राष्ट्रीय

April 7, 2025 8:36 PM

views 27

वेव्हजच्या माध्यमातून देशात गुंतवणुकीसाठी जगभरातले गुंतवणूकदार भारतात येणार

वेव्हज परिषदेच्या माध्यमातून देशात गुंतवणुकीसाठी जगभरातले गुंतवणूकदार भारतात येणार असल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत ते वार्ताहरांशी बोलत होते. डिजिटल इंडियामुळं अनेक तंत्रज्ञान सुलभतेनं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे. त्यामुळं देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल ...

April 7, 2025 8:33 PM

views 24

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांची अमेरिकेचे मंत्री मारको रुबियो यांच्याशी चर्चा

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज  अमेरिकेचे मंत्री मारको रुबियो यांच्याशी चर्चा केली आणि भारत- प्रशांत क्षेत्र, भारतीय उपखंड, युरोप, पश्चिम आशिया आणि कॅरेबियन याविषयीच्या परिप्रक्ष्यावर मतांची देवाणघेवाण केली. द्वीपक्षीय व्यापार कराराच्या महत्त्वावर दोघांचं एकमत झाल्याचं जयशंकर यांनी ...

April 7, 2025 8:06 PM

views 11

काँग्रसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या गुजरातमध्ये होणार

काँग्रसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक उद्या गुजरातमध्ये अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारकात तर अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक येत्या ९ तारखेला साबरमती नदीच्या काठावर होणार आहे. काँग्रेसचे माध्यम आणि प्रसार विभागाचे अध्यक्ष पवन खेरजी यांनी आज   अहमदाबाद इथं झालेल्या वार्ताहर परिष...

April 7, 2025 9:03 PM

views 7

घरगुती वापराचे सिलिंडर ५० रुपयांनी महाग

केंद्र सरकारनं घरगुती वापराच्या एलपीजी सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढवली आहे. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना उद्यापासून हे सिलिंडर ५५० रुपयांना तर इतरांना ८५३ रुपयांना मिळतील, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना दिली. [video width="1280" height="720" mp4="ht...

April 7, 2025 7:53 PM

views 33

छत्तीसगडमधे ३१ माओवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तिसगडमधल्या दंतेवाडा आणि नारायणपूर जिल्ह्यांमधे मिळून आज ३१ माओवाद्यांनी शरणागती पत्करली.  दंतेवाडा जिल्ह्यातून २६ माओवाद्यांनी शरणागती पत्करली, त्यातल्या तीन माओवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी साडेचार लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं.   नारायणपूर जिल्ह्यात पाच महिला माओवाद्यांनी शरणागती पत्करल...

April 7, 2025 7:31 PM

views 19

संरक्षण मंत्रालयाचे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडशी दोन हजार ३८५ कोटी रुपयांचे करार

MI 17 V5 हेलिकॉप्टर्सच्या एअरक्राफ्ट मॉडिफिकेशन किटसाठी संरक्षण मंत्रालयानं भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडशी दोन हजार ३८५ कोटी रुपयांचे करार केले आहेत.  संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वॉरफेअर सूटमुळे हेलिकॉप्टर प्रतिकूल वातावरणात अधिक सक्षमपणे कार्...

April 7, 2025 7:14 PM

views 29

पोषण पंधरवडा उद्यापासून साजरा करण्यात येणार

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयातर्फे उद्यापासून पोषण पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. पोषण पंधरवाड्याचं हे सातवं वर्ष असून यंदा बाळाच्या जन्मापासूनच्या एक हजार दिवसांमधलं पोषण, पोषण ट्रॅकरमार्फत अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ, कुपोषणावर मात आणि लहान मुलांमधल्या लठ्ठपणाच्या समस्येवर आरोग्यदायी जीव...

April 7, 2025 6:35 PM

views 40

VVPAT रिसीटची शंभर टक्के हातानं मोजणीची मागणी करणारी याचिका फेटाळली

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामधल्या व्हीव्हीपॅट रिसीटची शंभर टक्के हातानं मोजणी करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजयकुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्यापुढं आज यावर सुनावणी झाली...

April 7, 2025 4:01 PM

views 31

तिन्ही दलांच्या महिला अधिकाऱ्यांचा मुंबई ते सेशेल्स असा समुद्रप्रवास

देशाच्या तिन्ही सशस्त्र दलांच्या महिला अधिकाऱ्यांच्या मुंबई ते सेशेल्स समुद्रप्रवासाला आज प्रारंभ झाला. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या एकंदरीत १२ महिला अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे अशी मोहीम पहिल्यांदाच हाती घेतली आहे. या वर्षी जगप्रदक्षिणेला निघण्यापूर्वीची ही सराव मोहीम असेल. 

April 7, 2025 1:48 PM

views 6

प्रधानमंत्री २७ एप्रिलला ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २७ एप्रिल रोजी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीवरुन देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा १२१वा भाग असेल. कार्यक्रमाकरता आपल्या सूचना किंवा प्रश्न १८०० – ११ – ७८०० या टोलफ्री क्रमांकावर नोंदवता येतील. नरेंद्र मोदी ॲप किंवा मायगोव्ह ओप...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.