राष्ट्रीय

December 8, 2024 2:13 PM December 8, 2024 2:13 PM

views 7

युनिफाईड पेमेंटस् इंटरफेसने वित्तिय समावेशन वाढवण्यात आणि समान आर्थिक विकासाला चालना देण्यात मिळवलं यश

आयआयएम आणि आयआरबीनं केलेल्या एका अभ्यासानुसार भारताच्या युनिफाईड पेमेंटस् इंटरफेसनं वित्तिय समावेशन वाढवण्यात आणि समान आर्थिक विकासाला चालना देण्यात यश मिळवलं आहे. युपीआयनं आर्थिक दृष्ट्या दुर्बल समूहांना प्रथमच औपचारिक कर्ज मिळवण्यासाठी सक्षम बनवल्याचंही या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. युपीआयमुळे मिळ...

December 8, 2024 3:14 PM December 8, 2024 3:14 PM

views 9

मानवतावादी मदत म्हणून भारताने म्यानमारला २ हजार २०० मेट्रिक टन तांदळाचा केला पुरवठा

मानवतावादी मदत म्हणून भारताने म्यानमारला २ हजार २०० मेट्रिक टन तांदळाचा पुरवठा केल्याची माहिती, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. भारताच्या अॅक्ट ईस्ट आणि नेबरहूड फर्स्ट या धोरणांतर्गत भारत मानवतावादी मदत करत आहे, असं जयस्वाल म्हणाले.

December 8, 2024 1:42 PM December 8, 2024 1:42 PM

views 10

क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

देशाच्या टीबी विरोधातल्या लढ्यात, अधिक रुग्णसंख्या असलेल्या टीबी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून १०० दिवसांच्या विशेष मोहीमेमुळे देश बळकट झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरील एका संदेशात मोदी यांनी सांगितलं की, रुग्णांना दुप्पट मदत, जन भागिदारी, नवीन औषधं, तंत्रज...

December 8, 2024 1:34 PM December 8, 2024 1:34 PM

views 7

अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नाही – परराष्ट्र व्यवहार मंत्री

अमेरिकेच्या डॉलरशी स्पर्धा करण्यासाठी नवीन चलन सुरु करण्याचा ब्रिक्स देशांचा कोणताही विचार नाही, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं. ते कतरच्या राजधानीत आयोजित दोहा फोरममध्ये बोलत होते. अमेरिकी डॉलरला कमकुवत बनवण्याचा ब्रिक्स देशांचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, या मुद्द...

December 8, 2024 10:36 AM December 8, 2024 10:36 AM

views 4

सीमा सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन आज जोधपूरमध्ये साजरा केला जाणार

सीमा सुरक्षा दलाचा ६० वा वर्धापन दिन आज जोधपूरमध्ये साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. जोधपूरमधल्या सीमा सुरक्षा दलाच्या राजस्थान फ्रंटिरियर हेडक्वार्टरमध्ये पहिल्यांदाच संचलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये श्वानपथकाचाही समावेश असेल. यावेळ...

December 8, 2024 10:34 AM December 8, 2024 10:34 AM

views 6

सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत योगदान देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

देशाच्या शूर जवानांच्या शौर्य, निर्धार आणि बलिदानाला सलाम करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटलं आहे. जवानांचं शौर्य आपल्याला प्रेरणा देतं आणि त्यांच्या त्यागापुढं आपण सर्वच नतमस्तक होतो, असं आपल्या संदेशात मोदी यांनी म्हंटलं आहे. सशस्त्र सेना ध्वज दिन निधीत य...

December 8, 2024 10:26 AM December 8, 2024 10:26 AM

views 14

क्षयरोगमुक्त भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात कोणतीही उणीव ठेवली जाणार नाही – जे. पी. नड्डा

क्षयरोगमुक्त भारताचं उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्नात कोणतीही उणीव ठेवली जाणार नाही, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी काल सांगितलं. पंचकुला इथून 100 दिवसांच्या देशव्यापी क्षयरोग निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ केल्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की 2025 पर्य...

December 7, 2024 7:42 PM December 7, 2024 7:42 PM

views 11

आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या कारवाईत दिल्ली पोलिसांकडून एकाला अटक

दिल्ली पोलिसांनी आंतरराज्य अमली पदार्थ तस्करीच्या कारवाईत एकाला अटक केली असून दोन किलोहून अधिक उच्च प्रतीचा चरस जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या 'नशामुक्त भारत' अभियानांतर्गत गेल्या १५ दिवसांत सुमारे ५५ किलो गांजा, ७ हजार ८०० क्वार्टर अवैध दारू, दोन किलोहून अधिक चरस आ...

December 7, 2024 8:26 PM December 7, 2024 8:26 PM

views 9

देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाला आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते हरयाणात पंचकुला इथं प्रारंभ झाला. देशातली ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या मिळून ३४७ जिल्ह्यांत आजपासून १०० दिवस ही मोहिम राबवली जाणार आहे. यात क्षयरोगाविषयी जनजागृती करणं आणि क्षयरोगाब...

December 7, 2024 7:07 PM December 7, 2024 7:07 PM

views 14

दूरदर्शनच्या  ओटीटी व्यासपीठामुळे प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळेल-नवनीत कुमार सहगल

दूरदर्शनच्या  ओटीटी व्यासपीठामुळे प्रेक्षकांना निखळ मनोरंजन मिळेल तसंच प्रसारभारतीला आपल्या प्रेक्षकांची व्याप्ती वाढवण्यास मदत  होईल, असं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सहगल यांनी सांगितलं. अहमदाबाद इथं दूरदर्शनच्या  कार्यालयाला आज भेट दिल्यानंतर ते बोलत होते. ओटीटीद्वारे नवे कार्यक्रम प्रेक्षका...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.