राष्ट्रीय

April 10, 2025 1:32 PM

views 27

नवी दिल्लीत आज पासून ९ वे जागतिक तंत्रज्ञान संमेलन सुरु

नवी दिल्लीत आज पासून ९ वे जागतिक तंत्रज्ञान संमेलन सुरु होत आहे. ४० देशातले दीडशेहून अधिक वक्ते या संमेलनात सहभागी होत आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात एकूण ४० सत्रे होणार आहेत.   या वर्षीच्या संमेलनाचा विषय संभावना अर्थात शक्यता असा असून यामध्ये तांत्रिक आव्हाने आणि संधींवर चर्चा होणार आहे...

April 10, 2025 1:30 PM

views 33

आज जागतिक होमिओपॅथी दिन

जागतिक होमिओपॅथी दिन आज साजरा केला जात आहे. होमिओपॅथी ही आरोग्य सेवेसाठी समग्र दृष्टिकोन ठेवणारी जगातील दुसरी - सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली असून, त्यातील नैसर्गिक पद्धतींमुळे लोक हे उपचार पसंत करतात.   आयुष मंत्रालयाच्या मते, देशात १० कोटींहून अधिक लोक आरोग्याच्या गरजांसाठी होमिओपॅथीवर विश्वास...

April 10, 2025 1:13 PM

views 14

देशाची चालू आर्थिक वर्षातली वस्तू आणि सेवा क्षेत्रातली निर्यात ८२० अब्ज डॉलरवर

देशाची चालू आर्थिक वर्षातली वस्तू आणि सेवा क्षेत्रातली निर्यात ८२० अब्ज डॉलरवर गेली आहे. ही निर्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीतल्या ७७८ अब्ज डॉलरपेक्षा ६ टक्के अधिक असल्याचं वाणिज्य मंत्रालयानं सांगितलं.   वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्यात प्रोत्साहन परिषद आणि उद्यो...

April 10, 2025 10:52 AM

views 16

हवामान बदल हे सध्याचं सर्वात मोठं संकट- प्रधानमंत्री

हवामान बदल हे सध्याचं सर्वात मोठं संकट असून शाश्वत जीवनशैली हा त्यावरचा उपाय आहे. जैन समाज कित्येक शतकांपासून त्याचा अवलंब करत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवकार महामंत्र दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते.   नवकार महामंत्र विकसित भारताच्य...

April 10, 2025 10:48 AM

views 19

अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांचे परिणाम भारत काळजीपूर्वक तपासत आहे- परराष्ट्र मंत्रालय

अमेरिकेने लादलेल्या परस्पर शुल्कांचे परिणाम भारत काळजीपूर्वक तपासत असल्याचं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. नवी दिल्लीत माध्यमांशी बोलतांना मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी - भारत आणि अमेरिका परस्पर फायदेशीर, बहु-क्षेत्रीय द्विपक्षीय व्यापार करारावर काम करत असल्याचं सांगितलं.

April 10, 2025 10:46 AM

views 22

RBI : सलग दुसऱ्या वेळी रेपो दरात कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं सलग दुसऱ्या वेळी रेपो दरात कपात केली आहे. त्यामुळे आता रेपो दर ६ टक्क्यांवर आला आहे. तसंच एसडीएफ दर ५ पूर्णांक ७५ शतांश टक्के आणि एमएसएफ दर ६ पूर्णांक २५ शतांश टक्के करण्यात आला आहे.   सोन्याच्या दरवाढीमुळे किरकोळ महागाई दरात मात्र वाढ होऊन तो ४ पूर्णांक ...

April 10, 2025 10:35 AM

views 31

भारत फ्रान्सकडून २६ राफेल विमानं खरेदी करणार

भारत फ्रान्सकडून २६ राफेल सागरी लढाऊ विमानं लवकरच खरेदी करणार आहे. या २६ राफेल विमानांपैकी २२ विमानं एक आसनी आणि चार विमानं दोन आसनी आहेत. भारतीय नौदलाच्या गरजेनुसार त्याची रचना करण्यात येईल असं संरक्षण सूत्रांनी म्हटलं आहे.   राफेल सागरी विमानांमुळे नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढणार असून ,ही लढा...

April 10, 2025 10:31 AM

views 20

तिरुपती-पकला-कटपाडी रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला मंजुरी

आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधील तिरुपती-पकला-कटपाडी या रेल्वे मार्गाच्या दु-पदरीकरणाला सरकारनं मंजुरी दिली आहे. काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती काल नवी दिल्लीत माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माध्यमांना दिली. या प्रकल्पामुळे वेल्लोर आणि तिरुपती या शैक्षण...

April 9, 2025 8:40 PM

views 22

बिहारमध्ये वीज कोसळून १३ जणांचा मृत्यू

बिहारमध्ये वीज कोसळल्याच्या घटनेत मृत पावलेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. यातील ५ जण बेगुसराई जिल्ह्यातले असून ३ जण मधुबनी जिल्ह्यातले आहेत तर दरभंगा इथले २ आणि समस्तीपूर इथला एकजण या दुर्घटनेत दगावला. बिहार राज्यात अन्यत्र देखील पाऊस सुरु असून त्यात ५ जण मृत्युमुखी पडले तर ४ जण जखमी झाले. मुख्यम...

April 9, 2025 9:26 PM

views 21

मुंबई २६/११ दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वुर राणा भारतात येणार

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी तहव्वुर राणा याला भारतात आणलं जात असल्याचं वृत्त आहे. तो अमेरिकेतल्या तुरुंगात होता. भारतीय अधिकाऱ्यांनी त्याची कोठडी घेतली असून ते भारताकडे निघाले आहेत. काही महिन्यांपूर्वी राणा याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाली होती. या निर्णयाला आव्हान देणारी त्याची याचिका अमेर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.