राष्ट्रीय

February 19, 2025 10:11 AM February 19, 2025 10:11 AM

views 5

बेरोजगारीच्या दरात ६.४ टक्क्यांची घट

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत शहरी भागातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांच्या बेरोजगारीच्या दरात ६ पूर्णांक ४ दशांश टक्क्यांची घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर तिमाहीत बेरोजगारीचा दर ६ पूर्णांक ५ दशांश टक्के होता.

February 19, 2025 10:07 AM February 19, 2025 10:07 AM

views 20

बिहारमध्ये ३४५ कोटींहून अधिक रकमेच्या १६९ विकास प्रकल्पांचं उद्घाटन

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या प्रगती यात्रेदरम्यान, काल त्यांनी कैमूर जिल्ह्यात सुमारे ३४५ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या, १६९ विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. कैमूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं काम लवकरच सुरू होईल असं आश्वासन त्यांनी यावेळ...

February 19, 2025 9:51 AM February 19, 2025 9:51 AM

views 4

ब्रह्मपुत्रा नदीवर जलवाहतुकीस उपयुक्त ठरणाऱ्या राष्ट्रीय जलमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन

आसाम मधील जोगीघोपा इथे, ब्रह्मपुत्रा नदीवर अंतर्गत जलवाहतुकीस उपयुक्त ठरणाऱ्या राष्ट्रीय जलमार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. भूतानचे अर्थमंत्री लियोंपो नामग्याल दोरजी या कार्यक्रमाला उपस्थित होते.   प्र...

February 19, 2025 9:40 AM February 19, 2025 9:40 AM

views 23

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदभार स्वीकारला. राजीव कुमार यांचा निवडणूक आयोगाच्या प्रमुखपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांनी यापूर्वी संसदीय कामकाज मंत्रालयात सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती.

February 19, 2025 1:37 PM February 19, 2025 1:37 PM

views 4

दिल्ली भाजप विधिमंडळ पक्षाची नवी दिल्लीत बैठक

दिल्ली विधानसभेतल्या भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक आज संध्याकाळी नवी दिल्लीत होणार आहे. पक्षाचे नवनिर्वाचित आमदार आणि वरिष्ठ नेते यात सहभागी होतील. दिल्लीच्या  नव्या मुख्यमंत्र्याचं नाव या बैठकीतच ठरवलं जाईल, नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी सोहळा उद्या रामलीला मैदानावर  होणार आहे.

February 19, 2025 9:31 AM February 19, 2025 9:31 AM

views 15

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश, प्रधानमंत्र्यांनी मानले आभार

गुजरातमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपानं निर्विवाद यश मिळवलं आहे. भाजपानं 68 पैकी 60 नगरपालिकांवर विजय मिळवला आहे. समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या असून कॉँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. जुनागड महानगरपालिकेत भाजपानं 60 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. भाजपानं 16 तारखेला मत...

February 19, 2025 9:28 AM February 19, 2025 9:28 AM

views 8

नव्या फौजदारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे जम्मूकाश्मीर प्रशासनाला आदेश

गुन्हेगारी-विरोधी तीन नव्या कायद्यांची येत्या एप्रिल महिन्यापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला दिले आहेत. या संदर्भात शहा यांनी, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांच्या बरोबर काल नवी दिल्लीत बैठक...

February 19, 2025 9:22 AM February 19, 2025 9:22 AM

views 26

भारत आणि कतार यांच्यात लवकरच मुक्त व्यापार करार

भारताचे कतारशी असलेले संबंध अनेक शतकं जूने असून, कतार, पश्चिम आशियातील भारतासोबतच्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांचा अविभाज्य भाग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. भारताच्या दौऱ्यावर असलेले कतारचे आमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या ...

February 18, 2025 8:22 PM February 18, 2025 8:22 PM

views 5

Agusta Westland Chopper Scam: आरोपी क्रिस्टअन मायकेल जेम्सचा जामीन मंजूर

ऑगस्ता वेस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातला आरोपी क्रिस्टअन मायकेल जेम्स याचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं आज मंजूर केला. या घोटाळ्यात तो मध्यस्थ म्हणून काम करत होता, असा आरोप त्याच्यावर आहे. गेली ६ वर्ष तो कोठडीत असून या प्रकरणाचा तपास अजूनही चालूच आहे. त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करत असल...

February 18, 2025 8:23 PM February 18, 2025 8:23 PM

views 8

WAVES अंतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणी सुरू

वेव्हज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट अंतर्गत ट्रेलर मेकिंग स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. व्हिडीओ पद्धतीचे आशय तयार करणारे किंवा संकलन विषयात आवड असणारे विद्यार्थी तसंच चित्रपट निर्माते या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. यासाठी त्यांना नेटफ्लिक्स या ओटीटी माध्यमाच्या व्हिडीओ संग्र...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.