दोघांनीही केलेल्या कारवाईअंतर्गत अंमली पदार्थांचा हा प्रचंड साठा जप्त केला आहे आणि पंजाब पोलिसांनी सीमेवर आणि त्य...

November 3, 2024 4:02 PM November 3, 2024 4:02 PM

views 15

उत्तराखंडमधल्या केदारनाथ धाम मंदीराचे दरवाजे आज विधिवत बंद

प्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातल्या  केदारनाथ धाम मंदीराचे दरवाजे आज विधिवत बंद करण्यात आले. हिवाळा ऋतुमुळे भाऊबीजेचा मुहुर्त साधत सकाळी साडेआठ वाजता दरवाजे बंद झाले. या निमित्तानं १० क्विंटल फुलांचा वापर करून मंदीर आणि मंदीर परिसराची सजावट केली आहे...

November 3, 2024 12:46 PM November 3, 2024 12:46 PM

views 12

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी हवालदार जखमी झाले आहेत. जागरगुंडा या गावात आठवडी बाजारात तैनात असलेल्या या दोघांवर माओवाद्यांनी आज हल्ला केला. जखमी हवालदारांना प्रथमोपचारानंतर पुढच्या उपचारांसाठी हवाई मार्गानं हलवण्यात आलं आहे. या घटनेनंतर या भागात शोधम...

November 3, 2024 3:56 PM November 3, 2024 3:56 PM

views 17

भारताचं अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता धोरण, कृती आराखडा कॉप सिक्सटिन परिषदेच्या बैठकीत मांडला

अमेरिकेत कोलंबिया इथं झालेल्या कॉप सिक्सटिन परिषदेच्या सदस्य देशांच्या बैठकीत, देशाचे पर्यावरण राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग यांनी भारताचा अद्ययावत राष्ट्रीय जैवविविधता धोरण आणि कृती आराखडा मांडला. हा दस्तऐवज म्हणजे पर्यावरणीय आव्हानांचे अस्तित्व मान्य करून, त्याआधारे पुढची रणनिती ठरवण्याचा भारताचा ...

November 3, 2024 4:00 PM November 3, 2024 4:00 PM

views 14

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेचा निर्देशांक अद्याप अतिशय वाईट

दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेचा निर्देशांक अद्याप अतिशय वाईट आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२ वाजता दिल्लीत हवेचा निर्देशांक ३७९ इतका नोंदवला गेला. पुढचे २ ते ३ दिवस दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात धुकं आणि धुराचा पातळ थर राहील, असा अंदाज हवामा...

November 3, 2024 3:58 PM November 3, 2024 3:58 PM

views 11

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी येत्या ६ तारखेला नागपूरात संविधान संमेलनाला उपस्थित राहणार

भारताचे संविधान हेच सर्वोच्च आहे. मनुस्मृती विरोधात काँग्रेसची लढाई सुरुच आहे. त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी लढा उभारणे काळाची गरज आहे. हा लढा अधिक बुलंद करण्यासाठी विदर्भातील सामाजिक संस्थानी नागपूर इथे येत्या ६ तारखेला संविधान संमेलन आयोजित करण्यात आलं असून या संमेलनाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते रा...

November 3, 2024 11:44 AM November 3, 2024 11:44 AM

views 3

सूर्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप – एनएलएसटी उभारणार

सूर्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत लद्दाखमध्ये नॅशनल लार्ज सोलर टेलिस्कोप – एनएलएसटी उभारण्याची तयारी करत आहे. या प्रकल्पाचं  नेतृत्व बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स - आयआयए चे संचालक प्राध्यापक अन्नपूर्णी सुब्रमण्यमकरत आहेत. या प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात आली असून हा प्रकल्प अंत...