राष्ट्रीय

December 24, 2024 12:48 PM December 24, 2024 12:48 PM

views 4

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातून  निवृत्त झालेले न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. प्रियांक कानुंगो आणि निवृत्त न्यायमूर्ती डॉ. विद्युत रंजन सारंगी यांचीही सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

December 24, 2024 2:53 PM December 24, 2024 2:53 PM

views 8

केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते तीन नव्या ऍपचं उद्घाटन

राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन व्यासपीठांवरचा धोका ओळखण्यासाठी आणि ग्राहकांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज तीन नव्या ऍपचं उद्घाटन केलं. यात जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप, आणि जागृती डॅशबोर्डचा समावेश आहे. या ऍपमुळे फसवणुकीच्या प्रकरणाविरोधात का...

December 23, 2024 8:12 PM December 23, 2024 8:12 PM

views 8

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संस्थांमधील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे – राष्ट्रपती

वैद्यकीय क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर यामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी संस्थांमधील सहकार्य अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. नवी दिल्लीत आज संध्याकाळी वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालय आणि सफदरजंग रुग्णालयाच्या सहाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना त...

December 23, 2024 8:10 PM December 23, 2024 8:10 PM

views 1

नागरी उड्डाण मंत्रालयाची विमान तळांवर ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करण्याची घोषणा

विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नागरी उड्डाण मंत्रालयानं विमान तळांवर ‘उडान यात्री कॅफे’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. विमान तळांवर वाजवी दरात खाद्यपदार्थ आणि पाण्याची सोय होणार असल्यानं प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा आहे. प्रायोगिक तत्वावर कोलकता विमान तळावर सुरू केलेला हा उपक्रम यशस्वी झाल्यानं...

December 23, 2024 1:17 PM December 23, 2024 1:17 PM

views 5

विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचं दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी

दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आज दिल्ली सरकारविरुद्ध आरोपपत्र जारी केले. सत्ताधारी आप सरकारनं नागरिकांना दिलेली आश्वासनं पूर्ण केले नाहीत असा आरोप करत भाजपचे ज्येष्ठ नेते  अनुराग ठाकूर, दिल्ली भाजपचे प्रमुख विरेंद्र सचदेवा आणि अन्य काही नेत्यांनी यासंदर्भातील पुरावे सादर केले आहेत....

December 23, 2024 1:04 PM December 23, 2024 1:04 PM

views 6

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी चौधरी चरणसिंग यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज चौधरी चरणसिंग यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले की, २००१ सालापासून चौधरी चरणसिंह यांची जयंती किसान दिन म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरणसिंह यांनी शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासासाठी आपलं जीवन समर्पित केले ...

December 23, 2024 1:31 PM December 23, 2024 1:31 PM

views 5

तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार महत्व देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

तरूणांच्या क्षमता आणि कलागुणांचा पूरेपूर वापर करून या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तरूणांना सक्षम बनवण्याला केंद्र सरकार प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित रोजगार मेळाव्याला संबोधित करत होते.  देशभरात ४५ ठिकाणी असे रो...

December 23, 2024 1:31 PM December 23, 2024 1:31 PM

views 5

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रमांचं आयोजन

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाची प्रगती आणि विकासामध्ये शेतकऱ्यांच महत्व आणि भागिदारी अधोरेखित करणं, अन्न सुरक्षा, शाश्वत ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी परंपरा जपण्यासाठी शेतकऱ्यांचं योगदान कसं महत्वाचं आहे यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. शेतकऱ...

December 23, 2024 12:42 PM December 23, 2024 12:42 PM

views 21

उत्तरप्रदेशात पोलिसांच्या चकमकीत तीन खलिस्तानी अतिरेकी ठार

उत्तर प्रदेशातल्या पिलभीत जिल्ह्यात आज सकाळी खलिस्तानी अतिरेकी आणि पोलिसांच्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. हे तिन्ही खलिस्तानवादी अतिरेकी १९ डिसेंबर रोजी पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या एका पोलीस चौकीवर झालेल्या हातबॉम्ब हल्ल्यात सहभागी होते. पिलभीत जवळच्या भागात खलिस्तानवादी अतिरेकी असल्याची मा...

December 23, 2024 1:32 PM December 23, 2024 1:32 PM

views 11

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची तीव्र लाट

देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीची तीव्र लाट सुरु आहे. हवामान विभागानं, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. श्रीनगरमध्ये काल रात्री निचांकी ४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून डोंगराळ भागात सर्वत्र बर्फ ...