राष्ट्रीय

December 25, 2024 7:05 PM December 25, 2024 7:05 PM

views 8

EPFO मधे ऑक्टोबरपर्यंत एकूण 13 लाख 41 हजार सदस्यांची नोंदणी

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने या वर्षीच्या ऑक्टोबरपर्यंत एकूण 13 लाख 41 हजार सदस्यांची नोंदणी केली. कर्मचारी आणि रोजगार मंत्रालयाने ही माहिती देताना म्हटलं आहे की वाढत्या रोजगार संधी आणि कर्मचारी कल्याणाबद्दल वाढती जाणीव तसंच EPFO च्या प्रयत्नांमुळे ही वाढ दिसून येत आहे.

December 25, 2024 8:13 PM December 25, 2024 8:13 PM

views 16

दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त देशाची आदरांजली

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांची आजची शतकमहोत्सवी जयंती आपणा सर्वांसाठी सुशासनाची प्रेरणा घेण्याचा दिवस आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशातल्या खजुराहो इथं देशातल्या पहिल्या, महत्त्वाकांक्षी आणि बहुद्देशीय केन-बेटवा राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पाची ...

December 25, 2024 5:49 PM December 25, 2024 5:49 PM

views 2

निवडणूक नियमात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला काँग्रेसचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

निवडणूक नियमात केंद्र सरकारने केलेल्या दुरुस्तीला काँग्रेस पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. निवडणूकींशी संबधित इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज सर्वसामान्यांना तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यायला मनाई करणारी सुधारणा निवडणूक नियम १९६१ मध्ये करण्यात आली आहे. मात्र उमेदवारांनी मागणी केल्यास हे दस्तावेज त्या...

December 25, 2024 3:27 PM December 25, 2024 3:27 PM

views 8

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटकपक्षांची बैठक सुरु

मित्रपक्षांबरोबरचा समन्वय अधिक वृद्धिंगत करण्यासाठी म्हणून भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेतला असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी एनडीए सरकारच्या घटक पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरु आहे.  या बैठकीला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाब...

December 25, 2024 3:29 PM December 25, 2024 3:29 PM

views 16

अफगाणिस्तानमध्ये पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जणांचा मृत्यु

अफगाणिस्तानमध्ये, पक्तिका प्रांतातल्या बरमल जिल्ह्यावर काल रात्री पाकिस्ताननं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १५ जण मृत्युमुखी पडले. तालिबान या दहशतवादी संघटनेवर लक्ष्य साधत अफगाणिस्तान बरोबरच्या आपल्या सीमे लगतच्या डोंगराळ भागात पाकिस्ताननं हा हल्ला केल्याचं स्थानिक वृत्त संस्थेनं म्हटलं आहे. पाकिस्ता...

December 25, 2024 3:30 PM December 25, 2024 3:30 PM

views 40

हिमाचल प्रदेशात हिमवर्षावामुळे तीन राष्ट्रीय महामार्गांसह रस्ते वाहतुकीसाठी बंद

हिमाचल प्रदेशाच्या उंच डोंगराळ भागात झालेली बर्फवृष्टी आणि पावसामुळे संपूर्ण राज्य कडाक्याच्या थंडीत गारठून गेलं आहे. गेले तीन दिवस सुरु असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यातल्या तीन राष्ट्रीय महामार्गांसह शेकडो रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत, आणि अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. किन्नौर जिल्ह्यात म...

December 25, 2024 3:30 PM December 25, 2024 3:30 PM

views 11

१९ व्या ‘मोहम्मद रफी’ पुरस्काराचं राज्यपालांच्या हस्ते वितरण

१९ व्या 'मोहम्मद रफी' पुरस्काराचं वितरण काल मुंबईत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झालं. हिंदी चित्रपट सृष्टीतले लोकप्रिय गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना यंदाचा 'मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार' मरणोत्तर देण्यात आला. हिंदीसह बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू, उर्दू अशा विविध प...

December 25, 2024 2:19 PM December 25, 2024 2:19 PM

views 2

पंडित मदनमोहन मालवीय यांची १६३ वी जयंती देशभरात सर्वत्र साजरी

पंडित मदनमोहन मालवीय यांची १६३ वी जयंती आज देशभरात सर्वत्र साजरी करण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उल्लेखनीय योगदानासोबतच प्राचीन भारतीय संस्कृतीचे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती होती. समाजकार्य, पत्रकारिता, वकिली अशा क्षेत्रातही ते कार्यरत होते. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं त्यांना...

December 25, 2024 2:14 PM December 25, 2024 2:14 PM

views 3

संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या हस्ते राष्ट्रपर्व वेबसाइट आणि ॲप चं उदघाटन

माजी प्रधानमंत्री दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंती निमित्त संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपर्व ​​वेबसाइट आणि ॲप चं उदघाटन केलं. ही वेबसाइट सर्वसामान्य जनतेला प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, बीटिंग रिट्रीट आणि टेबलॉक्स यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांशी ...

December 25, 2024 12:48 PM December 25, 2024 12:48 PM

views 10

प्रशासन सुलभ करण्यासाठी सुमारे २००० कालबाह्य नियम आणि कायदे रद्द केले- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह

प्रशासनाच्या कामकाजात सुटसुटीतपणा आणण्यासाठी तसंच ते जास्तीत जास्त लोकाभिमुख करण्यासाठी कालबाह्य झालेले सुमारे दोन हजार नियम काढून टाकण्यात आल्याची माहिती कार्मिक, नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली आहे. सुशासन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित एका कार्यक्रमात ते काल...