राष्ट्रीय

April 8, 2025 8:44 PM

views 23

छत्तीसगडमध्ये २२ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये आज २२ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. त्यातल्या चौघांवर २६ लाख रुपयांचं बक्षीस होतं. यावर्षी बिजापूर जिल्ह्यात १८० नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. 

April 8, 2025 8:36 PM

views 30

भारत आणि UAE यांच्यातले धोरणात्मक संबंध दृढ करण्यात दुबईची महत्वाची भूमिका-प्रधानमंत्री

दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रधानमंत्री शेख हमदन बिन मोहम्मद अल मकतुम यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी नवी दिल्लीत आज भेट घेतली.  भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले धोरणात्मक संबंध दृढ करण्यात दुबईची महत्वाची भूमिका आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आह...

April 8, 2025 8:21 PM

views 28

इलेक्ट्रॉनिक्स काँपोनंट उत्पादन योजनेची अधिसूचना काढण्यात येईल-अश्विनी वैष्णव

इलेक्ट्रॉनिक्स काँपोनंट उत्पादन योजनेची अधिसूचना आज काढण्यात येईल असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. अधिसूचना जाहीर झाल्यावर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वं तयार करण्यासाठी उद्योजकांशी चर्चा केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. तसंच या योजने अंतर्गत अर्ज स्वीकारायला काही दिवसात...

April 8, 2025 8:08 PM

views 22

राष्ट्रपती यांची दुसऱ्या दिवशी आज पोर्तुगालच्या संसदेला भेट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पोर्तुगाल दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज पोर्तुगालच्या संसदेला भेट दिली. तिथं त्यांना पारंपरिक मानवंदना देण्यात आली. सभापती जोस पेद्रो अग्वार ब्रांको यांच्याशी आणि इतर संसद सदस्यांशी त्यांनी सौहार्दपूर्ण चर्चा केली. राष्ट्रपतींनी  चंपालमो फाऊंडेशन आणि राधाकृष्ण मंदिराला ...

April 8, 2025 8:02 PM

views 14

काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक गुजारतमधे संपन्न

काँग्रेसच्या केंद्रीय  कार्यकारिणीची बैठक आज गुजारतमधे अहमदाबाद इथं झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह दीडशे प्रतिनिधी उपस्थित होते. आजच्या बैठकीत पक्षाच्या पुनर्बांधणीबाबत चर्चा झाल्या...

April 8, 2025 7:46 PM

views 43

जयपूरात १७ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी स्फोट प्रकरणी दोषींना जन्मठेप

राजस्थानात जयपूर इथे १७ वर्षांपूर्वी झालेल्या साखळी स्फोट प्रकरणात दोषी ठरलेल्या चार दहशतवाद्यांना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी ४ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत या चारही दहशतवाद्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. दहशतवाद हा समाजासाठी धोका असून अशा गुन्हेगारांना कोणतीही दया दाख...

April 8, 2025 7:41 PM

views 162

माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांची हिंद सेना पक्ष स्थापन केल्याची घोषणा

माजी पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज 'हिंद सेना' नावाने नवीन पक्ष स्थापन केल्याची घोषणा केली. बिहारची राजधानी पाटणा इथे झालेल्या वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. या पक्षाच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ जागा लढवण्याची घोषणाही त्यांनी या परिषदेत केली. बिहारच्या हक्कांसाठी लढणं आणि तरुण ...

April 8, 2025 7:20 PM

views 18

राजस्थानात मद्यधुंद चालकामुळे ९ जणं चिरडून ठार, तर ६ जण गंभीर जखमी

राजस्थानात जयपूरच्या नाहरगडमध्ये काल रात्री मद्यधुंद चालकानं ९ जणांना चिरडून ठार केलं तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. नागरिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं असून आतापर्यंत दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.  खबरदारीचा उपाय म्हणून या भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

April 8, 2025 7:17 PM

views 25

ब्रह्माकुमारी संघटनेच्या प्रमुख राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांचं निधन

ब्रह्माकुमारी संघटनेच्या प्रमुख राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांचं आज पहाटे अहमदाबादच्या जाइडिस रुग्णालयात निधन झालं. त्या १०१ वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर १० एप्रिलला सकाळी १० वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. तोपर्यंत त्यांचं पार्थिव शरीर ब्रह्माकुमारीचं मुख्यालय शांतिवनच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ...

April 8, 2025 7:11 PM

views 13

नवी दिल्लीत कृषी क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित करारांवर स्वाक्षऱ्या

केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आणि इस्रायलचे कृषीमंत्री अवी डिचर यांनी आज नवी दिल्लीत कृषी क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. आगामी काळात अन्न सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे जाण्याच्या रणनीतीसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. वाढतं तापमान आणि ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.