राष्ट्रीय

January 1, 2025 8:15 PM January 1, 2025 8:15 PM

views 2

उड्डाणाला होणाऱ्या विलंबाचं प्रमाण कमी करणं महत्वाचं – मंत्री किन्जरप्पू राम मोहन नायडू

खराब हवामानाच्या परिस्थितीत हवाई वाहतूक सुरळीत ठेवतानाच उड्डाणाला होणाऱ्या विलंबाचं प्रमाण कमी करणं महत्वाचं आहे असं नागरी हवाई वाहतूक मंत्री किन्जरप्पू राम मोहन नायडू यांना म्हटलं आहे. दाट धुक्यामुळे हवाई उड्डाणांना होणारा विलंब किवा उड्डाणे रद्द होणे या परिस्थितीला तोंड देण्याची पूर्वतयारी करण्याब...

January 1, 2025 8:39 PM January 1, 2025 8:39 PM

views 4

डीएपी खतांवर प्रतिटन ३,५०० रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

डीएपी, अर्थात डायअमोनियम फॉस्फेट खतांवर प्रतिटन साडेतीनहजार रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. हा निर्णय पुढच्या आदेशांपर्यंत लागू राहील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं.   प्रधानमंत्री पीक...

January 1, 2025 8:10 PM January 1, 2025 8:10 PM

views 5

भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी स्वीकारला पदभार

भारतीय हवाई दलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून  एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांनी आज पदभार स्वीकारला. लढाऊ विमानाचे वैमानिक म्हणून भारतीय हवाई दलात डिसेंबर १९८६ मध्ये  ते रुजू झाले होते. ३८वर्षांच्या आपल्या सेवा कारकिर्दीत, एअर मार्शल मिश्रा यांनी  महत्त्वाच्या विविध पदांवर काम केलं आहे. त्यांचे प...

January 1, 2025 7:07 PM January 1, 2025 7:07 PM

views 4

INS शिवाजी नौदलाच्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात ३५ अधिकाऱ्यांचं सागरी अभियांत्रिकी प्राविण्य अभ्यासक्रम पूर्ण

आयएनएस शिवाजी या नौदलाच्या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रात ३५ अधिकाऱ्यांनी सागरी अभियांत्रिकी प्राविण्य अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. यामध्ये भारतीय नौदलातल्या २१, भारतीय तटरक्षक दलातल्या ४ आणि श्रीलंका, नामिबिया आणि फिलिपाइन्स या देशांमधल्या प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला होता. नौदलातल्या अधिकाऱ्यां...

January 1, 2025 8:39 PM January 1, 2025 8:39 PM

views 9

शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्रसरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांसंदर्भात त्यांनी  सांगितलं, की देशासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा देशवासियांना अभिमान  आहे. 

January 1, 2025 6:56 PM January 1, 2025 6:56 PM

views 59

डिसेंबर महिन्यात जीएसटी संकलन १ लाख ७६ हजार कोटी रुपयांवर

जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवाकर संकलन, डिसेंबर महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ७ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांची वृद्धी नोंदवून १ लाख  ७६ हजार कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर २०२३  मध्ये एकूण जीएसटी संकलन १ लाख ६४ हजार कोटी इतकं होतं.  डिसेंबर २०२४ मध्ये केंद्रीय जीएसटी संकलन ३२ हजार ...

January 1, 2025 3:54 PM January 1, 2025 3:54 PM

views 4

‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजनेला प्रारंभ

विद्यार्थ्यांना विद्वत्तायुक्त संशोधन लेख आणि पत्रिका प्रकाशनांमधलं ज्ञान सहज उपलब्ध व्हावं या उद्देशानं आखण्यात आलेल्या 'वन नेशन वन सबस्क्रिप्शन' योजनेला आजपासून प्रारंभ झाला. यामुळे सरकारी अनुदान असलेल्या शैक्षणिक संस्था, विद्यापीठं आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेतल्या देशभरातल्या सुमारे १ कोटी ८० ला...

January 1, 2025 2:30 PM January 1, 2025 2:30 PM

views 2

मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार ५०हजार रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण देणार

मणिपूरमधल्या हिंसाचारामुळे स्थलांतरित व्हावं लागलेल्या नागरिकांना राज्य सरकार ५०हजार रुपयांपर्यंतचं कर्ज विनातारण देणार आहे. मुख्यमंत्री उद्योजकता सहाय्य योजनेतून हे कर्ज देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी काल केली. या योजनेअंतर्गत याआधीच ४२६ लोकांना व्यवसायासाठी कर्ज दिल्याचं त...

January 1, 2025 3:54 PM January 1, 2025 3:54 PM

views 3

जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत

देशासह जगभरात नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारताच्या दैदिप्यमान, सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी एकजुटीनं कार्य करण्याच्या वचनबद्धतेला आपण पुन्हा एकदा उ...

January 1, 2025 1:54 PM January 1, 2025 1:54 PM

views 21

२०२५ हे वर्ष संरक्षण क्षेत्रासाठी सुधारणा वर्ष असेल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची घोषणा

संरक्षण क्षेत्रात सध्या सुरु असलेल्या आणि नव्यानं सुरु केल्या जाणाऱ्या सुधारणांना गती देण्याच्या उद्देशानं २०२५ हे वर्ष सुधारणांचं वर्ष असेल, असं संरक्षण मंत्रालयानं घोषित केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नववर्षाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्रालयातल्या सचिवांसोबत बैठक घेऊन विविध महत्व...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.