राष्ट्रीय

January 5, 2025 12:58 PM January 5, 2025 12:58 PM

views 8

छत्तीसगढ : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ४ माओवादी ठार, एक जवान शहीद

छत्तीसगढमधे सुरक्षा दलांनी राबवलेल्या शोधमोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत किमान ४ माओवादी ठार झाले. त्यांचे मृतदेह सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त केला आहे. या चकमकीत एक सुरक्षा जवान शहीद झाला.

January 5, 2025 1:58 PM January 5, 2025 1:58 PM

views 11

महाकुंभमेळ्यासाठी रेल्वे १३,००० गाड्या सोडणार

उत्तर प्रदेशात प्रगायराज इथं होणार असलेल्या महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविक आणि यात्रेकरुंच्या सोयीसाठी भारतीय रेल्वे १३ हजार गाड्या चालवणार आहे. यात १० हजार नियमित आणि ३ हजार विशेष गाड्यांचा समावेश आहे. कुंभमेळ्या आधी आणि नंतर दोन ते ती अतिरिक्त दिवस असे मिळून ५० दिवस या गाड्या चालवल्या जाती...

January 5, 2025 1:59 PM January 5, 2025 1:59 PM

views 8

HMP विषाणूजन्य आजाराच्या प्रादुर्भावावर सरकारचं बारकाईनं लक्ष – आरोग्य मंत्रालय

HMP या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून वेगानं वाढत असून केंद्र सरकारचं त्यावर बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. आय सी एम आर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद येत्या काही दिवसांत देशभरात  एच एम पी  च्या चाचण्या करणाऱ्या प्रयोगशाळांची संख्...

January 5, 2025 12:59 PM January 5, 2025 12:59 PM

views 25

फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका ‘चार्ल्स डी गॉल’ गोव्यात दाखल

भारत  आणि फ्रान्स  यांच्यातील  वरुण  या संयुक्त नौदल सरावात सहभागी होण्यासाठी  फ्रेंच नौदलाची अणुऊर्जेवर चालणारी विमानवाहू नौका चार्ल्स डी गॉल काल गोव्यात दाखल झाली. गोव्याच्या मुरगाव पोर्ट ट्रस्ट जेट्टीवर  काल या विमानवाहू नौकेचं  आगमन झाल्यावर भारतीय नौदलाच्या वाद्यपथकानं औपचारिक स्वागत केलं. उभय ...

January 5, 2025 9:35 AM January 5, 2025 9:35 AM

views 14

दिल्लीत दाट धुक्यामुळे विमान आणि रेल्वेसेवा विस्कळीत

धुक्याच्या दाट थरामुळे आज सकाळी दिल्लीत विमान उड्डाण आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. धुक्यामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक विमानांना उशीर होत आहे. अनेक रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत.

January 5, 2025 9:28 AM January 5, 2025 9:28 AM

views 5

बिहारमध्ये गुरु गोविंद सिंगजी यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रकाश उत्सव

बिहारमधील पाटणा शहरातील तख्त श्री हरमंदिर साहिब इथं शीख समुदायाचे १०वे आणि शेवटचे शीखगुरू गुरु गोविंद सिंगजी यांच्या ३५८व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय प्रकाश उत्सव सोहळ्याला काल सुरुवात झाली. तख्त श्री हरमंदिर साहिब हे गुरु गोविंद सिंगजी यांचं जन्मस्थान आहे. यानिमित्तानं आज भव्य नगर कीर्तन अर्थात मिरव...

January 5, 2025 9:24 AM January 5, 2025 9:24 AM

views 2

मध्यप्रदेश : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाची पाहणी

देशात सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात ९० गिगावॅट क्षमता असून त्याला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असं मत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्यक्त केलं. त्यांनी काल मध्यप्रदेशमधल्या खंडवा जिल्ह्यातील ओंकारेश्वर तरंगत्या सौर प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. ओंकारेश्वर...

January 5, 2025 9:16 AM January 5, 2025 9:16 AM

views 5

शेतजमिनीसाठी प्रतिएकर १२,००० रुपये देण्याचा तेलंगणा मंत्रिमंडळाचा निर्णय

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी रायथू भरोसा योजनेंतर्गत शेतजमिनीसाठी प्रति एकर १२,००० रुपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १०,००० रुपयांच्या मदतीमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना या प्रस्तावित योजनेअंतर्गत भूमिहीन श...

January 5, 2025 12:10 PM January 5, 2025 12:10 PM

views 5

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन दोन दिवस भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आजपासून दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा  करणार आहेत. अंतराळ, संरक्षण आदी क्षेत्रात उभयपक्षी संबंधावर त्यांची चर्चा होणार असून हिंद प्रशांत महास...

January 4, 2025 8:59 PM January 4, 2025 8:59 PM

views 3

पोलंडचे राजदूत म्हणून भारतीय अधिकारी जयंत खोब्रागडे यांची नियुक्ती

पोलंडचे राजदूत म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी जयंत एन. खोब्रागडे यांची नियुक्ती झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी ही घोषणा केली. खोब्रागडे हे १९९५ च्या बॅचचे अधिकारी असून सध्या ते आसियानमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.