राष्ट्रीय

December 4, 2024 7:55 PM December 4, 2024 7:55 PM

views 20

महिलांच्या सहकारी संस्थांच्या विकासासाठी ७,७०८ कोटी रुपयांहून अधिक अर्थसाहाय्य मंजूर

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने महिलांचा सहभाग असलेल्या सहकारी संस्थांच्या विकासासाठी ७ हजार ७०८ कोटी रुपयांहून अधिक अर्थसाहाय्य मंजूर केलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. देशात २५ हजार ३८५ महिला कल्याणकारी सहकारी संस्था नोंदणीकृत आह...

December 4, 2024 7:07 PM December 4, 2024 7:07 PM

views 11

राज्यसभेत बॉयलर दुरुस्ती विधेयक २०२४ मंजूर

बॉयलर संदर्भातल्या शंभर वर्षं जुना कायदा रद्द करून, बॉयलर दुरुस्ती विधेयक, २०२४ आज राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकाच्या मंजुरीनंतर केंद्र सरकार केंद्रीय बॉयलर मंडळाची स्थापन करू शकणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत दिली. या विधेयकात बॉयलरमध्ये काम कर...

December 4, 2024 2:23 PM December 4, 2024 2:23 PM

views 9

तेलंगणातल्य़ा अनेक भागात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

तेलंगणातल्य़ा अनेक भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्का जाणवले. रिक्टर मापकावर त्याची तीव्रता पाच पूर्णांक तीन दशांश नोंदली गेली. सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी जाणवलेल्या या भूकंपाचं केंद्र मुलुगु जिल्ह्यात होतं. करीमनगर, पेद्दापल्ली, जनगाव,महबूबाबाद, हनुमकोंडा वरंगळ, आणि भद्राद्री कोथागुडम या जिल्ह्यांम...

December 4, 2024 2:21 PM December 4, 2024 2:21 PM

views 10

भारतीय स्टेट बँकेने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांचा केला सन्मान

भारतीय स्टेट बँकेनं आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त काल मुंबईत पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या भारताच्या पॅरालिम्पिक विजेत्यांचा विशेष सन्मान केला. या कार्यक्रमात २९ पॅरालिम्पिक विजेत्यांना धनादेश प्रदान करून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.

December 4, 2024 2:19 PM December 4, 2024 2:19 PM

views 2

सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी केला निषेध

अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरात शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी निषेध केला आहे. संसद भवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली. पंजाबमध्ये शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यां...

December 4, 2024 2:17 PM December 4, 2024 2:17 PM

views 4

बीएसएनएलच्या ५० हजारांहून जास्त कर्मचाऱ्यांची सरकारने घेतली जबाबदारी- ज्योतिरादित्य सिंधिया

बीएसएनएल या तोट्यात असलेल्या कंपनीला केंद्र सरकारनं दिलेल्या पुनरुज्जीवनानंतर कंपनीला नफा झाल्याची माहिती केंद्रीय संपर्क मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज लोकसभेत पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारनं बीएसएनएलच्या ५० हजारांहून जास्त कर...

December 4, 2024 7:39 PM December 4, 2024 7:39 PM

views 15

डीआरआयच्या कारवाईत मेफेड्रोन आणि १ कोटी ९३ लाख रुपयांची रोकड जप्त

डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं तस्करीच्या एका प्रकरणात सोळा किलो मेफेड्रोन हा सायकॅट्रॉपीक पदार्थ आणि सुमारे एक कोटी ९३ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. १९८५ सालच्या NDPS या कायद्याच्या तरतुदीनुसार या प्रकरणी एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हैद्राबादहुन मुंबईला जाणाऱ्या एका बस मधून जा...

December 4, 2024 3:26 PM December 4, 2024 3:26 PM

views 8

लोकसभेत रेल्वे सुधारणा विधेयकावर चर्चा

रेल्वे सुधारणा विधेयक २०२४ वर आज लोकसभेत चर्चा झाली. या विधेयकामुळे रेल्वे क्षेत्रात कार्यक्षमता वाढीस लागेल, असं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी विधेयकावर चर्चा करताना सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेमध्ये प्रगती आणि परिवर्तन झाल्याचं वैेष्णव म्हणाले. रेल्वे...

December 4, 2024 1:42 PM December 4, 2024 1:42 PM

views 7

२४ व्या नौदल दिनानिमित्त भारतीय नौदलाचा आज ओडिशात पुरी इथं राष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम

आज नौदल दिन. १९७१ मध्ये ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान भारतीय नौदलानं चार पाकिस्तानी जहाजं बुडवली होती आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले होते. भारतीय नौदलाची ही कामगिरी आणि शौर्याचा आदर करण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. भारतीय नौदलाचे शूर जवान अतुलनीय धैर्यानं आणि समर्पणानं देश...

December 4, 2024 11:11 AM December 4, 2024 11:11 AM

views 15

21 हजार कोटी रुपयांच्या उपकरण खरेदी प्रस्तावाला नौदलाची मंजुरी

नौदल संरक्षण सामग्री अद्ययावत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 21 हजार कोटी रुपयांच्या उपकरण खरेदी प्रस्तावाला काल मंजुरी दिली. संरक्षण अधिग्रहण परिषदेनं 21 हजार 772 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पाच भांडवली अधिग्रहण प्रस्तावांचा यात समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.