राष्ट्रीय

January 5, 2025 7:42 PM

views 17

गुजरातमधे झालेल्या हेलिकॉप्टरअपघातात तिघांचा मृत्यू

भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला आज गुजरात मधल्या पोरबंदर विमानतळाच्या धावपट्टीवर झालेल्या अपघातात दोन वैमानिक आणि एका क्रू सदस्याचा मृत्यू झाला. हे हेलिकॉप्टर आपला नियमित सराव करत असताना ही दुर्घटना घडली, अपघाताचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरु झाल्याचं तटरक्षक दलानं सांगितलं.

January 5, 2025 7:40 PM

views 18

पॅरासिटामोलची निर्मिती करण्यासाठी स्वदेशी तत्रंज्ञान विकसित

सीएसआयआर अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं पॅरासिटामोल या वेदनाशामक आणि तापावरच्या गुणकारी औषधाची निर्मिती करण्यासाठी एक स्वदेशी तत्रंज्ञान विकसित केलं आहे, अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केली आहे. ते आज सीएसआयआर च्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार...

January 5, 2025 7:39 PM

views 24

NIA:पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या सज्जाद आलमला अटक

राष्ट्रीय तपास संस्था, एनआयएनं, फुलवारी शरीफ दहशतवादी मॉड्युल प्रकरणात पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या सज्जाद आलम या मुख्य आरोपीला काल अटक केली. पॉप्युरलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना  दहशतवादी कारवायांना रसद पुरवत असल्याचा आरोप असून या संघटनेवर सरकारनं बंदी घातली आहे.   बिहार मधल्या पटना ...

January 5, 2025 7:22 PM

views 13

ईडीचे मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे

सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं सुमारे ४ हजार ९५७ कोटी रुपयांच्या  कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे घातले असून त्यामध्ये प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीच्या कार्यालयाचा समावेश आहे. या कारवाईत ५ कोटी ४ लाख  रुपयांची  बँक खाती आणि म्युच्युअल फंड गोठवण्यात आले ...

January 5, 2025 1:55 PM

views 43

जम्मू काश्मीरमधे वाहन अपघातात ४ जमांचा मृत्यू, दोघं बेपत्ता

जम्मू काश्मीरमधे किश्तवाड जिल्ह्यात ग्वार मासू परिसरात एका वाहन अपघातात ४ जमांचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता झाले आहेत. घाटातल्या रस्त्यावरुन घसरुन हे वाहन खोल दरीतल्या नदीत कोसळलं. किश्तवाड पोलिसांनी मदतकार्य सुरु केलं आहे. किश्तवाडचे खासदार आणि केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी या दुर्घटने...

January 5, 2025 1:47 PM

views 4

क्रीडामंत्री मनसुख मांडवीय ‘संडेज ऑन सायकल’ उपक्रमात सहभागी

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय आज फिट इंडिया मोहिमेंतर्गत गुजरातमधे पोरबंदर इथं आयोजित संडेज ऑन सायकल या उपक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी पोरबंदर मधल्या उपलेटा परिसरात स्थानिकांसमवेत सायकलवरुन रपेट केली.  संडेज ऑन सायकल हा युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं सायकलिंग फेडरेशन...

January 5, 2025 1:39 PM

views 20

कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्लीत ईडीचे छापे

सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई विभागानं सुमारे ४,९५७ कोटी रुपयांच्या कर्ज व्यवहार घोटाळ्याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली इथल्या १४ ठिकाणांवर छापे घातले असून त्यामध्ये प्रतिभा इंडस्ट्रीज या कंपनीच्या कार्यालयाचा समावेश आहे. या कारवाईत ५ कोटी ४ लाख  रुपयांची  बँक खाती आणि म्युच्युअल फंड गोठवण्यात आले आहेत त...

January 5, 2025 1:30 PM

views 41

नागरिकांच्या डिजिटल वैयक्तिक तपशीलांची गोपनीयता राखण्यासाठी नियमावली जारी

नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचं संरक्षण करणं हा डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या मसुद्याचा उद्देश आहे. असं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. नागरिकांच्या डिजिटल स्वरुपातल्या वैयक्तिक तपशीलांची गोपनीयता कायम राखण्यासाठी कायद्याची चौकट मजबूत क...

January 5, 2025 1:11 PM

views 24

भारत आणि बांगलादेश ताब्यात असलेल्या एकमेकांच्या मच्छीमारांची सुटका करणार

भारत आणि बांगलादेश आज त्यांच्या ताब्यात असलेल्या एकमेकांच्या  मच्छीमारांची  सुटका करणार आहेत. बांगलादेशच्या ताब्यात असलेले  ९५ भारतीय मच्छीमार मायदेशी परतणार असून, भारत ९० बांगलादेशी मच्छिमारांना सोडणार आहे. याशिवाय काही नौका देखील परत केल्या जाणार आहेत. भारतीय मच्छीमार दोन महिन्यांहून अधिक काळ बांग...

January 5, 2025 12:58 PM

views 18

छत्तीसगढ : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ४ माओवादी ठार, एक जवान शहीद

छत्तीसगढमधे सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत किमान ४ माओवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे. या चकमकीत एक सुरक्षा जवान शहीद झाला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.