राष्ट्रीय

April 9, 2025 1:43 PM

views 23

सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत परदेशी बँकांना वाढीच्या आकर्षक संधी उपलब्ध करून देत असून सरकार बँकिंग क्षेत्रात परकीय गुंतवणुकीला सक्रिय प्रोत्साहन देत असल्याचं केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. त्या लंडनमध्ये आयोजित भारत-यूके गुंतवणूकदार गोलमेज चर्चासत्रात बोलत होत्या. नव्या भारताला आकार देण्यासाठी धोरणात...

April 9, 2025 1:54 PM

views 31

म्यानमारच्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या ३ हजार ६४५ वर

म्यानमारला झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता ३ हजार ६४५ वर पोचली आहे. एकंदर ५ हजार १७ लोक जखमी झाले असून, १४८ नागरीक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक राज्य प्रशासनानं काल संध्याकाळी दिली आहे. २८ मार्चला झालेल्या भूकंपानंतर कालपर्यंत ९८ भूकंपाचे धक्के बसल्याचं म्यानमाच्या हवामानशा...

April 9, 2025 2:04 PM

views 12

थकीत कर भरण्याची शेवटची मुदत ३० एप्रिल

‘प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास’ या योजने अंतर्गत थकीत कर भरण्याची शेवटची मुदत ३० एप्रिल असल्याचं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं एका अधिसूचने द्वारे जाहीर केलं आहे.  

April 9, 2025 9:52 AM

views 23

वेव्हज उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘ट्रूथ टेल हॅकेथॉन’च्या पहिल्या ५ विजेत्यांची नावं जाहीर

वेव्हज उपक्रमाअंतर्गत आयोजित ‘ट्रूथ टेल हॅकेथॉन’च्या पहिल्या ५ विजेत्यांची नावं जाहीर झाली आहेत. युनिकॉर्न, अल्केमिस्ट, व्हूशिंग लायर्स, बग स्मॅशर्स, आणि व्होर्टेक्स स्क्वाड या संघांना १० लाख रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. चुकीची माहिती पसरु नये याकरता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन उपाय शोधून काढल्या...

April 9, 2025 9:47 AM

views 37

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज समारोप

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची गेले तीन दिवस सुरू असलेल्या बैठकीचा आज समारोप होत आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा गेल्या दोन दिवसांत घेतल्या गेलेल्या निर्णयांची घोषणा करतील आणि मग बैठकीचा समारोप होईल. रेपो दराव्यतिरिक्त भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाज, चलनवाढीची स्थिती, ग्राहक मूल्य...

April 9, 2025 9:24 AM

views 27

प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत नवकार महामंत्र दिवस विशेष कार्यक्रम नवी दिल्लीमध्ये सुरू

आज नवकार महामंत्र दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. आज सकाळी आठ वाजता हा कार्यक्रम विज्ञान भवन इथं सुरू झाला आहे. याप्रसंगी प्रधानमंत्री उपस्थितांशी संवादही साधतील. नवकार महामंत्र दिवस हा आध्यात्मिक सुसंवाद आणि...

April 9, 2025 9:03 AM

views 29

आगामी वेव्ह्ज परिषदेच्या माध्यमातून भारतीय कलाकारांना आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक कमावण्याची संधी, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

मनोरंजन उद्योग मोठ्या उद्योगांपैकी एक असून, आगामी काळात याचा मोठा विस्तार होणार असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. एका खाजगी वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. सरकारने पुढील महिन्यात मुंबईत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट म्हणजेच वेव्ह्ज परि...

April 8, 2025 9:03 PM

views 18

मुद्रा योजनेनं उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला-प्रधानमंत्री

मुद्रा योजनेनं उद्योजकतेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. यामुळे महिलांना आर्थिक सहाय्य तर मिळालंच पण त्यांच्या व्यवसायाच्या विकासासाठी अनेक संधी निर्माण झाल्या असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मुद्रा योजनेला १० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विविध लाभार्थ्यांशी नवी दिल्लीत ...

April 8, 2025 8:55 PM

views 10

अमेरिकेनं आयात करणाऱ्या वस्तूंवर लादलेल्या करांंची काळजीपूर्वक पडताळणी करण्याची गरज-हरदीप सिंग पुरी

अमेरिकेनं आयात करणाऱ्या वस्तूंवर लादलेल्या करांंची काळजीपूर्वक पडताळणी करण्याची गरज आहे. या करांचे परिणाम दिसू लागल्याशिवाय घाईगडबडीत कुठलाही निर्णय घेतला जाऊ नये असं मत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी व्यक्त केलं आहे. अशाप्रकारच्या करांचे विविध उद्देश आणि विविध परिणाम असता...

April 9, 2025 8:23 AM

views 11

वक्फ सुधारणा कायदा आजपासून देशभरात लागू

वक्फ सुधारणा कायद्याचं अधिसूचना केंद्र सरकारनं आज जारी केल्यानं हा कायदा आजपासून देशभरात लागू झाला आहे. गेल्या आठवड्यात संसदेनं याला मंजुरी दिल्यानंतर राष्ट्रपतींनी यावर स्वाक्षरी केली होती. यामुळं वक्फ बोर्डाचं मालमत्ता व्यवस्थापन पारदर्शक होणार असून वक्फ बोर्ड आणि स्थानिक प्रशासनातलं सामंजस्य वाढण...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.