राष्ट्रीय

January 16, 2025 2:13 PM January 16, 2025 2:13 PM

views 7

प्रयागराज येथे ३१ जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यातून संस्कृती आणि भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनही केलं जात आहे. ३१ जानेवारीला हरित महाकुंभ मेळ्याचं आयोजन केलं आहे. देशात पर्यावरण आणि जल संवर्धनासाठी काम करणारे एक हजारांहून अधिक कार्यकर्ते या दिवशी प्रयागराजला येणार आहेत. यावेळी निसर्ग, पर्यावरण, जल आणि स्वच...

January 16, 2025 2:11 PM January 16, 2025 2:11 PM

views 11

संशयित आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी

पश्चिम बंगालमध्ये काल एका संशयित आरोपीने केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या संशयितासह इतर दोघांना राजगंज इथल्या सुधारगृहात नेत असताना त्यानं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

January 16, 2025 2:08 PM January 16, 2025 2:08 PM

views 16

दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता – हवामान विभाग

दिल्ली आणि परिसरात आज सकाळी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे तापमानात घट झाली असली तरी दृश्यमान्यता सुधारली आहे. दिल्लीत संध्याकाळपर्यंत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं दिली आहे. पश्चिमेला होत असलेल्या हवामान बदलाचा फटका राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि दिल्लीला बसत असल्याची ...

January 16, 2025 1:51 PM January 16, 2025 1:51 PM

views 9

सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत

राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही देश डिजीटल तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या वाटेवर वाटचाल करत आहेत. गुजरातची गिफ्ट सिटी आणि सिंगापूर दरम्यान अपांरपरिक ऊर्जा निर्म...

January 16, 2025 1:48 PM January 16, 2025 1:48 PM

views 13

केंद्रीय गृहमंत्री आज देशातल्या सात विमानतळांवरच्या जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं करणार उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोचिन आणि अहमदाबाद विमानतळांवर जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं उद्घाटन करणार आहेत. या यंत्रणेमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा मिळणार आहेत, त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सहज आणि विनाअडथळा होण्यासाठी मदत होणार आहे. य...

January 16, 2025 2:50 PM January 16, 2025 2:50 PM

views 15

ओपेक ने २०२६ पर्यंत जागतिक पातळीवर तेलाच्या मागणी वाढीचा अंदाज वर्तवला आहे

वर्ष २०२६ पर्यंत जागतिक पातळीवर तेलाची मागणी १४ लाख ३० हजार बॅरल प्रति दिवस या दराने वाढून १ हजार ६६ लाख बॅरल प्रति दिवस इतकी होईल, असा अंदाज पेट्रोलियम निर्यातदार देशांची संघटना ‘ओपेक’ने वर्तवला आहे. या वर्षी ही मागणी १४ लाख ५० हजार बॅरल प्रति दिवस या दराने वाढण्याचा ‘ओपेक’चा अंदाज आहे. जगातल्या मो...

January 16, 2025 1:43 PM January 16, 2025 1:43 PM

views 13

इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गंत अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गंत आज अंतराळात दोन उपग्रहांची यशस्वी जोडणी करण्यात आली. असा प्रयोग करणारा भारत जगातील चौथा देश बनला आहे. या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रोचं आणि संशोधकांच्या संपूर्ण चमूचं अभिनंदन केलं आहे. इस्रोनं मिळवलेलं हे यश आगाम...

January 16, 2025 10:30 AM January 16, 2025 10:30 AM

views 11

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांची नवी दिल्लीत घेणार भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे अध्यक्ष थरमन षण्मुगरत्नम यांची नवी दिल्लीत भेट घेतील. षण्मुगरत्नम राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा करतील. राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या सन्मानार्थ मेजवानी देखील देतील. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काल नवी दिल्लीत सिंगापूरच्या अध्यक...

January 16, 2025 8:42 AM January 16, 2025 8:42 AM

views 2

७७ वा लष्कर दिन सर्वत्र साजरा-संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात मुख्य संचलन

सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी ७७ वा लष्कर दिन काल साजरा झाला. १९४९ मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हातात घेतली होती. राज्यात लष्कर दिनाचं मुख्य संचलन पुण्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं. य...

January 15, 2025 8:39 PM January 15, 2025 8:39 PM

views 13

श्रीलंकेच्या पोलीस स्टेशन्सना ८० सिंगल कॅब पुरवण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतातल्या पोलीस स्टेशन्सना ८० सिंगल कॅब पुरवण्यासाठी आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार झाला. विकासातली भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी हा करार करण्यात आला असून त्यासाठी भारतानं ३० कोटी श्रीलंकन रुपयांचं अनुदान दिलं आहे.  भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे सार्वजन...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.