राष्ट्रीय

February 9, 2025 10:13 AM February 9, 2025 10:13 AM

views 11

नीट-युजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा येत्या ४ मे रोजी घेण्यात येणार

नीट-युजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा येत्या ४ मे रोजी घेण्यात येणार असल्याचं एन टी ए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे.   या परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून सुरु झाली असून ती ७ मार्चपर्यंत चालणार आहे.

February 7, 2025 8:23 PM February 7, 2025 8:23 PM

views 14

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव टक्के कपात, आर्थिक वृद्धी दर ६ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज

सर्वसामान्य कर्जदारांना दिलासा देत भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात पाव टक्के कपात केली. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय झाला. त्यामुळं रेपो दर साडे ६ टक्क्यावरुन सव्वा ६ टक्के झाल्याची माहिती गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. या समितीच्या निर्णयांविषयी अधिक जा...

February 7, 2025 8:21 PM February 7, 2025 8:21 PM

views 10

केंद्रीय अर्थसंकल्पावर लोकसभेत चर्चा सुरु, हा अर्थसंकल्प कृषीआव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरल्याची काँग्रेसची टीका, तर गरीब, शेतकरी आणि महिलांचं हित जपणारा अर्थसंकल्प असल्याची भाजपाची प्रशस्ती

आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे, अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. तर देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला य...

February 7, 2025 8:20 PM February 7, 2025 8:20 PM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १० तारखेपासून तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते पॅरिसमध्ये होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासमवेत सहभागी होणार आहेत. विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी आज ही माहिती दिली. त्याचबरोबर प्रधानम...

February 7, 2025 7:29 PM February 7, 2025 7:29 PM

views 6

भारतीय नौदलाचा ‘TROPEX 25’, म्हणजेच ‘कॅपस्टोन थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज’ हा सराव सुरू

हिंदी महासागर क्षेत्रात सध्या भारतीय नौदलाचा ‘TROPEX 25’, म्हणजेच ‘कॅपस्टोन थिएटर लेव्हल ऑपरेशनल एक्सरसाइज’ हा सराव सुरू आहे. या द्वैवार्षिक सरावात भारतीय नौदलाच्या सर्व ऑपरेशनल युनिट्स बरोबरच भारतीय लष्कर, भारतीय वायुसेना आणि तटरक्षक दलाचा लक्षणीय सहभाग असतो. भारतीय नौदलाचं युद्धकौशल्य प्रदर्शित कर...

February 7, 2025 5:28 PM February 7, 2025 5:28 PM

views 7

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत सामना

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत आज साकेत मायनेणी आणि रामकुमार रामनाथन या जोडीचा सामना तैवानचा रे हो आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू ख्रिस्तोफर रोमियोस या जोडीबरोबर होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. उपान्त्य फेरीतला दुसरा सामना जीवन नेंदुचियान आणि विजय प्रशांत ...

February 7, 2025 5:17 PM February 7, 2025 5:17 PM

views 9

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदकतालिकेत महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ९४ पदकं आहेत. त्यात १९ सुवर्ण,३८ रौप्य आणि ३७ कास्यपदकांचा समावेश आहे.

February 7, 2025 3:42 PM February 7, 2025 3:42 PM

views 8

लोकसभेत आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर आज लोकसभेत चर्चा झाली. चर्चेला सुरुवात करताना, केंद्रीय अर्थसंकल्प देशासमोरच्या कृषी आव्हानांना तोंड देण्यात अपयशी ठरला आहे, अशी टीका काँग्रेसचे धर्मवीर गांधी यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. देशात शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्...

February 7, 2025 2:27 PM February 7, 2025 2:27 PM

views 11

युरियाची अनावश्यक टंचाई निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कारवाई करावी – जे. पी. नड्डा

देशात युरिया खतांचा तुटवडा नाही. नफा मिळवण्यासाठी बाजारात युरियाची अनावश्यक टंचाई निर्माण करणाऱ्यांवर राज्य सरकारांनी कारवाई करावी, असं आवाहन आज केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत केलं. समाजवादी पार्टीचे खासदार आनंद भदौरिया यांनी उत्तर प्रदेशात युरिया खतांचा तुटवडा असल्याचा ...

February 7, 2025 2:25 PM February 7, 2025 2:25 PM

views 3

गेल्या वर्षा अखेरीपर्यंत ४ हजार ३०० पेक्षा जास्त कृषी उत्पादक संस्थांची ई-नाम पोर्टलवर नोंदणी

गेल्या वर्षा अखेरीपर्यंत ४ हजार ३०० पेक्षा जास्त FPO, म्हणजेच कृषी उत्पादक संस्थांनी ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली असून, या संस्थांमधल्या ४ कोटी ८० लाख शेतकऱ्यांना २४९ कोटी रुपये देण्यात आल्याचं कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नां...