राष्ट्रीय

February 27, 2025 9:27 AM February 27, 2025 9:27 AM

views 6

इथेनॉल मिश्रणाचं ध्येय २० टक्क्यांवर नेण्याचा भारताचा विचार

केंद्रीय पेट्रोलियम आणि भूगर्भ वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी इथेनॉल मिश्रणाचं ध्येय 20 टक्क्यांहून अधिक वाढवण्याचा विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे. गुवाहाटी इथं ॲडव्हांटेज आसाम द्वितीय गुंतवणूक शिखर परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की देशात 19 पूर्णांक 6 टक्के इथेनॉल मिश्रणाचा दर आधीच गाठला आहे. ...

February 27, 2025 9:13 AM February 27, 2025 9:13 AM

views 9

युरोपिय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन भारत दौऱ्यावर

युरोपिय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. लेयन यांचा हा तिसरा भारत दौरा असून त्या आज संध्याकाळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची भेट घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांसोबत शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा करतील. भारत आणि...

February 27, 2025 9:53 AM February 27, 2025 9:53 AM

views 8

महाकुंभ मेळ्याची प्रयागराज इथं सांगता

उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ मेळा काल समाप्त झाला. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या या महाकुंभामध्ये ६६ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केलं. भारतीय वायु दलानं घाटांवर पुष्पवृष्टि करुन भाविकांना संस्मरणीय आनंद दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व भाविक, संत ...

February 26, 2025 8:31 PM February 26, 2025 8:31 PM

views 4

महाशिवरात्रीच्या सणाचा देशभरात सर्वत्र उत्साह

महाशिवरात्रीचा सण आज राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. भगवान शंकराच्या एकूण १२ ज्योतिर्लिंगांपैकी पुण्याजवळ भीमाशंकर, नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर, वेरुळचं घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ अशी ५ ज्योतिर्लिंग राज्यात आहेत. आज महाशिवरात्री उत्सवानिमित्...

February 26, 2025 1:51 PM February 26, 2025 1:51 PM

views 4

महाकुंभ पर्वात देशाचं सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसारभारतीची महत्त्वाची भूमिका – प्रसारभारती अध्यक्ष नवनीत सेहगल

महाकुंभ पर्वात देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसारभारतीनं महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सेहगल यांनी म्हटलं आहे. या पर्वाचे सर्व ४८ दिवस चाललेल्या कुंभवाणी वाहिनीमार्फत आकाशवाणीने करोडो लोकांशी संपर्क साधला, असं ते म्हणाले.   देशाची सार्वजनिक प्रसारण व्यवस्था...

February 26, 2025 1:37 PM February 26, 2025 1:37 PM

views 8

परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गरिटा ९ दिवसाच्या दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर

परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गरिटा येत्या शुक्रवारपासून ९ दिवस दक्षिण अमेरिकेतल्या ४ देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. प्रथम ते उरुग्वेमधे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यमांडु ओर्सी यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. बहामा आणि बार्बाडोसमधे ते उभयपक्षी सहकार्यावर उच्चपदस्थांची भेट घेतील. ...

February 26, 2025 1:01 PM February 26, 2025 1:01 PM

views 4

Mahashivratri : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्री निमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.   भगवान महादेवाचे आशीर्वाद सर्व नागरिकांवर राहावेत आणि देश प्रगतीच्या मार्गावर पुढे जात रहावा अशी कामना राष्ट्रपतींनी समाज माध्यमावर आपल्या संदेशात व्य...

February 26, 2025 10:31 AM February 26, 2025 10:31 AM

views 6

क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी देशात CBIचे छापे

क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने देशभरातल्या ६०हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात पुणे, कोल्हापूर, नांदेड, दिल्ली, चंदिगड, बेंगळुरू शहरांचा समावेश आहे. गेन बिटकॉईन नावाच्या २०१५मध्ये सुरू झालेल्या कंपनीने १८ महिन्यांसाठी दरमहा १० टक्के दराने फायदेशीर परतावा देण्याचं आश्वासन...

February 26, 2025 10:16 AM February 26, 2025 10:16 AM

views 28

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा शेतकऱ्यांना फायदा

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत आत्तापर्यंत दहा लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज वितरीत करण्यात आली असून त्याचा फायदा सात कोटी ७२ लाख शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे. किसान क्रेडिट कार्ड खात्यांअंतर्गत २०१४मध्ये असलेल्या ४.२६ लाख कोटी रुपयांवरून वाढून ती डिसेंबर २०२...

February 26, 2025 1:08 PM February 26, 2025 1:08 PM

views 13

EPFOमध्ये १६ लाखांहून अधिक सदस्यांची नोंदणी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या एकूण सदस्य संख्येत गेल्या डिसेंबरमधे १६ लाखाची भर पडली. ही सुमारे ९ पूर्णांक ७ दशांश टक्के वाढ आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने जाहीर केलेली आकडेवारी सांगते, की नवीन सदस्यांपैकी ४ लाख ८५ हजार सदस्य १८ ते २५ वर्ष वयोगटातले आहेत.