राष्ट्रीय

April 7, 2025 1:22 PM

views 9

केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे योग महोत्सवाचं आयोजन

केंद्रीय आयुष मंत्रालयाने मोराजी देसाई राष्ट्रीय योग संस्थानाच्या सहकार्याने आज सकाळी कलिंगा मैदानात योग महोत्सवाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला ७५ दिवस बाकी असताना सुरू केलेल्...

April 7, 2025 12:59 PM

views 32

देशातल्या ‘या’ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि ओदिशातल्या २१ शहरांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशासह अन्य भागांतही उष्णतेच्या झळा तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुजरातमध्ये कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला आ...

April 7, 2025 12:50 PM

views 13

J&K Assembly : विधानसभेत गदारोळानंतर कामकाज तहकूब

जम्मूकाश्मीर विधानसभेत वक्फ दुरुस्ती कायद्यावर चर्चेची मागणी फेटाळल्यामुळे झालेल्या गदारोळानंतर कामकाज तहकूब करण्यात आलं. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि काही अपक्ष आमदारांनी प्रश्नोत्तराचा तास थांबवून वक्फ दुरुस्ती कायद्यावर चर्चा घेण्याची मागणी अध्यक्षांकडे केली होती. मात्र, या कायद्याला सर्वोच्च न्...

April 7, 2025 12:24 PM

views 34

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत ५२ कोटीहून अधिक कर्ज मंजूर

प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत आजपर्यंत ३२ लाख कोटीपेक्षा जास्त किमतीचे  ५२ कोटीहून अधिक कर्ज मंजूर करण्यात आलं आहे.  यापैकी ७० टक्के कर्ज महिला उद्योजकांनी घेतल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. तर एकूण कर्जापैकी ५० टक्के कर्ज एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातल्या उद्योजकांनी घेतलं आहे. लघु उद्योजकांना...

April 7, 2025 1:28 PM

views 11

नौदल कमांडर्स परिषद २०२५च्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात

नौदल कमांडर्स परिषद २०२५च्या पहिल्या आवृत्तीच्या दुसऱ्या टप्प्याला आज नवी दिल्लीत सुरुवात झाली. या परिषदेत सर्वोच्च पदावरच्या नौदल अधिकाऱ्यांमध्ये धोरणात्मक तसंच प्रशासकीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेत हिंद महासागर क्षेत्रातल्या भारतीय नौदलाच्या भूमिकेला बळकटी मिळण्याच्य...

April 7, 2025 9:44 AM

views 25

केंद्रीय मंत्री अमित शाह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यासाठी जम्मू इथं आगमन झालं. ते आज कठूआ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतील. तसंच, ते विनय या आंतरराष्ट्रीय हद्दीलागत असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या नाक्याला भेट देणार आहेत. त्यानंतर ते जम्मूमधील राज भवन इथं हुतात...

April 7, 2025 3:01 PM

views 54

आज ‘जागतिक आरोग्य दिवस’

आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी आज जगभरात सर्वत्र आरोग्य दिवस साजरा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना १९४८ मध्ये या दिवशी झाली. या वर्षीच्या आरोग्य दिवसाची मध्यवर्ती संकल्पना निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य अशी आहे. माता आणि नवजात बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं हा या संकल्पनेमा...

April 7, 2025 1:24 PM

views 21

मुंबईत RBIच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक

रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. २०२५-२६ या आर्थिक वर्षातली ही पहिलीच बैठक आहे. या बैठकीत रेपो दरांवर चर्चा होईल. सध्या रेपो दर ६ पूर्णांक २५ दशांश टक्के असून या बैठकीत या दरात होणाऱ्या बदलांवर अर्थतज्ञ आणि बाजार विश्लेषकांचं लक्ष आहे.

April 6, 2025 8:42 PM

views 13

तामिळनाडूमध्ये रामेश्वरम इथल्या नवीन पंबन रेल्वे पुलाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गेल्या दहावर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तमीळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या उभ्या उघडता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. त्यानंतर आयोजित सभेला त्...

April 6, 2025 6:47 PM

views 29

पंजाबमध्ये शेतकरी नेते जगजीत सिंग दलेवाल यांची उपोषण संपवल्याची घोषणा

पंजाबमध्ये शेतकरी नेते जगजीत सिंग दलेवाल यांनी आज फतेहगढ साहिब इथे आपलं उपोषण संपवल्याची घोषणा केली. उपोषण संपलं असलं तरी आपण शेतकरी चळवळीचं नेतृत्व नव्या ताकदीने करत राहू, असं ते म्हणाले आहेत. सिंग हे नोव्हेंबर २०२४पासून उपोषण करत होते. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्यांना उपोषण संपव...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.