राष्ट्रीय

January 2, 2025 2:38 PM January 2, 2025 2:38 PM

views 16

उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम

उत्तर भारतात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या ४३ गाड्या पाच तास उशिरा धावत आहेत, त्यामुळे प्रवाशांनी आपल्या गाडीची सद्यःस्थिती तपासूनच स्थानकावर जावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.

January 2, 2025 2:31 PM January 2, 2025 2:31 PM

views 8

लडाख स्की आणि स्नोबोर्ड संस्थेनं कारगिलमध्ये कृत्रिमरित्या बर्फ बनवण्याचं यंत्र विकसित

लडाख स्की आणि स्नोबोर्ड संस्थेनं कारगिलमध्ये कृत्रिमरित्या बर्फ बनवण्याचं यंत्र विकसित केलं आहे. लडाखमध्ये अलिकडच्या काळात अनिश्चित बर्फवृष्टी होत असल्यामुळे हिवाळी पर्यटन आणि क्रीडा या साठी ही निर्मीती महत्त्वाची आहे. सादिक अली आणि त्यांच्या चमूनं निर्माण केलेलं हे यंत्र कृत्रिम बर्फ तयार करण्यासाठ...

January 2, 2025 2:29 PM January 2, 2025 2:29 PM

views 11

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु

नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरु आहे. कर्तव्यपथावर संरक्षण दलाच्या सैनिकांकडून संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकिटांची विक्री आजपासून सुरू झाली. आमंत्रण डॉट एम ओ डी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्...

January 2, 2025 1:55 PM January 2, 2025 1:55 PM

views 13

नवी दिल्लीतल्या ९०० कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचं उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. जेजे क्लस्टर मधल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे १७ शे फ्लॅट्स चं ते उद्घाटन करतील, तसंच नवी दिल्लीतल्या अशोक विहार इथल्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी सुपूर्द करतील. दिल्लीतल्या दोन नागरी पु...

January 2, 2025 1:42 PM January 2, 2025 1:42 PM

views 2

सन २०२४ मधे देशात वाहन विक्रीत ९ टक्के वाढ

२०२४ या वर्षी देशात वाहन विक्रीत ९ टक्के वाढ झाली असून ती २ कोटी ६० लाखापर्यंत पोहोचली आहे. कोविड काळापूर्वीचा २०१८ मधला २ कोटी ४५ लाखाचा उच्चांक या वर्षात वाहनविक्रीने ओलांडला. वैयक्तिक उपभोगासाठी खर्च करण्य़ाची ऐपत वाढल्याचं हे निदर्शक आहे. पायाभूत सुविधा क्षेत्रावर अधिक लक्ष देण्याचं सरकारचं धोरण ...

January 2, 2025 1:38 PM January 2, 2025 1:38 PM

views 5

देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका कायम

देशाच्या अनेक भागात थंडीचा कडाका कायम आहे. हिमाचल प्रदेश,छत्तीसगड, बिहार या राज्यांत अनेक ठिकाणी पारा खाली गेला आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असून सिमला,मनालीच्या पर्वतीय भागांत बर्फवृष्टीची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या ठिकाणच्या मैदानी भागात वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा अं...

January 2, 2025 9:51 AM January 2, 2025 9:51 AM

views 7

वर्षाच्या प्रारंभी देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काल केंद्रीय मंत्रिमंडळाचे अनेक महत्वपूर्ण निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाने काल वर्षाच्या प्रारंभी देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. डीएपी, अर्थात डायअमोनियम फॉस्फेट खतांवर प्रतिटन साडेतीन हजार रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा तसच पंतप्रधान पीक विमा योजना आणि हवामानाधारित पीकविमा योजनेला 2025-26 या आर्थिक वर...

January 2, 2025 9:48 AM January 2, 2025 9:48 AM

views 9

हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश

हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश आलं आहे. 2020 मध्ये देशाच्या उत्सर्जनात त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत 7.93 टक्क्यांनी घट झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या हवामान बदल कार्यालयाला सादर केलेल्या 2005 ते 2020 पर्यंतच्या आकडेवारीत भारताच्या GDP च्या तुलनेत उत्सर्जनाच्या ती...

January 2, 2025 9:43 AM January 2, 2025 9:43 AM

views 20

देशात 123 वर्षांनंतर 2024 हे ठरल सर्वात उष्णतेच वर्ष

देशात 1901 सालानंतर 123 वर्षांनंतर 2024 हे वर्ष सर्वात उष्णतेच वर्ष ठरल असल्याची माहिती काल भारतीय हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी ही माहिती दिली. तसच जानेवारी महिन्यात देशातील उत्तर पश्चिम आणि मध्य पश्चिम भाग वगळता इतर सर्व ठिकाणी किमान आणि क...

January 1, 2025 8:19 PM January 1, 2025 8:19 PM

views 9

भारत आणि पाकिस्तानच्या अणुप्रकल्पांच्या याद्या सादर

भारत आणि पाकिस्तानने आपापाल्या अणुप्रकल्पांच्या याद्या एकमेकांना सादर केल्या. उभय देशांमधे अणुप्रकल्पांवर संभाव्य हल्ला रोखण्याच्या दृष्टीनं झालेल्या कराराचा भाग म्हणून दरवर्षी जानेवारीत या याद्या सादर केल्या जातात.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.