राष्ट्रीय

December 15, 2025 12:42 PM

views 13

लोकसभेचं काजकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसने माफी मागण्याची मागणी करत, सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केल्यामुळे लोकसभेचं  कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.    लोकसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेसच्या काल दिल्ली इथं...

December 14, 2025 8:08 PM

views 54

ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि विश्वसनीय स्रोत आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनी केलं. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारानं राष्ट्रपतींनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या कार्यक्रमात सन्मानित...

December 14, 2025 8:06 PM

views 115

भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नोबिन यांची नियुक्ती

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नोबिन यांची नेमणूक झाली आहे. भाजपाच्या संसदीय मंडळाने ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नितीन नोबिन सध्या बिहार मंत्रिमंडळात मंत्री असून ते जे पी नड्डा यांच्याकडून अध्यक्षप...

December 14, 2025 8:01 PM

views 16

मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेसचा नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर मेळावा

निवडणूक प्रक्रीयेत गैरप्रकार होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. मतदारयाद्यांचं सखोल पुनरिक्षण आणि इतर मुद्द्यांवर काँग्रेसनं आज नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर मेळावा घेतला. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची भाषणं मेळाव्यात झाली. मतचोरी रोखणं सर्वांचीच जबाबदारी असल...

December 14, 2025 7:59 PM

views 8

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते टपाल तिकिटाचं अनावरण

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं सम्राट पेरुंबिडुगू मुथरैयार दुसरे सुवरन मारन यांच्या सन्मानार्थ टपाल तिकिटाचं अनावरण झालं. तामिळ संस्कृती आणि भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून सातत्यानं दिल्या जाणाऱ्या पाठिंब्याचं त्यांनी कौतुक केलं.  

December 14, 2025 8:05 PM

views 34

लोकप्रिय फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते मुंबईत प्रोजेक्ट महादेवचा प्रारंभ

राज्यातल्या १३ वर्षांखालच्या फुटबॉल खेळाडूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रोजेक्ट महादेव या योजनेचा प्रारंभ आज लोकप्रिय फूटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या हस्ते झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता टायगर श्रॉफ, अजय देवगण यांच्यासह ...

December 14, 2025 6:52 PM

views 24

देशातल्या २५ राज्यांतल्या आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ९९ टक्के ब्रॉडगेज जाळ्याचं विद्युतीकरण पूर्ण

 भारतीय रेल्वेनं  देशातल्या २५ राज्यांतल्या आणि केंद्रशासित प्रदेशातल्या  सुमारे ९९ टक्के  ब्रॉडगेज जाळ्याचं  विद्युतीकरण पूर्ण केलं आहे.  २०१९ ते २०२५ या कालावधीत ३३ हजार किलोमीटरपेक्षा  अधिक मार्गांचे विद्युतीकरण करण्यात आलं  आहे. या कालावधीत करण्यात आलेलं  एकूण विद्युतीकरण हे जर्मनीच्या संपूर्ण र...

December 14, 2025 1:39 PM

views 37

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उद्यापासून दोन दिवस जॉर्डनच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,उद्यापासून दोन दिवस जॉर्डनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत आणि जॉर्डन यांच्यातल्या राजनैतिक संबंधांचं हे ७५वं वर्ष आहे. जॉर्डनकडून मिळणाऱ्या फॉस्फेटपासून भारतातल्या कृषी क्षेत्राला मिळणारी ऊर्जा, तसंच दोन्ही देशांमधले जवळचे सांस्कृतिक धागे यांच्या आधारावर दोन्ही देशांमधले संब...

December 14, 2025 11:43 AM

views 22

हस्तकला उद्योगाची निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची अपेक्षा

हस्तकला उद्योगातून सुमारे 50 हजार कोटी रुपयांची निर्यात होते आणि लवकरच ही निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत 'क्राफ्टेड फॉर द फ्युचर' या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. आज...

December 14, 2025 9:37 AM

views 23

दिल्लीच्या एम्समध्ये पक्षाघातावरील सुपरनोवा स्टेंटची चाचणी

नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं पक्षाघातावरील 'सुपरनोव्हा स्टेंट' नावाच्या नवीन आणि प्रगत उपचार उपकरणाची भारताची पहिली चिकित्सालयीन चाचणी घेतली आहे. सुपरनोव्हा स्टेंट देशातील विविध प्रकारच्या रुग्णांसाठी तयार केला आहे. पाश्चात्य देशांच्या तुलनेत कमी वयाच्या रुग्णांनाही अनेकदा पक्षाघ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.