राष्ट्रीय

March 4, 2025 1:13 PM March 4, 2025 1:13 PM

views 23

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर

परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. इतर अनेक मान्यवरांचीही ते भेट घेणार आहेत, तर आयर्लंडच्या दोन दिवसांच्या भेटीदरम्यान डॉक्टर जयशंकर आयर्लंडचे परराष्ट्र मं...

March 4, 2025 12:47 PM March 4, 2025 12:47 PM

views 4

बेल्जियमच्या राजकन्या अ‍ॅस्ट्रिड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बेल्जियमच्या राजकन्या अ‍ॅस्ट्रिड आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्या आठ मार्चपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत. राजकन्या अ‍ॅस्ट्रिड यांनी बेल्जियमचे संरक्षणमंत्री थियो फ्रँकस्केन यांच्यासमवेत काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. ...

March 3, 2025 7:49 PM March 3, 2025 7:49 PM

views 20

वन्यजीवन व्यवस्थापनासाठी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करवा – प्रधानमंत्री

वन्यजीवन व्यवस्थापनासाठी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे जुनागढ जिल्ह्यात सासण – गीर इथं राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या सातवी बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. नदीतल्या डॉल्फिन ...

March 3, 2025 7:47 PM March 3, 2025 7:47 PM

views 7

दृष्टी दिव्यांगांना न्यायिक सेवांमध्ये नोकरीची संधी नाकारता येणार नाही- सर्वोच्च न्यालय

दृष्टी दिव्यांगांना न्यायिक सेवांमध्ये नोकरीची संधी नाकारता येणार नाही, असं सर्वोच्च न्यालयानं एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटलं आहे. न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठानं या संदर्भातल्या ६ याचिकांवर निकाल राखून ठेवला होता. दिव्यांग व्यक्तींना न्यायिक सेवा भर्तीदरम्यान...

March 3, 2025 7:44 PM March 3, 2025 7:44 PM

views 4

गेल्या वर्षीच्या तुलनेत महिलांमध्ये ४२ टक्क्यांनी अर्थविषयक जागरुकता वाढली

महिलांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थविषयक जागरुकता ४२ टक्क्यांनी वाढली आहे. आज नवी दिल्लीत प्रसिद्ध झालेल्या नीती आयोगाच्या "भारताच्या आर्थिक विकासात महिलांची भूमिका" या अहवालात हे नमूद केलं आहे. आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांनी या अहवालाचं प्रकाशन केलं. महिला उद्यो...

March 3, 2025 7:30 PM March 3, 2025 7:30 PM

views 3

शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात चढ उतार

देशातल्या शेअर बाजारात आज मोठ्या प्रमाणात चढ उतार झाले. व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत होते. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये साडे ४०० अंकांची वाढ झाली होती. मात्र त्यानंतर बाजारात मोठी घसरण झाली.   त्यानंतर चढ-उताराचा खेळ सुरू राहिला. दिवसअखेर अखेर सेन्सेक्स ११२ अंकांनी ...

March 3, 2025 7:12 PM March 3, 2025 7:12 PM

views 12

राष्ट्रपतींच्या हस्ते आज ८वे अभ्यागत पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात ८ वे  अभ्यागत पुरस्कार प्रदान केले. देशातल्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक स्तरावर एक ब्रँड म्हणून उदयाला येण्याची क्षमता असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. देशात संशोधनाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. उच्च श...

March 3, 2025 3:17 PM March 3, 2025 3:17 PM

views 5

महिलांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय कायद्यांमध्ये सुधारणा – मंत्री अर्जुन राम मेघवाल

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारनं भारतीय कायद्यांमध्ये सुधारणा केली आहे, असं विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितलं. महिलांशी संबंधित सायबर कायदे आणि सायबर जागरुकता या विषयावर नवी दिल्लीत आयोजित कार्यशाळेत ते आज बोलत होते.    या कार्यक्रमाला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विज...

March 3, 2025 2:40 PM March 3, 2025 2:40 PM

views 12

ग्रामीण भागाला समृद्ध बनवण्यासाठी दुग्धोत्पादनाचं मोठं योगदान – मंत्री अमित शाह

दुग्धोत्पादन क्षेत्र देशाच्या विकासाला गती देत असून ग्रामीण भागाला समृद्ध बनवण्यासाठी दुग्धोत्पादन क्षेत्राचं मोठं योगदान असल्याचं मत केंद्रीय गृृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलं. त्यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं ‘दुग्धोत्पादन क्षेत्रात शाश्वतता आणि वितरण क्षमता’ या विषयावर आयोजित ...

March 3, 2025 1:39 PM March 3, 2025 1:39 PM

views 17

प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची ७वी बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज गुजरातमध्ये सासन गीर इथं राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची सातवी बैठक झाली. या बैठकीमध्ये लष्करप्रमुख, विविध राज्यांचे सदस्य, या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मुख्य वन्यजीव वॉर्डन आणि विविध राज्यांचे सचिव अशा ४७ सदस्यांचा समावेश होता...