राष्ट्रीय

March 1, 2025 6:55 PM March 1, 2025 6:55 PM

views 11

मजबूत विकासासाठी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज – मंत्री नितीन गडकरी

मजबूत विकासासाठी देशाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत आयोजित इनोव्हर्स परिषदेत बोलत होते. भारत ही जगातली सर्वात  वेगानं वाढणारी  अर्थव्यवस्था असून यात उद्योग क्षेत्राची भूमिका मोठी आहे, असंही ते म्हणाले.

March 1, 2025 3:33 PM March 1, 2025 3:33 PM

views 9

कराद्वारे गोळा होणारा महसूल अधिक सक्षमतेने वापरता येत असल्याचं अर्थमंत्र्यांच प्रतिपादन

आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकारकडे कराद्वारे गोळा होणारा महसूल अधिक सक्षमतेने वापरता येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. एकोणपन्नासाव्या नागरी लेखा दिनानिमित्त आज नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात आज त्या बोलत होत्या.   सरकारी योजनांचा पैसा देशातल्या ६० क...

March 1, 2025 3:04 PM March 1, 2025 3:04 PM

views 6

देशात आजपासून जन औषधी जन चेतना सप्ताहाला सुरुवात

देशभरात आजपासून जन औषधी जन चेतना सप्ताहाला सुरुवात  झाली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीत प्रधान मंत्री जनऔषधी योजनेच्या रथाला आणि इतर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. येत्या ७ मार्च रोजी जन औषधी दिवस साजरा केला जाणार असून त्यानिमित्त या आठवड्यात विविध ...

March 1, 2025 1:47 PM March 1, 2025 1:47 PM

views 17

रेल्वेमंत्र्यांनी केली अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाची पाहणी

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज अहमदाबाद रेल्वे स्थानकाला भेट देऊन तिथं सुरु असलेल्या पुनर्विकास कामाची पाहणी केली. अहमदाबाद रेल्वे स्थानकाचा विकास अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं केला जात असून येत्या तीन - साडे तीन वर्षात हे काम पूर्ण होईल, असं वैष्णव यांनी सांगितलं. गुजरातच्या विकासासाठ...

March 1, 2025 1:34 PM March 1, 2025 1:34 PM

views 19

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते के. पी. बी. हिंदुजा वाणिज्य महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील.

March 1, 2025 1:16 PM March 1, 2025 1:16 PM

views 30

२१ व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

२१ व्या शतकातील भारताकडे जग आशेनं पाहत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं NXT परिषदेत बोलत होते. जगभरातील लोक भारताला जाणून घेण्यासाठी इथं येत आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले. नुकत्याच झालेल्या महाकुंभ मेळ्याच्या व्यवस्थापनाचं प्रधानमंत्र्यांनी क...

March 1, 2025 1:53 PM March 1, 2025 1:53 PM

views 27

हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

उत्तराखंड मध्ये रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, बागेश्वर आणि पिथौरागढ इथं आज मोठ्या प्रमाणावर हिमस्खलन होईल असा इशारा डेहराडून इथल्या हवामान विभागानं जारी केला आहे. याठिकाणी दोन दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.   चमोली जिल्ह्यात ४० हून अधिक गावांवर बर्...

March 1, 2025 11:20 AM March 1, 2025 11:20 AM

views 12

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळातील अहवाल उघड

दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारच्या काळात सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनावरील भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहेत. कोविड काळात निधीचा कमी वापर, प्रकल्प अंमलबजावणीतील विलंब आणि शहरातील रुग्णालयांमध्ये औषधे आणि कर्मचाऱ्यांची कमतरता ...

March 1, 2025 11:26 AM March 1, 2025 11:26 AM

views 37

वर्तमान आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी दर 6 पूर्णांक 2 टक्क्यांनी वाढला

वर्तमान आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्न अर्थात जीडीपी दर 6 पुर्णाक 2 टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात आहे, मागील तिमाहीत हा दर 5 पुर्णाक 6 टक्के होता.   गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत भारतानं 8 पुर...

March 1, 2025 8:11 PM March 1, 2025 8:11 PM

views 19

उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात ४ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यातल्या माना गावाजवळ काल सकाळी हिमस्खलनात अडकलेल्या कामगारांपैकी ४ जणांचा मृत्यू झाला  आहे. आतापर्यंत ५० कामगारांना वाचवण्यात यश आलं असून उर्वरित ५ कामगारांना वाचवण्यासाठी पथकं शोध मोहिमेत गुंतली आहेत.     मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी घटनास्थळी जाण्यासाठी रवाना झाले ...